II अक्षय्य तृतीया II-शुभेच्छा-10

Started by Atul Kaviraje, April 22, 2023, 11:47:06 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                  II अक्षय्य तृतीया II
                                 ------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-२२.०४.२०२३-शनिवार आहे. आज "अक्षय्य तृतीया" आहे. वैशाख महिन्यातील तृतीयेला चंदन मिश्रित पाणी व मोदकाच्या दानाने ब्रम्ह तसेच सगळे देवता प्रसन्न होतात. या दिवशी अन्न, वस्त्र, सोने आणि पाण्याचे दIन केल्याने अक्षय फळाची प्राप्ती होते. या दिवशी जे काही दान केले ते अक्षय होते आणि दान देणाऱ्याला सूर्यलोकाची प्राप्ती होते. मराठी कवितेच्या माझ्या सर्व भाऊ-बहीण, कवी-कवियत्रींना अक्षय्य तृतीया च्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया तर काही शुभेच्छा.

                 अक्षय तृतीया शुभेच्छा संदेश--

=========================================
--शुभ करा शुभ होईल
सुखी रहा सर्व मंगलच होईल
घरात राहा नाहीतर कोरोना होईल
अक्षय्य तृतीयेच्या शुभेच्छा

--दान करा फळ नक्की मिळेल
आज नाहीतर उद्या तरी नक्की मिळेल
अक्षय तृतीया शुभेच्छा

--अक्षय राहो मानवता
क्षय हो ईर्ष्येचा
जिंकू दे प्रेमाला आणि
हरू दे पराभवाला
सर्वांना अक्षय तृतीयेच्या शुभेच्छा

--लक्ष्मीचा वास होवो
संकटांचा नाश होवो
शांतीचा वास राहो
धनाची बरसात होवो
अक्षय तृतीयेच्या शुभेच्छा

--मनाचा दरवाजा उघडा
मनातले आहे ते बोला
अक्षय तृतीयेचा सण आहे
आनंदाच्या मधात विरघळून जा
चांगलं आरोग्य आणि भरपूर धनधान्य
या अक्षय तृतीयेला हीच आहे प्रार्थना
तुम्हा सर्वांसाठी अक्षय तृतीया शुभेच्छा

--ज्या आनंदाची अपेक्षा आहे
ती या अक्षय तृतीयेला पूर्ण होवो
तुम्हा सर्वांना अक्षय तृतीया शुभेच्छा

--नोटांनी भरलेला खिसा असो
प्रेमाने भरलेला मनाचा कप्पा असो
या अक्षय तृतीयेला मिळू दे
घरच्यांचं प्रेम हीच कामना मनोमनी असो
लक्ष्मीची कृपा अक्षय्य राहो
हीच प्रार्थना आहे अक्षय तृतीया शुभेच्छा
=========================================

--आदिती दातार
--------------

                    (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठी.popxo.कॉम)
                   --------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-22.04.2023-शनिवार.
=========================================