बुद्ध पौर्णिमा-गौतम बुद्ध-कविता-2

Started by Atul Kaviraje, May 05, 2023, 10:18:17 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                     "बुद्ध पौर्णिमा"
                                    -------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-०५.०५.२०२३-शुक्रवार आहे. आज "बुद्ध पौर्णिमा" आहे. गृहत्यागानंतर सिद्धार्थांनी सत्याच्या शोधासाठी सात वर्ष कठोर तपश्चर्या व साधना केली आणि त्यांना त्यानंतर त्यांना बोधगया येथील एका-बोधिवृक्षाखाली बुद्धत्व किंवा ज्ञानप्राप्‍ती झाली. ही घटना वैशाख पौर्णिमेला झाली. तेव्हापासून हा दिवस बुद्ध पौर्णिमा म्हणून ओळखला जातो. मराठी कवितेच्या माझ्या सर्व बंधू-भगिनी, कवी-कवियत्रींना बुद्ध पौर्णिमेच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया बुद्धावर काही कविता.

                                     "गौतम बुद्ध"
                                    ------------

वैशाख पौर्णिमेला झाला जन्म

गौतम बुद्धाचा,

- असित मुनिला कळल्यावर

वाटे रूप देवाचा!


बत्तीस लक्षणे महापुरुषाचे

ऐंशी शुभ चिन्हांनी युक्त असलेले,

- हे सुंदर छोटे बालक

महामायादेवीच्या पोटी, जन्म घेऊनी आले!


असित मुनिने सांगूनी राजास

हे बालक निश्चित बुद्ध होणार,

- परमोच्च सम्यक् सम्बोधि प्राप्त करुनी

या जगात, आपुली किर्ती साधणार!


पाचव्या दिवशी बालकाचे

नाव सिद्धार्थ ठेविले,

- असतानाच सात दिवसाचा

आई महामायादेवीचे, देहावसान झाले!


केले पालनपोषण मावशी गौतमीने

सुरुवात केली विद्या अभ्यासात,

- दर्शन शास्त्रे, ध्यान साधना

सर्वे केली आत्मसात!


काही वर्ष लोटले गेले

झाला विवाह यशोधरेसह,

- पुत्र जन्मी आला तिच्या

नाव ठेवण्यात आले राहुल!


सांसारिक जीवनात केला प्रवेश

वाटे आनंद पित्याला,

- चित्त न लागे सिद्धार्थाला

सोडीला राजमहाल कुटुंबाचा!


केला विचार संन्यासाचा

सोडिले माता-पिता अन् मुलाला

- आषाढ़ी पौर्णिमेच्या त्यादिवशी

केला त्याग गृहाचा!


बसुनी वृक्ष पिंपळाखाली

दिव्य ज्ञान प्राप्त झाले,

- तयापासुनी भिक्षुनी त्यास

गौतम बुद्ध नाव ठेविले!

--नीर आनंद
-----------

                        (साभार आणि सौजन्य-संदर्भ-स्टोरी मिरर.कॉम)
                        ----------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-05.05.2023-शुक्रवार.
=========================================