३०-एप्रिल-दिनविशेष

Started by Atul Kaviraje, April 30, 2023, 11:26:44 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-३०.०४.२०२३-रविवार. जाणून घेऊया,आजच्या दिवसाचे "दिन-विशेष"

                                   "३०-एप्रिल-दिनविशेष"
                                  --------------------

-: दिनविशेष :-
३० एप्रिल
जागतिक बालकामगार विरोधी दिन
=========================================
अ) महत्त्वाच्या घटना:
   ----------------
२००९
ख्रायस्लर कंपनीने दिवाळखोरी घोषित केली. (स्थापना: १९२५)
१९९६
थेऊर येथील श्री चिंतामणी मंदिराच्या आवारातील श्रीमंत थोरले माधवराव पेशवे यांच्या स्मृ्तिमंदिराचे उद्‍घाटन झाले.
१९९५
ऊत्तर आयर्लंडला भेट देणारे बिल क्लिंटन हे अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष ठरले.
१९७७
९ राज्यांमधील विधानभा बरखास्त. जनसंघ, समाजवादी पक्ष, संघटना कांग्रेस आणि भारतीय लोकदल या पक्षांनी 'जनता पक्ष' स्थापन करण्याचा निर्णय घेतला.
१९३६
वर्ध्याजवळ महात्मा गांधींनी सेवाग्राम आश्रम स्थापन केला.
१७८९
जॉर्ज वॉशिंग्टन हे अमेरिकेचे पहिले निवडलेले राष्ट्राध्यक्ष बनले.
१६५७
छत्रपती शिवाजी महाराजांनी मोगलांच्या ताब्यात असलेल्या जुन्नरवर हल्ला करुन ते लुटले.
=========================================
ब) जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  -----------------------------
१९८७
रोहित शर्मा – क्रिकेटपटू
१९२६
श्रीनिवास खळे
श्रीनिवास विनायक खळे तथा 'खळे काका' – संगीतकार, पद्मभूषण (२०१०)
(मृत्यू: २ सप्टेंबर २०११)
१९१०
श्रीरंगम श्रीनिवास राव ऊर्फ 'श्री श्री' – साहित्य अकादमी पुरस्कार विजेते तेलगु कवी व गीतकार
(मृत्यू: १५ जून १९८३)
१९०९
तुकडोजी महाराज
१९९५ मध्ये जारी केलेले टपाल तिकीट
माणिक बंडोजी इंगळे ऊर्फ 'राष्ट्रसंत तुकडोजी महाराज' – ईश्वरभक्तीबरोबरच समाजसुधारणेचे विषयही कीर्तनात हाताळल्याने त्यांना 'राष्ट्रसंत' असे संबोधले जाते. 'ग्रामगीता' हा त्यांचा ग्रंथ प्रसिद्ध आहे.
(मृत्यू: ११ आक्टोबर १९६८)
१८७०
धुंडिराज गोविंद ऊर्फ 'दादासाहेब' फाळके – भारतीय चित्रपट उद्योगाचे जनक, लेखक, छायाचित्रकार, दिग्दर्शक, संकलक, वेशभूषाकार, कलादिग्दर्शक इ. अनेक जबाबदार्‍या ते सांभाळत असत.
(मृत्यू: १६ फेब्रुवारी १९४४)
१७७७
कार्ल फ्रेड्रिक गाऊस – जर्मन गणितज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञ, आर्किमिडीज व न्यूटन यांच्या तोडीचे गणितज्ञ, इलिप्टीक फंक्शन्स व नॉन युक्लिडियन जॉमेट्री इ. विषयांवर त्यांचा मोठा अभ्यास होता.
(मृत्यू: २३ फेब्रुवारी १८५५)
=========================================
क) मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
    -------------------------
२०२१
सोली सोराबजी
सोली जहांगीर सोराबजी – ॲटर्नी जनरल ऑफ इंडिया (७ एप्रिल १९९८ ते ४ जून २००४), सॉलिसिटर जनरल ऑफ इंडिया (१९७७ ते १९८०), पद्मविभूषण (२००२), 'ट्रान्स्परन्सी इंटरनॅशनल' चे अध्यक्ष [Covid-19]
(जन्म: ९ मार्च १९३० - मुंबई)
२०२०
ऋषी कपूर
कभी कभी (१९७६) । सौजन्य: यशराज फिल्म्स
ऋषी कपूर – अभिनेता, दिग्दर्शक व चित्रपट निर्माता
(जन्म: ४ सप्टेंबर १९५२)
२००३
वसंत पोतदार – मराठी साहित्यिक
(जन्म: २० नोव्हेंबर १९३९ - आष्टी, उस्मानाबाद)
२००१
श्रीपाद अच्युत दाभोळकर – 'प्रयोग परिवार' या संकल्पनेचे प्रवर्तक, गणितज्ञ आणि जमनालाल बजाज पुरस्काराने गौरवण्यात आलेले कृषीशास्त्रज्ञ
(जन्म: २१ ऑगस्ट १९२४)
१९९२
आगाजान बेग ऊर्फ 'आगा' – आपल्या निखळ विनोदानी रसिकांच्या पसंतीस उतरलेले अभिनेते
(जन्म: २१ मार्च १९१४)
१९४५
नाझी जर्मनीचा हुकूमशहा अ‍ॅडॉल्फ हिटलर याने आत्महत्या केली.
(जन्म: २० एप्रिल १८८९)
१९१३
मोरो केशव दामले – व्याकरणकार व निबंधकार
(जन्म: ७ नोव्हेंबर १८६८)
१८७८
साक्षात्कारी सत्पुरुष व दत्तावतारी स्वामीमहाराज अक्‍कलकोट यांनी समाधी घेतली. [चैत्र व. १३ शके १८००]
(जन्म: ? ? ????)
१०३०
गझनीचा महमूद
(जन्म: २ आक्टोबर ९७१)
=========================================

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-30.04.2023-रविवार.
=========================================