दिन-विशेष-लेख-जागतिक हास्य दिन

Started by Atul Kaviraje, May 05, 2023, 10:06:19 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                   "दिन-विशेष-लेख"
                                 "जागतिक हास्य दिन"
                                --------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-05.05.2023-शुक्रवार आहे, 05 मे  हा दिवस "जागतिक हास्य दिन" म्हणूनही ओळखला जातो. वाचूया, तर या दिवसाचे महत्त्व, आजच्या या "दिन-विशेष-लेख" या शीर्षकI-अंतर्गत.

     लोकांना हसण्याची आठवण करून देण्यासाठी आणि त्यांच्या आजूबाजूच्या लोकांना हसवण्यासाठी प्रत्येक मे महिन्याच्या पहिल्या रविवारी जागतिक हास्य दिन साजरा केला जातो.

     चेहऱ्यावरील हास्य हे आपल्या आयुष्यातील सर्वात मोठं वैभव आहे. हास्य आपल्याला सकारात्मक बनवतं. जगाला हास्याचे महत्त्व पटवून देण्यासाठी मे महिन्याचा पहिला रविवार जगभरात 'जागतिक हास्य दिन' म्हणून साजरा केला जातो.

     जागतिक हास्य दिन 1998 मध्ये पहिल्यांदा मुंबईत साजरा करण्यात आला जेव्हा हास्य योग चळवळीचे संस्थापक डॉ. मदन कटारिया यांनी त्या चळवळीद्वारे एक सिद्धांत मांडला. हळूहळू उद्याने आणि मैदाने सकाळी हास्याच्या गर्जनेने भरू लागली. अशा प्रकारे लाफ्टर योगाच्या आगमनाने जागतिक हास्य दिनाचा जन्म झाला. 

                 जागतिक हास्य दिनाचे महत्त्व--

     आपल्या शारिरीक आणि मानसिक अस्वास्थ्यामुळे लोक हसणं विसरु लागले आहेत. लोकांना हसण्याची आठवण करून देण्यासाठी आणि त्यांच्या आजूबाजूच्या लोकांना हसवण्यासाठी प्रत्येक मे महिन्याच्या पहिल्या रविवारी जागतिक हास्य दिन साजरा केला जातो. वैज्ञानिकदृष्ट्या असे आढळून आले आहे की हसण्यामुळे मेंदूतील कोर्टिसोलची पातळी कमी होते, ज्याचा शरीरावर सकारात्मक परिणाम होतो.

                   दिवस कसा साजरा करायचा ?--

     जगात शांतता प्रस्थापित व्हावी आणि मानवजातीमध्ये बंधुभाव आणि सौहार्द निर्माण व्हावा या उद्देशाने जागतिक हास्य दिनाची सुरुवात झाली. जागतिक हास्य दिनाची लोकप्रियता हास्य योग चळवळीतून जगभर पसरली. आज जगभरात सहा हजारांहून अधिक कॉमेडी क्लब आहेत. या निमित्ताने जगातील अनेक शहरांमध्ये रॅली, चर्चासत्रे आणि परिषदा आयोजित केल्या जातात.

--सकाळ डिजिटल टीम
---------------------

                     (साभार आणि सौजन्य-संदर्भ-इ सकाळ.कॉम)
                    ----------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-05.05.2023-शुक्रवार.
=========================================