११-मे-दिनविशेष

Started by Atul Kaviraje, May 11, 2023, 10:26:56 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-११.०५.२०२३-गुरुवार. जाणून घेऊया,आजच्या दिवसाचे "दिन-विशेष"

                                      "११-मे-दिनविशेष"
                                     -----------------

-: दिनविशेष :-
११ मे
=========================================
अ) महत्त्वाच्या घटना:
   ----------------
२००७
बांगलादेशातील चितगावमधे भूस्खलनामुळे १३० लोक ठार झाले.
१९९७
पंतप्रधान इंद्रकुमार गुजराल यांच्या उपस्थितीत 'सुखोई-३० के' ही रशियन बनावटीची विमाने भारतीय हवाई दलात दाखल झाली.
१९७०
अ‍ॅना मे हेस आणि एलिझाबेथ पी. हॉइसिंग्टन या अमेरिकन सैन्यातील पहिल्या स्त्री जनरल झाल्या.
१९३७
जोसेफ स्टालिनने आपल्याच ८ लष्करी अधिकार्‍यांना ठार केले.
१९०१
न्यूझीलंडने कूक बेटे बळकावली.
१८६६
अलाहाबाद उच्‍च न्यायालयाची स्थापना
१६६५
मिर्झा राजे जयसिंग आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्यात पुरंदरचा तह झाला.
=========================================
ब) जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  -----------------------------
१९४७
लालूप्रसाद यादव – केंद्रीय मंत्री व बिहारचे मुख्यमंत्री
१८९७
राम प्रसाद बिस्मिल – क्रांतिकारक
(मृत्यू: १९ डिसेंबर १९२७)
१८९४
काइचिरो टोयोडा – टोयोटा मोटर कंपनीचे संस्थापक
(मृत्यू: २७ मार्च १९५२)
=========================================
क) मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
    -------------------------
२०००
राजेश पायलट – केंद्रीय मंत्री
(जन्म: १० फेब्रुवारी १९४५)
१९९७
मिहिर सेन – इंग्लिश खाडी पोहुन जाणारे पहिले भारतीय
(जन्म: १६ नोव्हेंबर १९३०)
१९८३
घनश्यामदास तथा जी. डी. बिर्ला – व्यापारी पार्श्वभूमीतून पुढे येऊन पुढे प्रचंड औद्योगिक साम्राज्य उभारलेले उद्योगपती
(जन्म: १० एप्रिल १८९४)
१९५०
साने गुरूजी
पांडुरंग सदाशिव साने ऊर्फ 'साने गुरूजी' – नामवंत साहित्यिक, बालसाहित्यिक, समाजवादी नेते, समाजसुधारक व स्वातंत्र्यसैनिक. त्यांचे 'श्यामची आई' हे पुस्तक प्रकाशनक्षेत्रातील सर्व विक्रम मोडणारे ठरले आहे.
(जन्म: २४ डिसेंबर १८९९)
१९२४
वासुदेव वामन तथा 'वासुदेवशास्त्री' खरे – इतिहासाचार्य, लेखक, नाटककार व कवी
(जन्म: ५ ऑगस्ट १८५८)
१७२७
जॉर्ज (पहिला) – इंग्लंडचा राजा. याला इंग्लिश आजिबात येत नसे व तो दुभाषांमार्फत दरबार्‍याशी संपर्क साधत असे किंवा लॅटिनमध्ये त्याचे म्हणणे मांडत असे.
(जन्म: २८ मे १६६०)
ख्रिस्त पूर्व ३२३
अलेक्झांडर द ग्रेट – मॅसेडोनियाचा राजा
(जन्म: २० जुलै ख्रिस्त पूर्व ३५६)
=========================================

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-11.05.2023-गुरुवार.
=========================================