दिन-विशेष-लेख-जागतिक थॅलेसेमिया जागरुकता दिन

Started by Atul Kaviraje, May 08, 2023, 11:10:32 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                   "दिन-विशेष-लेख"
                         "जागतिक थॅलेसेमिया जागरुकता दिन"
                        ----------------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-08.05.2023-सोमवार आहे, 08 मे हा दिवस "जागतिक थॅलेसेमिया जागरुकता दिन" म्हणूनही ओळखला जातो. वाचूया, तर या दिवसाचे महत्त्व, आजच्या या "दिन-विशेष-लेख" या शीर्षकI-अंतर्गत.

     या आजाराबाबत लोकांना जागरूक करण्यासाठी दरवर्षी 8 मे रोजी जागतिक थॅलेसेमिया दिन साजरा केला जातो.

     थॅलेसेमिया हा रक्ताचा विकार आहे. जो मुलांना त्यांच्या पालकांकडून होतो. म्हणजेच हा एक अनुवंशिक आजार आहे.

     World Thalassemia Day: History, Significance, Theme, Date All You need to know World Thalassemia Day: शरीरातील लाल रक्तपेशींशी संबंधित असणारा गंभीर आजार 'थॅलेसेमिया'; जाणून घ्या लक्षणं आणि उपचार

     थॅलेसेमिया हा रक्ताचा विकार आहे. जो मुलांना त्यांच्या पालकांकडून होतो. म्हणजेच हा एक अनुवंशिक आजार आहे. थॅलेसेमियाची लक्षणे जन्मानंतर काही महिन्यांनी दिसू लागतात. यामध्ये लाल रक्तपेशींची झपाट्याने घट होते. सामान्यत: शरीरातील लाल रक्तपेशींचे आयुष्य सुमारे 120 दिवसांचे असते. परंतु, थॅलेसेमिया झालेल्या रुग्णाच्या शरीरातील लाल रक्तपेशींचे आयुष्य केवळ 20 दिवस असते. अशा परिस्थितीत दर 20 ते 25 दिवसांनी या रुग्णांना बाहेरून रक्त द्यावे लागते. या आजारावर योग्य उपचार न केल्यास तो मृत्यूचे कारणही ठरू शकतो, असे तज्ज्ञांचे मत आहे. या आजाराबाबत लोकांना जागरूक करण्यासाठी दरवर्षी 8 मे रोजी जागतिक थॅलेसेमिया दिन साजरा केला जातो. जाणून घ्या या दिवसाचा इतिहास आणि या आजाराशी संबंधित काही महत्त्वाच्या गोष्टी.

   जागतिक थॅलेसेमिया दिनाचा इतिहास (World Thalassemia Day History):--

     जागतिक थॅलेसेमिया दिन पहिल्यांदा 1994 मध्ये साजरा करण्यात आला. थॅलेसेमिया इंटरनॅशनल फेडरेशनचे अध्यक्ष आणि संस्थापक जॉर्ग एंग्लेजॉस यांनी या आजाराने ग्रस्त असलेल्या सर्व रुग्ण आणि त्यांच्या पालकांच्या सन्मानार्थ या दिवसाची सुरुवात केली. या आजाराबाबत लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणे हा यामगचा मुख्य उद्देश होता. 

                 थॅलेसेमियाचे दोन प्रकार :--

     थॅलेसेमिया मायनर आणि मेजर असे दोन प्रकार आहेत. जेव्हा जोडीदारांपैकी एकामध्ये दोषपूर्ण गुणसूत्र असतात, तेव्हा मुलाला किरकोळ थॅलेसेमिया होतो. मायनर थॅलेसेमियामध्ये रुग्ण सामान्य माणसांप्रमाणे जीवन जगू शकतो. पण जेव्हा पती-पत्नी दोघांच्या गुणसूत्रांमध्ये दोष असतो, तेव्हा त्या मुलाला मेजर थॅलेसेमिया होतो. अशा स्थितीत त्याला बाहेरून वारंवार रक्त घ्यावे लागते.

     थॅलेसेमियाची लक्षणं (World Thalassemia Day Symptoms) :--

     थॅलेसेमिया आजाराची लक्षणंसुद्धा अगदी सामान्य आहेत. जसे की, सतत अशक्तपणा जाणवणे, थकल्यासारखे वाटणे, ओटीपोटीत सूज येणे, गडद लघवीला होणे, त्वचेवर पिवळसर रंग येणे, त्याचबरोबर नखे, डोळे आणि जीभ फिकट होणे, मुलांची वाढ मंदावणे ही या आजाराशी संबंधित काही लक्षणं आहेत.

       थॅलेसेमिया उपचार (World Thalassemia Day Treatment) :--

     थॅलेसेमियावर बोन मॅरो ट्रान्सप्लांट हा एकमेव उपचार मानला जातो. परंतु हे दुर्दैव आहे की केवळ 20 ते 30 टक्के रुग्णांना त्यांच्या कुटुंबाकडून एचएलए आयडेंटिकल डोनर मिळू शकतो. 70 टक्के रुग्णांमध्ये रक्तगटाच्या अभावी उपचार होऊ शकतनाही. अशा वेळी त्यांना वेळोवेळी रक्त द्यावे लागते.

--By: एबीपी माझा वेब टीम
Edited By: प्रिया मोहिते
-------------------------

                 (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठी.abp लाईव्ह.कॉम)
                ------------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-08.05.2023-सोमवार.
=========================================