II रमजान ईद II-शुभेच्छा-1

Started by Atul Kaviraje, April 22, 2023, 06:54:21 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                      II रमजान ईद II
                                     -----------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-२२.०४.२०२३-शनिवार आहे. आज "रमजान ईद" आहे. रमजान महिन्यातील रोजे संपल्यानंतर ईद येते. ईदला नवीन वस्त्र परिधान करून मुस्लिम बांधव ईदगाह किंवा मशिदीत नमाज अदा करायला जातात. अल्लाच्या प्रती नमाज अदा केल्यानंतर मुस्लिम बांधव एकमेकांना आलिंगन देऊन ईदच्या शुभेच्छा देतात. या दिवशी मित्र असो वा शत्रू ते दोघांची गळाभेट घेऊन शुभेच्छा देतात. मराठी कवितेच्या माझ्या सर्व मुस्लिम भाऊ-बहीण, कवी-कवियत्रींना रमजान ईद च्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया रमजान ईद च्या हार्दिक शुभेच्छा.

     मित्रांनो रमजान ईद हा मुस्लिम बांधवांमध्ये सर्वांत पवित्र महिना मानल्या जातो. रमजान ईद च्या दिवशी मुस्लिम बांधव चंद्राची आतुरतेने वाट पाहतात. चंद्राला पाहूनच रोजा सोडले जातात. ईदला नवीन वस्त्र धारण करून मुस्लिम बांधव, मशिदीमध्ये नमाज अदा करतात. हा सण एकामेकामध्ये प्रेम आणि बंधुत्व वाढवतो.

            रमजान ईद च्या हार्दिक शुभेच्छा--

=========================================
--सर्व मुस्लिम बांधवाना रमजान ईदच्या मनापासून
हार्दिक शुभेच्छा... ईद मुबारक!

--"तुम्हाला आणि तुमच्या परिवार ला आनंदाने भरलेली ही ईद मुबारक!"

--फुलांना बहर मुबारक
शेतकऱ्याला पीक मुबारक
पक्ष्यांना उडान मुबारक
चंद्राला तारे मुबारक
आणि तुम्हास रमजान मुबारक

--"बंधुत्वाचा संदेश देऊया, विश्व बंधुत्व वाढीस लावूया, रमजान ईद दिवशी हीच धरुनी मनी इच्छा, सर्व मुस्लिम बांधवांना रमजान ईदच्या शुभेच्छा... ईद मुबारक!"

--"अल्लाह ताला पूर्ण करो तुमच्या सर्व इच्छा,
तुमच्या घरात आनंद नांदो हीच आमची सदिच्छा,
सर्व मुस्लिम बांधवांना रमजान ईदच्या शुभेच्छा...
ईद मुबारक!"

--ईद निमित्त तुम्हाला सर्वांना आनंद आणि ऐश्वर्य लाभो
ईद च्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा
ईद मुबारक!
=========================================

                  (साभार आणि सौजन्य-संदर्भ-इ स्टार्ट अप आयडिया.कॉम)
                 ---------------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-22.04.2023-शनिवार.
=========================================