तिच्या आठवणी

Started by कवी अमोलभाऊ शिंदे पाटील, April 29, 2023, 05:41:07 AM

Previous topic - Next topic

कवी अमोलभाऊ शिंदे पाटील

तिच्या आठवणींची ठेव जपून ठेवली आहे तशीच
मोबाईल मधील एक दोन फोटो पाहून
तिला आठवत रडत बसतो कधी कधी
पण ती वाऱ्याची झुळूक होऊन टपली देऊन जाते रडू नकोस रे आहे मी इथेच तुझ्या जवळ
पण तेच फोटो डिलीट झालेत माझ्याकडून
वाटलं तिच्या आठवणी संपल्या आता
पण काळजावर कोरलेला फोटो अजून तसाच आहे
खुणावतो कधी कधी मी झोपेत असताना
तेव्हांडाच एक आधार आहे मला ती सोबत नसतांना

वर्गातमध्ये असताना आमचं बोलणं कमीचं व्हायचं
तरी ती म्हणायची आपलं प्रेम असंच शेवटपर्यंत न्यायचं
कॉलेज सुटल्यावर भेटण्यासाठी तिची ओढ असायची
तरी पण ती कुठेतरी नजरचुकवून लपून  बसायची
मी आपला वेड्यासारखा तिला शोधत बसायचो
माझी तडफड बघून ती मात्र गोड हसायची
तिचं हसू बघून मला ही आनंद व्हायचा
मला तिचं हसू कायमचं ठेवायचं होतं
तिला सोबत नेऊन थेट मंडपात न्यायचं होतं

आता तिचं माझं बोलणं होतच नाही
तिचं एक टक पाहणं गाली हसणं
रोज नटून थटून तिनं व्हॉट्सअप dp बदलणं
आता कुठं निघून गेली कोणास ठाऊक
मानला चटका देऊन गेली की काय
असाच प्रश्न पडतो नेहमी ....
पण मन म्हणत तसं होणार नाही
ती तुझा हात कधीच सोडणार नाही

अजून ही स्वप्नात येऊन रुसून बसते ती
का कोणास ठाऊक असं का करते ती
तिचा रुसवा काढतांना सकाळ कधी होते कळत नाही
दिवसभर त्याचं प्रश्नाचं उत्तर शोधतांना
पुन्हा रात्र कधी होते कळतं नाही
ती पुन्हा स्वप्नात येते तशीच रुसून बसलेली
आज तरी रुसवा काढू तिचा असंच वाटत नेहमी
पण तिचा रुसवा अजून ही तसाच आहे
अजून ही काय करावं मला सुचतं नाही

आमचं ठरलंच होतं एकमेकांचा हात सोडायचा नाही
प्रेमाचा मांडलेला डाव शेवटपर्यंत मोडायचा नाही
पण नशिबाला ते ही मान्य नव्हतं
हेच आता सारं स्वप्नांच्या दुनियेत हरवून  गेलं
तिचं प्रेम मृगजळा सारखं विरून गेलं

कविराज..अमोल...
अहमदनगर.मो.७८२८८९५५५५
😔😔😔😔😔आठवणी