दिन-विशेष-लेख-विश्व कुटुंबसंस्था दिन-5

Started by Atul Kaviraje, May 15, 2023, 10:23:02 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                   "दिन-विशेष-लेख"
                                 "विश्व कुटुंबसंस्था दिन"
                                ---------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-15.05.2023-सोमवार आहे, 15 मे हा दिवस "विश्व कुटुंबसंस्था दिन" म्हणूनही ओळखला जातो. वाचूया, तर या दिवसाचे महत्त्व, आजच्या या "दिन-विशेष-लेख" या शीर्षकI-अंतर्गत.

                  जागतिक कुटुंब दिन--

     जागतिक पातळीवर सलोख्याचे महत्त्व लक्षात घेऊनच संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनात १४० देशांनी या ठरावाला संमती दर्शविली. या सलोख्याचा खरा प्रारंभ १९९९मध्ये इस्त्रायली आणि पॉलिस्टनी कुटुंबात निर्वासित छावण्यांत गळाभेट घडवून करण्यात आला होता. पुढच्याच वर्षी अमेरिकेने या महत्त्वपूर्ण उपक्रमाला पाठिंबा दिला आणि 'जागतिक कुटुंब' दिन साजरा करण्याचा ठरावही मंजूर केला. जगातल्या प्रत्येक व्यक्तीने हा दिवस साजरा करावा, अहिंसा, शांती आणि सहभाग यासंबंधी व्यक्तिगत प्रतिज्ञा करून आपला समाज, आपले जग सुरक्षित असल्याची ग्वाही एकमेकांना द्यावी असा यामागील उद्देश आहे.

                 सोशल मीडिया आणि कुटुंब--

     पाश्चात्य देशांमध्ये असलेल्या कौटुंबिक व्यवस्थेमुळे त्यांना अशा प्रकारे जागतिक कुटुंब दिवसाचा ठराव आणावा लागला, असा एक मतप्रवाह आहे. कुटुंबाचे महत्त्व, कुटुंब व्यवस्था, आपली माणसे याचे अनेक आदर्श आपल्या देशात पाहायला मिळतील. मात्र, सध्याची व्यस्त जीवनशैली लक्षात घेता प्रत्यक्षातल्या भेटीपेक्षा समाजमाध्यमांतली भेट पुष्कळच सोयीची झाली आहे. त्यामुळे 'व्हॉट्स अ‍ॅप', 'फेसबुक', 'हाइक' इत्यादी माध्यमांवर किती तरी फॅमिली ग्रुप्स तयार झाले पाहायला मिळतात. या ग्रुपचा संस्थापक सदस्य- फाऊंडर मेंबर बहुतांश वेळा एखादी किंवा एखादा कुटुंबातला तरुण सदस्यच असतो. कुटुंबातील जमतील तेवढे सगळे सदस्य या ग्रुपमध्ये असतात. आईकडचे, बाबांकडचे, आजी-आजोबांकडचे, फक्त आई-बाबा अन् बहीण-भावंडांचा, थेट नातलग नाहीत पण नातलगांसारख्याच असणाऱ्या फॅमिली फ्रेण्डसंचाही, अशा अनेक प्रकारचे ग्रुप आज पाहायला मिळतात. घरच्याच फॅमिली ग्रुपवर सुप्रभातपासून ते क्लासहून यायला उशीर होईल, अशा दिवसभरातल्या घडामोडींचे शेअिरग करण्यापर्यंत काहीही पोस्ट केले जाते.

                लॉकडाऊन आणि कुटुंब--

     भारतात एकत्र कुटुंब पद्धतीची परंपरा असल्यामुळे कौटुंबिक गोतावळाही खूप मोठा असतो. अनेकांना तर नातीही नीट सांगता येत नाहीत. मात्र, प्रेमाचा, आपलेपणाचा, सौहार्दाचा ओलावा तितकाच चिंब असतो. करोनाचे संकट गहिरे होत असताना लॉकडाऊनच्या काळात गेले दोन महिने रोजच कुटुंब दिन साजरे झाल्याचे चित्र बहुतांश ठिकाणी आहे. लॉकाडाऊन सुरू झाल्यापासून फॅमिली ग्रुपवर तर मेसेजेसची संख्या अनेकपटीने वाढलेली सर्वांनीच अनुभवली. कुटुंब संवाद, नात्यात आलेला दुरावा कमी करणे, एकमेकांना अधिक चांगल्या प्रकारे समजून घेणे, आठवणींचे संच, खंड एकमेकांसाठी रिते करणे, नातेसंबंध दृढ करणे अशा कितीतरी गोष्टी लॉकडाऊनच्या काळात सुरू झाल्या. मुलांना वेळ देणे, आई-वडिलांना वेळ देणे, एकमेकांना वेळ देणे हे लॉकडाऊनमुळे शक्य झाले. अनेकांना कुटुंब व्यवस्था, कुटुंब संवाद, कौटुंबिक ओलावा याची किंमत नव्याने समजली असेल. चला तर मग मौके पे चौका मारत आपणही जगाबरोबर जागतिक कुटुंब दिन साजरा करूया...

--देवेश फडके
-------------

                   (साभार आणि सौजन्य-संदर्भ-महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
                  ---------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-15.05.2023-सोमवार.
=========================================