दिन-विशेष-लेख-सिएरा लिओनचा स्वातंत्र्यदिन-C

Started by Atul Kaviraje, April 27, 2023, 10:40:45 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                   "दिन-विशेष-लेख"
                             "सिएरा लिओनचा स्वातंत्र्यदिन"
                            ---------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-27.04.2023-गुरुवार आहे, २७ एप्रिल हा दिवस "सिएरा लिओनचा स्वातंत्र्यदिन" म्हणूनही ओळखला जातो. वाचूया, तर या दिवसाचे महत्त्व, आजच्या या "दिन-विशेष-लेख" या शीर्षकI-अंतर्गत.

खनिजे : देशात विविध प्रकारची खनिजे आढळतात. जलोदीयमृदेमध्ये, विशेषतः सेवा नदीच्या वरच्या टप्प्यात, हिऱ्याच्या खाणीआहेत. व्यापारीदृष्ट्या  हिऱ्याच्या खाणींचे काम १९३० मध्ये प्रथम कोनीजिल्ह्यात सुरु झाले. हिऱ्यांशिवाय देशातबॉक्साइट, इल्मेनाइट, रुटाइल,लोहधातुक या प्रमुख खनिजांशिवाय अँटिमनी, कोलंबाइट, टिटॅनियम,टंगस्टन, जस्त, सोने, चांदी इ. खनिजे वा त्यांची धातुके आढळतात.

न्याय व संरक्षण : येथील न्यायदानाची व्यवस्था ब्रिटिश न्यायपद्घतीवरआधारलेली असून स्थानिक न्यायालये पारंपरिक कायदा व रुढी विचारात घेऊन न्यायदानाचे काम करतात. स्थानिक व जिल्हा न्यायालये, उच्च न्यायालय, अपिलीय न्यायालय व सर्वोच्च न्यायालय असे येथीलन्यायदानपद्घतीतील टप्पे आहेत. देशात मृत्युदंडाच्या शिक्षेची तरतूद आहे.

     सहा वर्षांसाठी युद्घविरामाची अंमलबजावणी करण्याच्या अटीवर देशातून डिसेंबर २००५ पासून संयुक्त राष्ट्रांची शांतिसेना काढून घेण्यातआली आहे परंतु जानेवारी २००६ पासून येथील प्रशासनाला देशात शांतता राखण्याच्या कार्यात सहकार्य करण्याच्या उद्देशाने संयुक्त राष्ट्रांचेएक कार्यालय येथे ठेवण्यात आले आहे. येथील यादवी युद्घानंतर मूळचेलष्कर काढून टाकण्यात आले असून नवीन 'नॅशनल आर्मी' चेस्थापना करण्यात आली आहे. देशाचे छोटे नौदल फ्रीटाउन येथे असूनते किनारी प्रदेशाचे संरक्षण करते. सिएरा लिओन संयुक्त राष्ट्रांचा वजागतिक बँकेचा सभासद आहे.

आर्थिक स्थिती : सिएरा लिओनची विकसित मिश्र अर्थव्यवस्थाआहे. ही अर्थव्यवस्था मुख्यतः शेती उत्पादन व खनिज संपत्तीवरअवलंबून आहे. आयात किंमतीत वाढ, खनिज उद्योगधंदे कमी होणेतसेच अकार्यक्षम मनुष्यबळ व प्रशासन इ. कारणांमुळे आर्थिक विकासाचादर कमी होत आहे. ज्याप्रमाणात लोकसंख्येची वाढ होत आहे, त्याप्रमाणात राष्ट्रीयउत्पन्नात वाढ होत नाही. सिएरा लिओनचे दरडोई उत्पन्नजगामध्ये सर्वांत कमी आहे. देशाच्या अंतर्गत उत्पन्नामध्ये शेती उत्पन्नाचाहिस्सा ४०% आहे. त्यामध्ये एकूण लोकसंख्येच्या ६१% लोक(२००२) शेतीकाम करतात. बहुतेक पुरुष शेतकरी आहेत. ते त्यांच्याकुटुंबाला पुरेल इतकेच उत्पादन काढतात आणि उन्हाळ्यात हिऱ्याच्याखाणींत काम करतात.पुष्कळ स्त्रिया स्थानिक बाजारात भाजीपाला वइतर किरकोळ वस्तू विकतात. शेती उत्पन्नामध्ये ( उत्पादन हजार टनांत २००३) भात (२५०), कसाव्हा (३७७), ऊस (२४), केळी (३०),रताळी (२५) या मुख्य पिकांशिवाय तूर, वाटाणा, आले, भुईमूग इ.पिके घेतली जातात. भात हे मुख्य अन्नधान्य पीक आहे. कॉफी, कोको (काकाओ) व पामतेल ( उत्पादन ३६,००० टन –२००३) ह्यांचे मुख्यतःनिर्यात करण्यासाठी उत्पादन घेतात. शेतीबरोबर गुरेपालनाचा व्यवसायचालतो. देशात २००३ मध्ये ( आकडे हजारात ) गुरे ४००, मेंढ्या ३७५,शेळ्या २२०, डुकरे ५२ इतके पशुधन होते. याच वर्षी देशात ८० लक्षकोंबड्या होत्या. २००५ मध्ये १,४५,९९३ टन मत्स्योत्पादन झाले.

--कुंभारगावकर
--------------

                (साभार आणि सौजन्य-संदर्भ-विश्वकोश.मराठी.gov.इन)
               -------------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-27.04.2023-गुरुवार.
=========================================