दिन-विशेष-लेख-जागतिक अस्थमा निवारण दिन

Started by Atul Kaviraje, May 01, 2023, 11:57:51 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                 "दिन-विशेष-लेख"
                           "जागतिक अस्थमा निवारण दिन"
                          -----------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-01.05.2023-सोमवार आहे, 01 मे हा दिवस "जागतिक अस्थमा निवारण दिन" म्हणूनही ओळखला जातो. वाचूया, तर या दिवसाचे महत्त्व, आजच्या या "दिन-विशेष-लेख" या शीर्षकI-अंतर्गत.

     आज (01 मे) 'जागतिक दमा दिन' (World Asthma Day) आहे. हा दिवस लोकांना दम्याच्या आजाराबाबत जागरूक करण्यासाठी साजरा केला जातो. दमा हा श्वसनमार्ग आणि फुफ्फुसांशी संबंधित एक गंभीर आजार आहे, ज्यामध्ये अनेक वेळा रुग्णाला योग्य वेळी उपचार न मिळाल्यास त्याचा जीवही जाऊ शकतो

      World Asthma Day : जाणून घ्या अस्थमाची लक्षणे आणि उपचार--

     अस्थमा हा श्वसनासंबंधी एक आजार आहे. दरवर्षी मे महिन्याच्या पहिल्या मंगळवारी जागतिक अस्थमा दिन म्हणून पाळला जातो. या वर्षी आज म्हणजेच 5 मे ला हा दिवस पाळला जात आहे. अस्थमाची समस्या असणाऱ्यांना फुफ्फुसापर्यंत व्यवस्थित ऑक्सिजन पोहचत नाही व श्वास घेण्यास त्रास होतो. गर्मीमध्ये काळजी न घेतल्यास अस्थमा अटॅकचे कारण ठरू शकते. अस्थमाचे लक्षण कसे ओळखायचे आणि स्वतःला कसे सुरक्षित ठेवायचे, याविषयी जाणून घेऊया.

               कोणत्या कारणांमुळे होतो अस्थमा ?--

     अस्थमाचा आजार कोणत्याही वयात होऊ शकतो. हा आजार अनुवांशिक देखील असू शकतो. सोबतच स्मोकिंग, वायू प्रदूषण, धूळ, धूर, कॉस्मेटिक आणि अगरबत्ती सारख्या सुगंधित वस्तूंपासून देखील अस्थमा होऊ शकतो. काही अँटी-बायोटिक औषधे, तणाव आणि सिगरेट देखील अस्थमा होण्याची संभावना वाढवते.

                  अस्थमाचे लक्षण –

     श्वास घेण्यास समस्या, श्वास घेताना शिटीचा आवाज येणे, खोकला येणे, छातीत दुखणी ही अस्थमाची लक्षणे आहेत.

                  उपचार –

     अस्थमा पुर्णपणे नाहीसा करण्यासाठी कोणताही उपचार नाही. मात्र यावर नियंत्रण मिळवता येते. अस्थमाला नियंत्रण करण्यासाठी औषधांचे नियमित सेवन करणे गरजेचे आहे. यासाठी इंहेलर्स सर्वात चांगले औषध आहे. इंहेलर्सने औषध थेट फुफ्फुसापर्यंत पोहचते, ज्यामुळे रुग्णाला आराम मिळतो.

                अस्थमापासून वाचण्यासाठी –

     अस्थमाच्या रुग्णाला आपल्या खाण्या-पिण्यावर विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. औषध वेळेवर घ्यावे, थंड आणि आंबट वस्तूंचे जास्त सेवन करून नये. धूळ, धूर आणि धुम्रपानापासून लांब राहावे. पाळीव प्राणी जसे की कुत्रे, मांजर यांच्या संपर्कात जास्त येऊ नये.

--माझा पेपर
-----------

                    (साभार आणि सौजन्य-संदर्भ-माझा पेपर.कॉम)
                   -----------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-01.05.2023-सोमवार.
=========================================