II अक्षय्य तृतीया II-शुभेच्छा-7

Started by Atul Kaviraje, April 22, 2023, 11:43:15 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                    II अक्षय्य तृतीया II
                                   ------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-२२.०४.२०२३-शनिवार आहे. आज "अक्षय्य तृतीया" आहे. वैशाख महिन्यातील तृतीयेला चंदन मिश्रित पाणी व मोदकाच्या दानाने ब्रम्ह तसेच सगळे देवता प्रसन्न होतात. या दिवशी अन्न, वस्त्र, सोने आणि पाण्याचे दIन केल्याने अक्षय फळाची प्राप्ती होते. या दिवशी जे काही दान केले ते अक्षय होते आणि दान देणाऱ्याला सूर्यलोकाची प्राप्ती होते. मराठी कवितेच्या माझ्या सर्व भाऊ-बहीण, कवी-कवियत्रींना अक्षय्य तृतीया च्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया तर काही शुभेच्छा.

                अक्षय तृतीया शुभेच्छा संदेश--

=========================================
--येणारे दिवस आपल्या जीवनात आनंद आणि समाधान घेऊन येवोत शुभ अक्षय तृतीया
अक्षय तृतीया शुभेच्छा...

--आपल्या आयुष्यात अक्षय सुख-समृद्धी नांदो
अक्षय राहो सुख तुमचे...
अक्षय राहो धन तुमचे...
अक्षय राहो प्रेम तुमचे...
अक्षय राहो आरोग्य तुमचे.
या शुभ दिवसाच्या शुभ शुभेच्छा

--दिवसेंदिवस वाढो तुमचा व्यवसाय आणि अक्षय होवो तुमची धनसंपदा,
अक्षय तृतीयेच्या शुभेच्छा...

--वैशाख मास शुक्ल पक्षातील तृतीया तिथीच्या हार्दिक शुभेच्छा.
लॉकडाऊनमध्ये आला सण अक्षय फळ देणारा
तरीही साजरा करू उत्साहाने सण अक्षय तृतीयेचा
अक्षय तृतीया शुभेच्छा

--नुसतीच नाही सोने-चांदी खरेदी
दानाचं ही आहे महत्त्व या दिवशी
अक्षय फळाचा हा दिवस आपल्या
सर्वांसाठी आहे खासम खास
अक्षय तृतीया शुभेच्छा

--सण आहे भरभराटीचा
सण आहे दानधर्माचा
सर्वांना मिळो अक्षय फळ
दिवस आहे अक्षय तृतीयेचा

--यंदा नको दुकानात जाणं
यंदा नको देवळात जाणं
ऑनलाईनच करूया खरेदी
कारण बाहेर सुरू आहे कोरोनाचं गाणं
अक्षय तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा

--एकमेंकाना जपूया एकमेंकाना मदत करूया
या अक्षयतृतीयेच्या निमित्ताने दान-धर्म करूया
कोरोना काळातील अक्षय तृतीया शुभेच्छा.
=========================================

--आदिती दातार
--------------

                   (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठी.popxo.कॉम)
                   --------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-22.04.2023-शनिवार.
=========================================