II अक्षय्य तृतीया II-शुभेच्छा-3

Started by Atul Kaviraje, April 22, 2023, 11:37:47 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                    II अक्षय्य तृतीया II
                                   ------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-२२.०४.२०२३-शनिवार आहे. आज "अक्षय्य तृतीया" आहे. वैशाख महिन्यातील तृतीयेला चंदन मिश्रित पाणी व मोदकाच्या दानाने ब्रम्ह तसेच सगळे देवता प्रसन्न होतात. या दिवशी अन्न, वस्त्र, सोने आणि पाण्याचे दIन केल्याने अक्षय फळाची प्राप्ती होते. या दिवशी जे काही दान केले ते अक्षय होते आणि दान देणाऱ्याला सूर्यलोकाची प्राप्ती होते. मराठी कवितेच्या माझ्या सर्व भाऊ-बहीण, कवी-कवियत्रींना अक्षय्य तृतीया च्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया तर काही शुभेच्छा.

     अक्षय तृतीया (Akshay Tritiya 2023) हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जातो. या दिवशी जे शुभ कार्य केलं जातं त्याचं फळ हे अक्षय मिळतं. अक्षय म्हणजेच ज्याचा कधीही क्षय होणार नाही ते फळ. याच कारणामुळे हा दिवस हिंदू धर्मात शुभ मानला जातो. अक्षय्य तृतीयेची माहिती आपल्याला असलीच पाहिजे. यंदा अक्षय तृतीया 3 मे रोजी आहे. हिंदू कॅलेंडरनुसार वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तिसऱ्या दिवशी अक्षय तृतीया साजरी केली जाते. व्यापारी असो वा शेतकरी असो वा सामान्यजन सगळ्यांसाठी हा दिवस महत्त्वाचा आहे. अक्षय तृतीयेच्या दिवशी तुमच्या जवळच्या व्यक्तींना या मराठमोळ्या अक्षय तृतीया च्या शुभेच्छा नक्की द्या.

                 अक्षय तृतीया शुभेच्छा संदेश--

=========================================
--लक्ष्मी देवीची कृपा तुमच्या संपूर्ण कुटुंबावर कायम राहो...
अक्षय तृतीया हार्दिक शुभेच्छा.

--दिवसेंदिवस वाढत राहो तुमचा व्यवसाय,
कुटुंबात सदैव राहो स्नेह आणि प्रेम,
होत राहो तुमच्यावर सदा धनाचा वर्षाव,
असा असो तुमचा अक्षय तृतीया सण,
अक्षय तृतीया च्या खूप खूप शुभेच्छा...

--सोन्याचा रथ, चांदीची पालखी,
ज्यात बसून घरी आली लक्ष्मी देवी,
तुमच्या कुटुंबाला देण्यासाठी अक्षय तृतीया चा हार्दिक शुभेच्छा.

--तुमच्या घरावर होवो धनाची बरसात...
लक्ष्मीचा असो वास...
संकटाचा होवो नाश...
शांतीचा असो वास...
हॅपी अक्षय तृतीया

--लक्ष्मी मातेची कृपा तुमच्यावर बरसो..
प्रत्येक जण तुमच्याकडून लोन घेण्यासाठी येवो..
देव देईल तुम्हाला इतके धन की गायब होईल घरातली चिल्लर...
अक्षय तृतीया शुभेच्छा

--घन न घन जसा बरसतो ढग,
तशीच होवो धनाची वर्षा,
मंगलमय होवो हा सण,
भेटवस्तूंची लागो रांग,
अक्षय तृतीया शुभेच्छा

--या अक्षय तृतीयेला..
तुम्हाला मिळो प्रत्येक आनंद..
जी इच्छा असेल ती होवो पूर्ण..
तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला..
अक्षय तृतीया चा हार्दिक शुभेच्छा..
=========================================

--आदिती दातार
--------------

                    (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठी.popxo.कॉम)
                   ---------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-22.04.2023-शनिवार.
=========================================