II रमजान ईद II-शुभेच्छा-2

Started by Atul Kaviraje, April 22, 2023, 06:55:38 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                     II रमजान ईद II
                                    -----------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-२२.०४.२०२३-शनिवार आहे. आज "रमजान ईद" आहे. रमजान महिन्यातील रोजे संपल्यानंतर ईद येते. ईदला नवीन वस्त्र परिधान करून मुस्लिम बांधव ईदगाह किंवा मशिदीत नमाज अदा करायला जातात. अल्लाच्या प्रती नमाज अदा केल्यानंतर मुस्लिम बांधव एकमेकांना आलिंगन देऊन ईदच्या शुभेच्छा देतात. या दिवशी मित्र असो वा शत्रू ते दोघांची गळाभेट घेऊन शुभेच्छा देतात. मराठी कवितेच्या माझ्या सर्व मुस्लिम भाऊ-बहीण, कवी-कवियत्रींना रमजान ईद च्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया रमजान ईद च्या हार्दिक शुभेच्छा.

            रमजान ईद च्या हार्दिक शुभेच्छा--

=========================================
--ईद घेऊन येई आनंद
जोडू मनामनांचे बंध
सणाचा हा दिवस खास
ईद मुबारक तुम्हा सर्वांस
रमजान ईद मुबारक!

--"धर्म, जात पात यापेक्षाही मोठी असते शक्ती माणुसकीची... एकमेकांची गळाभेट घेऊन शुभेच्छा देऊयात रमझान ईदची... ईद मुबारक!"

--"नोकरी, व्यवसायात होवो वृद्धी,
धन संपत्ती ऐश्वर्य घेऊन येवो ही ईद
रोजा खोलूनी खास गळाभेटची रीत
ईद मुबारक..."

--हे चांद त्यांना माझा पैगाम दे
खुशी चा दिवस आणि हास्याची शाम दे
जेव्हा पाहतील बाहेर येऊन ते तुला
तेव्हा त्यांना माझ्याकडून ईद मुबारक बात दे..!
Happy Ramjan Eid

--"चंद्रमाला पाहूनी खोलूया रोजा
ईद निमित्त मागूया खुदाला ईच्छा
ईद फित्रच्या हार्दिक शुभेच्छा"

--"यंदाची रमजान ईद तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला
सुख शांती समृद्धी आणि आनंद घेऊन येवो हिच सदिच्छा
ईद फित्रच्या हार्दिक शुभेच्छा"
=========================================

                 (साभार आणि सौजन्य-संदर्भ-इ स्टार्ट अप आयडिया.कॉम)
                ---------------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-22.04.2023-शनिवार.
=========================================