बुद्ध पौर्णिमा-गौतम बुद्ध-कविता-8

Started by Atul Kaviraje, May 05, 2023, 10:27:43 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                     "बुद्ध पौर्णिमा"
                                    --------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-०५.०५.२०२३-शुक्रवार आहे. आज "बुद्ध पौर्णिमा" आहे. गृहत्यागानंतर सिद्धार्थांनी सत्याच्या शोधासाठी सात वर्ष कठोर तपश्चर्या व साधना केली आणि त्यांना त्यानंतर त्यांना बोधगया येथील एका-बोधिवृक्षाखाली बुद्धत्व किंवा ज्ञानप्राप्‍ती झाली. ही घटना वैशाख पौर्णिमेला झाली. तेव्हापासून हा दिवस बुद्ध पौर्णिमा म्हणून ओळखला जातो. मराठी कवितेच्या माझ्या सर्व बंधू-भगिनी, कवी-कवियत्रींना बुद्ध पौर्णिमेच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया बुद्धावर काही कविता.

                                      "गौतम बुद्ध"
                                     ------------
 
क्षत्रिय कुळात जन्मले

सिद्धार्थ राजपूत

शाक्य राजा शुद्धोधन

महाराणी महामायांचे ते सुत ||१||


गौतम बुद्ध,सम्यक शाक्यमुनी बुद्ध

अन्य नामांनी जे जातात जाणले

बौद्ध धर्मास या जगति

त्या तथागतांनीच आणले ||२||


बुद्ध नाही एक नाम

ही तर ज्ञानाची उपाधी

"अवकाशा एवढा ज्ञानी" त्याचा अर्थ

ही उपमा नाही साधी ||३||


"तथागत बुद्धच" सर्वश्रेष्ठ

या जगतीच्या इतिहासी

त्यां सम अजूनही नाही मिळाला

महामानव या दुनियेसी ||४||


जन्माद्वारे नाही ठरत

मनुष्य शूद्र आणि ब्राह्मण

कृतीच दावीते सर्वकाही

हीच बौद्धांची शिकवण ||५||


"शांतिदूत बौद्ध" धर्माची

मूळ भूमी भारत

आहे का? याहुनी

दुसरे काही गौरवत ||६||

--स्मिता विजय शिंदे
-----------------

                       (साभार आणि सौजन्य-संदर्भ-स्टोरी मिरर.कॉम)
                      -----------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-05.05.2023-शुक्रवार.
=========================================