दिन-विशेष-लेख-सिएरा लिओनचा स्वातंत्र्यदिन-B

Started by Atul Kaviraje, April 27, 2023, 10:39:27 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje


                                    "दिन-विशेष-लेख"
                             "सिएरा लिओनचा स्वातंत्र्यदिन"
                            ----------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-27.04.2023-गुरुवार आहे, २७ एप्रिल हा दिवस "सिएरा लिओनचा स्वातंत्र्यदिन" म्हणूनही ओळखला जातो. वाचूया, तर या दिवसाचे महत्त्व, आजच्या या "दिन-विशेष-लेख" या शीर्षकI-अंतर्गत.

वनस्पती व प्राणी : सिएरा लिओनचा समावेश वर्षारण्यांच्या प्रदेशातहोतो. देशाचा सु. ४० टक्क्यांपेक्षा जास्त भाग जंगलांनी व्यापलेलाआहे. कोरड्या ऋतूच्या तीव्रतेमुळे इतर भागात ( दक्षिण मध्य भागात )कमी प्रतीची झुडूपेआढळतात. डोंगर-टेकड्यांचे उतार व जास्त पावसाचाप्रदेश यांमध्ये जंगलांचे प्रमाण जास्त आहे. २५ ते ३० टक्के ( विशेषतःउत्तर भाग ) क्षेत्र सॅव्हाना गवताळ प्रदेशाने, तर १० ते २० टक्के( मुख्यत्वे पश्चिम भाग ) क्षेत्र दलदलीच्या वनस्पतींनी व्यापले आहे.येथील जंगलांत आफ्रिकन मॅहॉगनी व साग, रोजवूड, सिल्ककॉटन, कोला, नट, एबनी, ओडम ( स्थानिक नाव ) इ. वृक्षप्रकार मोठ्या प्रमाणातआढळतात. सागर किनारी प्रदेशात मँग्रूव्ह, नारळ तर सपाट मैदानी प्रदेशाततेल्या ताड, गोरखचिंच, झुडुपांचे काही प्रकार इ. वनस्पती दिसून येतात.देशात सु. ३,००० चौ. किमी.चे राखीव जंगल व १३० चौ. किमी.चेसंरक्षित जंगल होते (२००४). जंगलांत विविध प्रकारची माकडे, चिंपँझी, टायगर कॅट, सायाळ, हरीण, हत्ती, सिंह, तरस, गवा, पाणथळजागीसुसरी इ. प्राणी आढळतात. आफ्रिकेच्या अन्य प्रदेशातून नामशेष होतचाललेला व आफ्रिकेतील सुंदर पक्षी म्हणून ओळखला जाणारा एमरल्डककू ( हिरवा कोकिळ ) या देशात आढळतो. याशिवाय बुलबुल, सेनेगल फायरफिंच, आफ्रिकन स्विफ्ट, डायड्रिक ककू ( हिरवा-पांढराआफ्रिकन कोकिळ ), ब्राँझ मॅनकिन, बगळे इ. पक्षी दिसून येतात.यांशिवाय हिवाळ्यामध्ये अनेक पक्षी यूरोपातून सिएरा लिओनमध्ये येतात.

इतिहास व राज्यव्यवस्था : पुरातत्त्वीय संशोधनानुसार सिएरा लिओनच्या प्रदेशात इ. स. ८०० मध्ये लोखंडाचा वापर माहीत होता.इ. स. १००० मध्ये याच्या किनारी प्रदेशातील लोक शेती करत होते.देशाच्या किनारी प्रदेशातील बुलोम, नालाऊ व क्रिम तसेच पूर्व भागातील किस्सी व गोला आणि वारा वारा पर्वतरांगांच्या पायथ्याच्याप्रदेशात राहणारे लिंबा हे सु. दहाव्या शतकापासूनच येथील रहिवासीअसावेत. तेराव्या शतकाच्या बहुधा सुरुवातीस प्रगत देशांतून काहीलोक या प्रदेशाच्या उत्तर व पूर्व भागातील सॅव्हाना गवताळ भागात आलेअसावेत. पोर्तुगीज दर्यावर्दी अल्व्हारो फेर्नांदेझ हा रोकेल नदीमुखखाडीमध्ये १४४७ मध्ये आला होता. त्यानंतर पेद्रो दा सिंत्रा हा पोर्तुगीजसमन्वेषक १४६२ मध्ये या प्रदेशात आला व तेव्हापासून यूरोपीयांचाया भागाशी सतत संपर्क आला असावा. फ्रीटाउनच्या परिसरातीलटेकड्यांचे वर्णन त्यांनी 'सिएरालिओन' ( लायन मौंटन्स ) असे केल्याचेदिसते व त्यावरुन या प्रदेशास हे नाव पडले असावे.

     सोळाव्या शतकात यूरोपीयांनी सिएरा लिओनमधून गुलामांची खरेदीकरण्यास सुरुवात केली. जरी अमेरिकेतून गुलामांनामोठी मागणी होती,तरी सिएरा लिओनमधून वर्षातून सरासरी २००० पर्यंत गुलामांची निर्यातहोत असे परंतु १७८७ नंतर ब्रिटनमधील दास्य विमोचन चळवळीचानेता ग्रॅनव्हिल शार्प याने व काही परोपकारी वृत्तीच्या लोकांनी ब्रिटन वअमेरिकेतील दोन हजारांपेक्षा जास्त गुलामांची मुक्तता करुन फ्रीटाउन येथेप्रथम खाजगी वसाहत स्थापन केली. यावसाहतीमध्ये मुक्त केलेल्यागुलामांशिवाय पळून आलेल्या व निराश्रित गुलामांचाही समावेश असे.तसेच आफ्रिकेतूनगुलाम घेऊन जाणाऱ्या बोटी पकडून त्यांतील गुलामांनामुक्त केले जात असे. त्यामुळे फ्रीटाउन येथील वसाहतीतील गुलामांची संख्या झपाट्याने वाढली. त्यातच १८०७ मध्ये गुलामांचा व्यापारकरण्यास कायद्याने बंदी आली आणि १८०८मध्ये ही वसाहत ब्रिटिशअंमलाखाली आली. त्यानंतर फ्रीटाउन शिवाय इतर भूप्रदेशाचे समन्वेषणकरण्यात आले आणि तोप्रदेश १८२६ मध्ये ब्रिटिश संरक्षणाखालीलमुलूख म्हणून घोषित करण्यात आला. २७ एप्रिल १९६१ रोजी सिएरालिओनला स्वातंत्र्य मिळाले परंतु तो राष्ट्रकुल देशांचा सदस्य म्हणूनराहिला. १९६७ मध्ये लष्करी सत्तेने नागरी सत्तेचा पाडाव केला. परंतुएक वर्षानंतर नागरी सत्तेने लष्कराकडून सत्ता हस्तगत केली आणि नागरीकायदा पुन्हा प्रस्थापितकरुन १९७१ मध्ये सिएरा लिओन प्रजासत्ताकदेश झाला. देशात १९७८ मध्ये एकपक्षीय राज्यपद्धतीहोती तथापि१९९२ मध्ये देशाची आर्थिक स्थिती बिकट होणे, मंत्रिमंडळाचा सततचाअंदाधुंद राज्यकारभारआणि पाशवी यादवी युद्घ इ. कारणांमुळे देशातदडपशाही होत आहे, या कारणास्तव लष्कराने सत्ता हस्तगत केली.शेवटी १९९९ मध्ये शांततेचा करार झाला आणि १४ मे २००२ रोजीदेशात अध्यक्षीय व लोकसभेची सार्वत्रिक निवडणूक झाली. तीमध्येसिएरा लिओन पीपल्स पार्टीचे नेते अहमद तेजान कब्बाह हे अध्यक्षम्हणून निवडून आले. २००७ मध्ये एर्नेस्ट कोरोमा हे अध्यक्ष होते.

--कुंभारगावकर
--------------

                (साभार आणि सौजन्य-संदर्भ-विश्वकोश.मराठी.gov.इन)
               -------------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-27.04.2023-गुरुवार.
=========================================