दिन-विशेष-लेख-सिएरा लिओनचा स्वातंत्र्यदिन-E

Started by Atul Kaviraje, April 27, 2023, 10:43:21 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                  "दिन-विशेष-लेख"
                            "सिएरा लिओनचा स्वातंत्र्यदिन"
                           ---------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-27.04.2023-गुरुवार आहे, २७ एप्रिल हा दिवस "सिएरा लिओनचा स्वातंत्र्यदिन" म्हणूनही ओळखला जातो. वाचूया, तर या दिवसाचे महत्त्व, आजच्या या "दिन-विशेष-लेख" या शीर्षकI-अंतर्गत.

     देशात इंग्रजी ही प्रशासकीय भाषा आहे. मेंडे व टेम्ने या भाषाजास्त प्रमाणात ( विशेषतः उत्तर व दक्षिण भागांत ) बोलल्या जातात.क्रिओ ही क्रीओल लोकांची मातृभाषा असून देशाची मुख्य भाषा (राष्ट्रभाषा ) आहे. ती आफ्रिकन्स भाषांपैकी एक आहे. सिएरा लिओनमध्ये पारंपरिक 'जडप्राणवादी' धर्माशिवाय मुस्लिम व ख्रिश्चन हे दोनप्रमुख धार्मिक गट आहेत.२००१ मध्ये २५% (२·४९ दशलक्ष)मुस्लिम तर ५%ख्रिश्चन होते. ख्रिश्चन अल्पसंख्याक आहेत. देशाच्यापूर्व-मध्य भागातदाट लोकवस्ती आहे. त्याहीपेक्षा जास्त दाट लोकवस्तीपश्चिम भागात फ्रीटाउन येथे आहे. देशाच्या एकूण लोकसंख्येच्या १/३लोक शहरी भागात राहतात. शहरी भागाची दिवसेंदिवस वाढ होत आहे.लोकांच्या राहणीमानात सुधारणा होत आहे.

     सिएरा लिओनमध्ये जन्मदर पश्चिम आफ्रिकेच्या मानाने कमीअसला, तरी आफ्रिका खंडाच्या तुलनेने जास्त आहे. २००० मध्ये १४५सर्वसाधारण व्यवसाय करणारे डॉक्टर, १,३३१ परिचारिका व ५ दंतवैद्यहोते. तसेच १६४ रुग्णालयात ६९२ खाटा होत्या.

     सिएरा लिओनमध्ये प्राथमिक शिक्षण अंशतः मोफत असले, तरीसक्तीचे नाही. २००३ मध्ये साक्षरतेचे प्रमाण २९·६% ( पुरुषांमध्ये३९·८% तर स्त्रियांमध्ये २०·५%) होते. २००१-०२ मध्ये २,७०४प्राथमिक शाळांमध्ये ५,५४,३०८ विद्यार्थी व १४,९३२ शिक्षक होते.तसेच २०००-०१ मध्ये २४६ माध्यमिक शाळांत १,०७,७७६ विद्यार्थीव ५,२६४ शिक्षक होते. शिक्षकप्रशिक्षण संस्थांमध्ये ९,६६० विद्यार्थीव १,३२१ शिक्षक होते. १७४ तांत्रिक व व्यवसाय शिक्षण संस्थांमध्ये४९,४८८ विद्यार्थी व २,५१४ शिक्षक होते. ५ उच्च शिक्षण संस्थांत४,७४२ विद्यार्थी व ६०० शिक्षक होते. फ्रीटाउन येथे सिएरा लिओनविद्यापीठ ( स्था. १९६७) आहे. फोराह बे महाविद्यालय व एन्. जालायुनिव्हर्सिटी ही दोन महाविद्यालये सिएरा लिओन विद्यापीठाशी संलग्न आहेत.

     परदेशांशी व्यापार, हिऱ्यांच्या खाणी, तसेच पाश्चिमात्यांचे अनुकरणइ. कारणांमुळे सध्या सिएरा लिओनमध्ये काही प्रमाणात बदल घडूनयेत आहेत. देशात पर्यटन व्यवसाय हळुहळू विकसित होत आहे. २००४मध्ये ४४,००० पर्यटकांनी देशाला भेट दिली. फ्रीटाउन येथील पुळणी, बिंतिमानी व लोमा पर्वत येथील निसर्गसौंदर्य, सोनफॉन सरोवर, बुंबुनाधबधबा इ. पर्यटकांची प्रमुख आकर्षणे आहेत.

--कुंभारगावकर
--------------

                (साभार आणि सौजन्य-संदर्भ-विश्वकोश.मराठी.gov.इन)
               -------------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-27.04.2023-गुरुवार.
=========================================