२४-एप्रिल-दिनविशेष-अ

Started by Atul Kaviraje, April 24, 2023, 11:13:59 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-२४.०४.२०२३-सोमवार.जाणून घेऊया,आजच्या दिवसाचे "दिन-विशेष"

                                  "२४-एप्रिल-दिनविशेष"
                                 ---------------------

-: दिनविशेष :-
२४ एप्रिल
जलसंपत्ती दिन
जागतिक श्वान दिन
=========================================
अ) महत्त्वाच्या घटना:
   ----------------
२०२१
एन. व्ही. रमणा
न्यायमूर्ती नुथलापती वेंकट तथा एन. व्ही. रमणा यांनी भारताचे ४८ वे सरन्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारला.
१९९३
इंडियन एअरलाइन्सच्या फ्लाईट ४२७ या दिल्लीहून श्रीनगरला जाणार्‍या विमानाचे ३ अतिरेक्यांनी अपहरण केले. ब्लॅक कॅट कमांडोजनी केलेल्या कारवाईत तिन्ही अतिरेकी ठार झाले व सर्व १४१ प्रवाशांची सुखरुप मुक्तता झाली.
१९९०
हबल दुर्बिण
डिस्कव्हरी या अंतराळयानातुन हबल ही दुर्बिण सोडण्यात आली.
१९७०
गाम्बियाचा ध्वज
गाम्बिया प्रजासत्ताक बनले.
१९६८
मॉरिशस संयुक्त राष्ट्रांचा (United Nations) सदस्य बनला.
१९६७
वेळेवर पॅराशूट न उघडल्यामुळे व्लादिमिर कोमारोव्ह हा मृत्युमुखी पडलेला पहिला अंतराळवीर ठरला.
१८१५
भारतीय सैन्य दलातील सर्वात बलवान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोरखा रेजिमेंटची स्थापना.
१८००
अमेरिकेतील महाप्रचंड अशा लायब्ररी ऑफ काँग्रेसची (Library of Congress) स्थापना झाली. हे जगातील सर्वोत्तम ग्रंथालय आहे.
१७१७
अहमदनगरचा किल्ला
अहमदनगरचा किल्ला
खंडेराव दाभाडे यांनी अहमदनगर येथे मोगलांचा पराभव केला. [वैशाख व. ९, शके १६३९]
१६७४
केंजळगड
भोर-वाई प्रांतातील केंजळगड शिवाजी महाराजांनी स्वारी करुन जिंकला.
=========================================
ब) जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  -----------------------------
१९७३
सचिन तेंडुलकर
'मास्टर ब्लास्टर' सचिन तेंडुलकर – महान क्रिकेटपटू, भारतर‍त्‍न, पद्मविभूषण, पद्मश्री
१९७०
डॅमियन फ्लेमिंग
डॅमियन फ्लेमिंग – ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू
१९४२
बार्बरा स्ट्रायसँड
१९८० मधील छायाचित्र
बार्बरा स्ट्रायसँड – अमेरिकन अभिनेत्री, गायिका, चित्रपट निर्माती व दिग्दर्शिका
१९३८
मॅक मोहन
मोहन माकिजानी ऊर्फ 'मॅक मोहन' – मोहन माकिजानी ऊर्फ मॅक मोहन हिंदी चित्रपटांत प्रामुख्याने खलनायकाच्या किंवा खलनायकाच्या टोळक्यातील भूमिका साकारणारे अभिनेते. चेतन आनंद यांचा सहाय्यक म्हणून त्यांनी प्रथम दिग्दर्शनास सुरुवात केली. परंतु शौकत कैफ़ी यांच्या सल्ल्यामुळे ते नंतर ते अभिनयाकडे वळले. हक़ीक़त (१९६४) हा त्यांचा पहिला चित्रपट होय. आपल्या ४६ वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी डॉन, कर्ज़, सत्ते पे सत्ता, ज़ंजीर, रफ़ू चक्कर, खून पसीना इ. २०० हुन अधिक चित्रपटांत भूमिका केल्या. परंतु शोले या चित्रपटातील 'सांभा' या भूमिकेने त्यांना चांगलीच प्रसिद्धी मिळाली. ते क्रिकेटही उत्तम खेळत असत.
(मृत्यू: १० मे  २०१० - मुंबई, महाराष्ट्र, भारत )
१९२९
वसंतराव पटवर्धन – 'बँक ऑफ महाराष्ट्र'चे अध्यक्ष, अर्थतज्ज्ञ, लेखक, कवी, संस्कृतचे गाढे अभ्यासक
१९२९
डेविड ब्लॅकवेल
१९९९ मधील छायाचित्र
डेविड हेरॉल्ड ब्लॅकवेल – सांख्यिकीविज्ञानी, ब्लॅकवेल-राव प्रमेयाचे सहसंशोधक. नॅशनल अकॅडेमी ऑफ सायन्सेस वर निवड होणारे पहिले कृष्णवर्णीय अमेरिकन. कृष्णवर्णीय असल्यामुळे आपल्या कारकिर्दीत त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला.
(मृत्यू: ८ जुलै  २०१०)
१९१९
राजकुमार
राजकुमार – कन्नड चित्रपट अभिनेता व गायक
(मृत्यू: १२ एप्रिल २००६)
१९१०
राजा परांजपे
राजाभाऊ दत्तात्रय तथा 'राजा' परांजपे – चित्रपट दिग्दर्शक, निर्माते आणि अभिनेते
(मृत्यू: ९ फेब्रुवारी १९७९)
१८८९
सर स्टॅफोर्ड क्रिप्स
सर स्टॅफोर्ड क्रिप्स – मजूर पक्षाचे इंग्लिश राजकारणी, बॅरिस्टर, मुत्सद्दी
(मृत्यू: २१ एप्रिल १९५२)
१८९६
रघुनाथ वामन दिघे – रसाळ लेखन करणारे कादंबरीकार. 'पाणकळा', 'सराई', 'पड रे पाण्या', 'आई आहे शेतात', 'गानलुब्धा', 'मृगनयना' वगैरे त्यांच्या कादंबर्‍या अतिशय गाजल्या. (मृत्यू: ४ जुलै १९८०)
=========================================

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-24.04.2023-सोमवार.
=========================================