II अक्षय्य तृतीया II-शुभेच्छा-9

Started by Atul Kaviraje, April 22, 2023, 11:45:50 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                    II अक्षय्य तृतीया II
                                   ------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-२२.०४.२०२३-शनिवार आहे. आज "अक्षय्य तृतीया" आहे. वैशाख महिन्यातील तृतीयेला चंदन मिश्रित पाणी व मोदकाच्या दानाने ब्रम्ह तसेच सगळे देवता प्रसन्न होतात. या दिवशी अन्न, वस्त्र, सोने आणि पाण्याचे दIन केल्याने अक्षय फळाची प्राप्ती होते. या दिवशी जे काही दान केले ते अक्षय होते आणि दान देणाऱ्याला सूर्यलोकाची प्राप्ती होते. मराठी कवितेच्या माझ्या सर्व भाऊ-बहीण, कवी-कवियत्रींना अक्षय्य तृतीया च्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया तर काही शुभेच्छा.

                अक्षय तृतीया शुभेच्छा संदेश--

=========================================
--या अक्षय तृतीयेला काही खास होवो,
मनात आनंदाचा निवास होवो,
तुमच्या घरात सदैव लक्ष्मीचा वास होवो.

--उमा, रमा, ब्रह्माणी, तुचं आहेस जगन्माता।
सूर्य चन्द्रमा ध्यावत, नारद ऋषि गाता॥
॥ ॐ जय लक्ष्मी माता॥

--सण हा सोनेरी दिवसाचा
दिवस हा अक्षय तृतीयेचा
घरातच राहून साजरा करा
मिळेल फळ मग तुम्हालाही भराभरा

--सोनेरी दिवस, शुभ मुहूर्ताची लगबग
करूया नवीन सुरूवात यानिमित्ताने
देऊया सोनेरी शुभेच्छा अक्षयतृतीयेच्या निमित्ताने
अक्षय तृतीया शुभेच्छा

--स्नान, दान आणि हवन आहे याचं खरं महत्त्व
फक्त खरेदीत नका गुंतून जाऊ
अक्षय तृतीयेला आहे दानाचंही महत्त्व
अक्षय तृतीया शुभेच्छा

--होईल दर्शन मंगल स्वरूपाचे
करू व्रत या शुभ दिवसाचे
अक्षय तृतीयेच्या शुभेच्छा

--धन मिळेल अपरंपार
ज्याचा क्षय नाही होणार
अशा अक्षय फळ देणाऱ्या
अक्षय तृतीयेच्या शुभेच्छा
तुम्हा सर्वांना वारंवार

--वर्षभरात एकदा येणार हा दिवस याचा करा पुरेपूर फायदा. मिळवा अक्षय फळ अक्षय तृतीयेचे आणि इतरांनाही द्या शुभेच्छा.
=========================================

--आदिती दातार
--------------

                    (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठी.popxo.कॉम)
                   --------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-22.04.2023-शनिवार.
=========================================