दिन-विशेष-लेख-सिएरा लिओनचा स्वातंत्र्यदिन-A

Started by Atul Kaviraje, April 27, 2023, 10:38:02 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                    "दिन-विशेष-लेख"
                              "सिएरा लिओनचा स्वातंत्र्यदिन"
                             ----------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-27.04.2023-गुरुवार आहे, २७ एप्रिल हा दिवस "सिएरा लिओनचा स्वातंत्र्यदिन" म्हणूनही ओळखला जातो. वाचूया, तर या दिवसाचे महत्त्व, आजच्या या "दिन-विशेष-लेख" या शीर्षकI-अंतर्गत.

सिएरा लिओन : आफ्रिकेच्या पश्चिम किनाऱ्यावरील एकस्वतंत्र देश. याचा विस्तार ६° ५५′उ. ते १०°  उ. अक्षांश व १०° १६′प.ते १३° १८′प. रेखांश यांदरम्यान असून देशाची दक्षिणोत्तरलांबी ३३८ किमी, पूर्व-पश्चिम रुंदी ३०४ किमी. वक्षेत्रफळ७१,७४० चौ. किमी. आहे. लोकसंख्या ६०,१९,००० (२०१०).उत्तरेस व पूर्वेस गिनी, आग्नेयीस लायबीरिया, दक्षिणेस व पश्चिमेसअटलांटिक महासागर यांनी हा देश वेढलेला असून महासागरातीलबानाना, टर्टल, शरब्रो या प्रमुखबेटांशिवाय तास्सो, यॉर्क व अन्यलहान द्वीपांचा समावेश सिएरा लिओनमध्ये होतो. देशाला सु. १,३६४किमी. ( पैकी सागरी ४०६ किमी.) लांबीची सरहद्द लाभलेली आहे.फ्रीटाउन ( लोक. ७,७२,८७३–२००४) हे पश्चिम किनाऱ्यावरील सागरीबंदर देशाच्या राजधानीचे ठिकाण आहे.

भूवर्णन : सिएरा लिओनच्या भूरचनेत विविधता दिसून येते. तीनुसारदेशाचे चार भौगोलिक विभाग पडतात.  राजधानी फ्रीटाउनच्याभोवतालचा द्वीपकल्पीय प्रदेश. सु. ४० किमी. लांब व १६ किमी.रुंदीचा हा भूप्रदेश असून अगदी किनाऱ्यालगतचा प्रदेश वगळता हाबहुतांशडोंगराळ व विशेषतः दक्षिण भाग जंगलयुक्त आहे. सस.पासूनसु. ८०० मी. उंचीच्या या प्रदेशातील पिकेट हिल हा ८८८ मी.उंचीचा सर्वोच्च भाग आहे. याच्या डोंगराळ भागात उगम पावणाऱ्यालहान-मोठ्या नद्यांमुळे या प्रदेशाला भरपूर पाणीपुरवठा झाला आहे. किनाऱ्यालगतचा दलदलयुक्त प्रदेश. उत्तरेस स्कारसीझ नदीमुखखाडीपासून दक्षिणेस लायबीरिया सरहद्दीपर्यंतची या विभागातील सागरीकिनारपट्टी बव्हंशी मँग्रूव्ह वनस्पतींनी व भरतीच्या पाण्याने निर्माण झालेल्यादलदलींनी व्यापलेली आहे. हा सु. ८० किमी. रुंदीचा दलदलयुक्त सपाटप्रदेश आहे.  अंतर्भागातील मैदानी प्रदेश. हा गवताळ प्रदेश असूनअनेक लहान टेकड्यांनी व कमी उंचीच्यामैदानांनी बनलेला आहे. देशाचा उत्तर भाग. सस.पासून सु. ५०० मी. उंचीवर हा पठारी प्रदेशआहे. याच्या पश्चिमेससु. ७०० मी. उंचीची सुला मौंटन्स ही टेकड्यांचीरांग पसरलेली असून ईशान्य भाग सु. १,८०० मी. उंचीचा आहे. तोलोमा पर्वतरांग व विंगी टेकड्यांनी व्यापलेल्या ग्रॅनाइटी खडकांनीबनलेला दिसून येतो. मौंट लोमा मानसा किंवा बिंतिमानी (१,९४८ मी.)हे देशातील सर्वोच्च शिखर याच प्रदेशात लोमा पर्वतात आहे. दक्षिणेकडील कमी उंचीच्या मैदानांचा जंगलव्याप्त प्रदेश अनेक ठिकाणीलहान लहान टेकड्यांमुळे खंडित झालेला आहे. उत्तरेकडच्या पठारी वडोंगराळ प्रदेशात स्कारसीझ (२५६ किमी.), रोकेल किंवा सिएरालिओन (४०० किमी.), जाँग (१६० किमी.), सेवा, मोआ, मानो,बॅफी, सेली इ. अनेक लहान-मोठ्या नद्या उगम पावतात. बहुतेक नद्याईशान्य-नैर्ऋत्य दिशेने वाहतात वअटलांटिक महासागराला मिळतात.किनारी भागात या नद्यांमुळे नदीमुखखाड्या निर्माण झाल्या असून ग्रेट स्कारसीझ, रोकेल, जाँग इ. नद्यांचे खालच्या टप्प्यातील प्रवाह लहानपडाव अथवा नावांतून वाहतुकीस उपयुक्त ठरले आहेत.

हवामान : येथील हवामान उष्णकटिबंधीय प्रकारचे असून पश्चिमआफ्रिकेतील सर्वांत आर्द्र प्रदेशात सिएरा लिओनचा समावेश होतो.देशात सर्वत्र तापमान, आर्द्रता व पर्जन्य यांचे प्रमाण जास्त असूनकिनारी व पूर्वेकडील पठारी भागात वार्षिक सरासरी तापमान २७° से.असते. नोव्हेंबर ते एप्रिल हा काळ कोरड्या ऋतूचा (उन्हाळा), तरइतर काळ वर्षाऋतूचा असतो. एप्रिल हा सर्वांत जास्त तापमानाचा(३६° से.) महिना असतो. एप्रिल ते जून व सप्टेंबर ते ऑक्टोबर याकालावधीत सहारा वाळवंटी प्रदेशातून हरमॅटन वारे या प्रदेशाकडेवाहतात. जुलै ते सप्टेंबर या काळात आर्द्रता जास्त असते व पावसाचेप्रमाणही सर्वाधिक असते. किनारी भागात, विशेषतः द्वीपकल्पीयडोंगराळ व उंच भागांत, पावसाचे प्रमाण जास्त म्हणजे वार्षिक सरासरी५८० सेंमी. पेक्षाही अधिक असते. उत्तर व पूर्व भागांत त्या मानानेपर्जन्याचे प्रमाण कमी ( सरासरी सु. २५० ते २०० सेंमी.) होत जाते.देशात वार्षिक सरासरी ३४३ सेंमी. पाऊस पडतो.

--कुंभारगावकर
--------------

                (साभार आणि सौजन्य-संदर्भ-विश्वकोश.मराठी.gov.इन)
               -------------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-27.04.2023-गुरुवार.
=========================================