महाराष्ट्र दिन-महाराष्ट्र गौरव गीत-कविता-1

Started by Atul Kaviraje, May 01, 2023, 04:27:23 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                     "महाराष्ट्र दिन"
                                    --------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक ०१.०५.२०२३-सोमवार आहे. आज "महाराष्ट्र दिन" आहे. महाराष्ट्र दिन हा महाराष्ट्र राज्याचा निर्मिती दिवस म्हणून साजरा केला जातो. १ मे १९६० रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची राज्याची निर्मिती झालेली आहे. या दिवशी राज्यात सार्वजनिक सुट्टी असते. हा दिवस मराठी माणसाचा आहे आणि तो  मोठ्या उत्साहाने साजरा करतात, विविध कार्यक्रमांचे आयोजनही या दिवशी केले जाते. मराठी कवितेच्या माझ्या सर्व भाऊ-बहीण, कवी-कवियत्रींना महाराष्ट्र दिनाच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया काही कविता.

                                   "महाराष्ट्र गौरव गीत"
                                  -------------------

महाराष्ट्र जगी वाढवी शान भारताची

महाराष्ट्र आमुचा महान परंपरा सुधारकांची

संत बहुरत्न भूमी थोर शिवबाची

जिजा अहिल्या सावित्री वीर मातांची ।।


साहित्य संस्कृती कला गौरवाची

मंदिर विचार विकासाचे प्रेरणा प्रगतीची

भूमी अर्थ क्रीडा गुढी सदैव यशाची

उद्योग विज्ञान बांधी तोरणे मांगल्याची।।


गोदा कृष्णा कोयना चंद्रभागा अमृताची

विजयातुनी लाभली संपदा यशवंत यशाची

इथे एकवटती किरणे नव विश्वासाची

गौरवाचा इतिहास सांगते छाती सह्याद्रीची


श्री विठ्ठल वंदितो आजन्म ख्याती महाराष्ट्राची ।।

--विवेक द.जोशी
---------------

                        (साभार आणि सौजन्य-संदर्भ-स्टोरी मिरर.कॉम)
                        -----------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-01.05.2023-सोमवार. 
=========================================