दिन-विशेष-लेख-जलसंपत्ती दिन-ब

Started by Atul Kaviraje, April 24, 2023, 11:21:24 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                   "दिन-विशेष-लेख"
                                    "जलसंपत्ती दिन"
                                  -----------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-24.04.2023-सोमवार आहे, २४ एप्रिल हा दिवस "जलसंपत्ती दिन" म्हणूनही ओळखला जातो. वाचूया, तर या दिवसाचे महत्त्व, आजच्या या "दिन-विशेष-लेख" या शीर्षकI-अंतर्गत.

     आज आपण ज्या परिस्थितीतून जात आहोत त्यात फ्रँकलीन यांच्या शब्दांना अत्यंत महत्त्व प्राप्त झाले आहे. याशिवाय भारतीय तत्त्वज्ञानाचे दर्शन घडविणाऱ्या वरील पंक्तीही आढळतात. त्यात पाण्याचे महत्त्व दर्शविण्यात आले आहे. आगामी दोन दशकात पाण्याची जी टंचाई जाणवणार आहे, ते चित्र अत्यंत भीषण असणार आहे. कारण पाण्याची मागणी दिवसेंदिवस वाढते आहे आणि पाण्याची उपलब्धता मात्र कमीकमी होत आहे. २०३०पर्यंत पाण्याच्या मागणीत दुपटीने वाढ होईल, असा अंदाज आहे. पाण्याची मागणी वाढेल असा आंतरराष्ट्रीय जल संधारन समुहाने जो अभ्यास केला आहे, त्याचा तो निष्कर्ष आहे. २०३० पर्यंत पाण्याची मागणी ७०० शतकोटी घनमीटरपासून वाढून १४९८ शतकोटी इतकी होणार आहे. विशेषत: हिमालयाच्या परिसरात असलेल्या नेपाळ, चीन, बांगलादेश या देशांसह भारतात पाण्याची उपलब्धता अधिक बिकट व भयानक होण्याची शक्यता आहे. दरवर्षी २७५ शतकोटी पाण्याची होणारी टंचाई हे आपल्यासाठी मोठे आव्हान आहे. गंगा, ब्रह्मपुत्रा यासारख्या पवित्र समजल्या जाणाऱ्या नद्यांतील पाण्याची पातळी किती प्रमाणात कमी होईल, हा चिंतेचा विषय असणार आहे. एक बॅरल पाण्याची किंमत एक बॅरल खनिज तेलापेक्षा अधिक असेल, तो दिवस फार दूर नाही. या संभाव्य धोक्याचा अदमास घेवून आपण धोक्याचा सामना करण्यासाठी आतापासून सिद्ध होण्याची गरज आहे. जलसंरक्षणाच्या कार्यासाठी प्रत्येक नागरिकाने योगदान देण्याची आश्यकता आहे. पाण्याचा प्रश्न आपण सरकारकडे सोपवून आपण मोकळे होत असतो. पण प्रत्येक नागरिकाने या प्रश्नांचा गांभीर्याने विचार करायला हवा. कारण काळ जितक्या वेगाने पुढे सरकत आहे, तितक्याच वेगाने प्रश्नांचे गांभिर्यही वाढते आहे.

     पाण्याची व्यवस्था करण्यासाठी ४७ राष्ट्रे गांभिर्याने संशोधन करीत आहेत. आपणही त्या दिशेने पावले उचलायला सुरूवात केली आहे. सर्व साधनाचा आणि प्रतिभाचा उपयोग करण्याची आवश्यकता आहे. कमी खर्चात चांगले परिणाम देवू शकणाऱ्या योजना आम्ही तयार केल्या पाहिजेत. जेणे करून पावसाच्या कमतरतेमुळे होणारे पिकांचे नुकसान किंवा पुराच्या पाण्याचा होणारा विनाश आपण टाळू शकू. कमी पावसामुळे कृषी उत्पादनात होणारी घट ही आपल्यापुढील गंभीर समस्या आहे.

     हवामानाला अनुकूल शेती करण्याच्या दृष्टीने अनेक पर्यायांवर प्रयोग सुरू आहेत. पण, म्हणावे तसे यश आपल्याला येत नाहीत. भारतातला पाऊस हा लहरी आहे. म्हणून शेतीचे बरेच नुकसान वेळोवेळी होतात. जल संरक्षणासाठी ठिबक सिंचनाचा वापर केल्याने शेतीत पारंपरिक पद्धतीने पाणी भरणे थांबवता येईल. मेगा पॉवर डॅम किंवा वीजनिर्मितीचे लहान घटक तयार करण्यासाठी कठोर नियंत्रणाची गरज पडणार आहे. कारण त्यासाठी पाणी जास्त लागल्याने सिंचनासाठी व पिण्यासाठी कमतरता निर्माण होते. लोकांना पिण्यासाठी स्वच्छ व सुरक्षित पाणी उपलब्ध व्हावे हा संयुक्त राष्ट्र संघाचासुद्धा संकल्प आहे. भारत त्या दिशेने पावले उचलून जल संरक्षण व पावसाच्या पाण्याचा संचय, यासारख्या उपायांची अंमलबजावणी करू लागला आहे. जलाशिवाय उपायाची अंमलबजावणी करू लागला आहे. जलतंत्रज्ञान आणि जलप्रबंधनाच्या क्षेत्रात आपण युनेस्कोची मदत घेत आहोत.

     देशाातील गंगा, यमुना आणि इतर नद्यामंध्ये औद्योगिक कचरा टाकण्यात आल्याने या नद्यांचे पाणी पिण्यायोग्य उरलेले नाही. पाण्यामुळे होणाऱ्या रोगराईचे संकट सामान्य माणसांना सतत भेडसावत असते. आरोग्याच्या समस्यांना तोंड द्यावे लागते. म्हणून जलवायु परिवर्तन आणि जलसंकट यांची युती भारतात झाली आहे. तिला तोंड देण्यासाठी प्रभावी उपायांची आवश्यकता आहे.

-एल. टी. लवात्रे, नागपूर
---------------------

                   (साभार आणि सौजन्य-संदर्भ-महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
                  ---------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-24.04.2023-सोमवार.
=========================================