०४-मे-दिनविशेष

Started by Atul Kaviraje, May 04, 2023, 10:27:33 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-०४.०५.२०२३-गुरुवार. जाणून घेऊया,आजच्या दिवसाचे "दिन-विशेष"

                                    "०४-मे-दिनविशेष"
                                   ------------------

-: दिनविशेष :-
०४ मे
आंतरराष्ट्रीय अग्निशमन दिन
कोळसा खाण कामगार दिन
=========================================
अ) महत्त्वाच्या घटना:
   ----------------
१९९६
जागतिक वेटलिफ्टिंग स्पर्धेत भारताला सहा पदके, एन. कुंजुरानीदेवीला दोन रौप्यपदके
१९९५
महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाने 'बॉम्बे' चे 'मुंबई' असे नामकरण करण्याचा निर्णय घेतला.
१९९२
संगीतकार भूपेन हजारिका यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर
१९८९
सर्व पंचायत समित्यांमधे महिलांसाठी ३० टक्‍के जागा राखीव ठेवल्या जातील, अशी पंतप्रधान राजीव गांधी यांनी घोषणा केली.
१९०४
प्रशांत महासागर आणि अटलांटिक महासागर यांना जोडणाऱ्या पनामा कालव्याचे बांधकाम पूर्ण झाले. ४ मे १९०४ रोजी ८२ किमी लांबी असलेला हा कालवा बांधण्यास अमेरिकेने सुरुवात केली होती.
१८५४
Penny Black
भारतातील पहिले टपाल तिकीट प्रकाशित झाले.
१७९९
श्रीरंगपट्टणमच्या लढाईत टिपू सुलतान ब्रिटिशांकडून मारला गेला.
=========================================
ब) जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  -----------------------------
१९८४
मंजुरूल इस्लाम
काझी मंजुरूल इस्लाम – बांगला देशचा क्रिकेटपटू
(मृत्यू: १६ मार्च २००७)
१९४५
एन. राम – ज्येष्ठ पत्रकार
१९४२
सत्यनारायण गंगाराम तथा सॅम पित्रोडा – भारतातील दूरसंचारसेवांचा विस्तार करण्यास कारणीभूत असलेले शास्त्रज्ञ, पंतप्रधानांचे विज्ञान व तंत्रज्ञानविषयक सल्लागार
१९४०
रॉबिन कूक – इंग्लिश कादंबरीकार
१९३४
अरुण दाते
अरुण दाते – भावगीत गायक
(मृत्यू: ६ मे २०१८)
१९२९
बाबा कदम
वीरसेन आनंदराव तथा 'बाबा' कदम – रहस्यकथा व गुप्तहेरकथालेखक
(मृत्यू: २० आक्टोबर २००९)
१९२९
ऑड्रे हेपबर्न
ऑड्रे हेपबर्न – ब्रिटिश अभिनेत्री, संयुक्त राष्ट्रांच्या बालक निधीच्या (UNICEF) सदिच्छा प्रतिनिधी, 'रोमन हॉलिडे' (१९५३) या चित्रपटातील अभिनयाबद्दल त्यांना ऑस्कर पुरस्कार मिळाला.
(मृत्यू: २० जानेवारी १९९३)
१९२८
होस्‍नी मुबारक
मोहम्मद होस्‍नी अल सैद मुबारक तथा होस्‍नी मुबारक – इजिप्तचे चौथे राष्ट्राध्यक्ष
(मृत्यू: २५ फेब्रुवारी २०२०)
१८४९
ज्योतिरिंद्रनाथ टागोर – थोर बंगाली साहित्यिक, नाटककार, संगीतकार, चित्रकार व संपादक, रविंद्रनाथ टागोर यांचे वडील बंधू, त्यांनी लोकमान्य टिळकांच्या गीतारहस्याचे बंगालीत भाषांतर केले
(मृत्यू: ४ मार्च १९२५ - रांची, झारखंड)
१८४७
महर्षी विनायक रामचंद्र उर्फ अण्णासाहेब पटवर्धन – धार्मिक आणि राष्ट्रीय मनोवृत्तीचे पुण्यातील एक नामांकित धन्वंतरी व लोकमान्य टिळकांचे स्‍नेही
(मृत्यू: २ फेब्रुवारी १९१७)
१८२५
थॉमस हेन्री हक्सले
थॉमस हेन्री हक्सले – ब्रिटिश जीवशास्त्रज्ञ, मानववंशशास्त्रज्ञ, विज्ञानकथालेखक आणि डार्विनच्या उत्क्रांतिवादाचा खरा समर्थक
(मृत्यू: २९ जून १८९५ - इस्ट्बोर्न, इंग्लंड)
१७६७
त्यागराज – दाक्षिणात्य संगीतकार
(मृत्यू: ६ जानेवारी १८४७)
१६४९
छत्रसाल बुंदेला – बुंदेलखंडचा महाराजा
(मृत्यू: २० डिसेंबर १७३१)
१००८
ख्वाजा अब्दूल्ला अन्सारी – पर्शियन सूफी संत
(मृत्यू: ?? १०८८)
१००८
हेन्‍री (पहिला) – फ्रान्सचा राजा
(मृत्यू: ४ ऑगस्ट १०६०)
=========================================
क) मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
    -------------------------
२००८
किशन महाराज
पं. किशन महाराज – तबला सम्राट. बनारस घराण्याचे तबला वादक. वडिलांकडून त्यांनी आपले शिक्षण सुरु केले. वडिलांच्या मृत्यूपश्चात काका कंठे महाराज यांचे ते शिष्य बनले. वयाच्या ११ व्या वर्षापर्यंतच त्यांची तयारी एवढी झाली होती की ते साथसंगत करू लागले. फैय्याज खान, पं. ओंकारनाथ ठाकूर, बडे गुलाम अली खाँ, पं. भीमसेन जोशी, पं. वसंत राय, पं. रवी शंकर, उस्ताद अली अकबर खाँ, उस्ताद विलायत खाँ अशा अनेक दिग्गजांना त्यांनी साथ सांगत केली. लयकाऱ्या आणि तिहाया यांत त्यांचा हातखंडा होता. साथसंगत करण्यात ते एकदम वाकबगार होते. गायन, सतार, सरोद, धृपद, धमार, नृत्य अशा सर्व प्रकारात ते साथीला असत. श्री. शंभू महाराज, सितारा देवी, नटराज गोपी कृष्ण, पं. बिरजू महाराज अशा अनेक नृत्यकलेतील दिग्गजांना त्यांनी साथ केली आहे. तबल्याचे सोलो कार्यक्रमही ते करीत. 'मृदंगम विद्वान' पालघाट रघू यांच्याबरोबर निर्मिलेली 'ताल वाद्य कचेरी' ही त्यांची रचना प्रसिद्ध आहे. त्यांना पद्मश्री (१९७३), पद्मविभूषण (२००२) अशा अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. पं. नंदन मेहता, सुखविंदर सिंग नामधारी, कुमार बोस, विनीत दास, संदीप दास, बाळकृष्ण अय्यर, शुभ महाराज, पूरण महाराज, आनंद महाराज, अरविंद कुमार आझाद हे त्यांचे काही प्रसिद्ध शिष्य आहेत.
(जन्म: ३ सप्टेंबर १९२३)
१९८०
अनंत काणेकर
अनंत आत्माराम काणेकर – चतुरस्त्र साहित्यिक, कवी व पत्रकार, 'पद्मश्री' व 'सोविएत लँड नेहरू पुरस्कार' विजेते. मुंबईतील 'नाट्यमन्वंतर' या प्रयोगशील नाट्यसंस्थेचे ते एक संस्थापक होते.
(जन्म: २ डिसेंबर १९०५)
१९८०
जोसिप टिटो
जोसिप ब्रॉझ टिटो – क्रांतिकारक आणि युगोस्लाव्हियाचे पहिले राष्ट्राध्यक्ष
(जन्म: ७ मे १८९२)
१७९९
टिपू सुलतान
हैदरअलीचा थोरला मुलगा व मैसूरचा वाघ, शहाबहादूर फतेह अली खान ऊर्फ टिपू सुलतान इंग्रजांबरोबर झालेल्या लढाईत ठार झाला. [चैत्र व. १५ शके १७२१]
(जन्म: २० नोव्हेंबर १७५०)
=========================================

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-04.05.2023-गुरुवार.
=========================================