बुद्ध पौर्णिमा-तथागत गौतम बुद्ध-कविता-6

Started by Atul Kaviraje, May 05, 2023, 10:24:25 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                      "बुद्ध पौर्णिमा"
                                     --------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-०५.०५.२०२३-शुक्रवार आहे. आज "बुद्ध पौर्णिमा" आहे. गृहत्यागानंतर सिद्धार्थांनी सत्याच्या शोधासाठी सात वर्ष कठोर तपश्चर्या व साधना केली आणि त्यांना त्यानंतर त्यांना बोधगया येथील एका-बोधिवृक्षाखाली बुद्धत्व किंवा ज्ञानप्राप्‍ती झाली. ही घटना वैशाख पौर्णिमेला झाली. तेव्हापासून हा दिवस बुद्ध पौर्णिमा म्हणून ओळखला जातो. मराठी कवितेच्या माझ्या सर्व बंधू-भगिनी, कवी-कवियत्रींना बुद्ध पौर्णिमेच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया बुद्धावर काही कविता.

                                  "तथागत गौतम बुद्ध"
                                 -------------------

लुंबिनी गावी राजकुमार प्रगटले

सिद्धार्थ त्यांचे नाव ठेवीयले.....

सातव्या दिवशी महामायेचे निधन झाले

महाप्रजापती गौतमी यांनी सांभाळले...


राजवैभव नाकारले पाहिले

जेव्हा लाचार वृद्ध.....

दया मानवता करुणा जागवले

ज्याने त्याचेच नाव बुद्ध....


नाकारली ज्याने राजपुत्र

अजून पण युद्ध... 

तोच *महाकारूणी तथागत*

*भगवान गौतम बुद्ध....*


युद्ध नको मानवा

दिला शांतीचा संदेश....

ज्ञानप्राप्तीसाठी सोडिले महाल सुख

आणि घातला भिक्षूकाचा वेश....


बुद्ध विज्ञान वादी

आहे थोटांड नाही.... 

मार्गदाता आहे

बुद्ध मोक्षदाता नाही....


प्राणीमात्रांवर दया करा

बुद्धांनी सांगितले.... 

करा मदत दीनदुबळ्यांची

संदेश हे सर्वास दिले....


राग द्वेष मत्सर नको ठेवू

मानवा संयम तुझा बळ...

मानव जीवन जो तुला

मिळाला तो ठेवा निर्मळ... 


त्रिपिटक ग्रंथात आहे

जीवनाचे सकल सार..... 

प्रज्ञा शील करुणा ठेव

आणि मोक्षाचा मार्ग धर...


दुराचार नाही विचार

आहे बुद्ध....

बुद्ध हिंसा नाही

आहे तो प्रबुद्ध....


स्वर्ग नर्क कोणी पाहिले

उद्या काय होणार हे कोणी जाणिले..

मोक्ष त्यालाच मिळे

पंचशीलाचे पालन ज्यांनी केले.....


*बुद्धम् शरणम् गच्छामि.........!*

*धम्मम् शरणम् गच्छामि.......!*

*संघम् शरणम् गच्छामि......!*

--तेजस्विनी संसारे
----------------

                       (साभार आणि सौजन्य-संदर्भ-स्टोरी मिरर.कॉम)
                      -----------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-05.05.2023-शुक्रवार.
=========================================