१८-मे-दिनविशेष

Started by Atul Kaviraje, May 18, 2023, 11:24:34 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-१८.०५.२०२३-गुरुवार. जाणून घेऊया,आजच्या दिवसाचे "दिन-विशेष"

                                    "१८-मे-दिनविशेष"
                                   -----------------

-: दिनविशेष :-
१८ मे
जागतिक संग्रहालय दिन
फ्रान्समधे एकोणिसाव्या शतकाच्या प्रारंभी सम्राट नेपोलिअन बोनापार्टने सैन्यभरती जाहीर केली. परंतु अनेक तरुण गलगंड (Goitre) असल्याने सैन्यात भरती होऊ शकत नाहीत असे त्याला आढळून आले. तेव्हा नेपोलिअनने इतर महत्त्वाची कामे बाजूला ठेवून गलगंडाचा अभ्यास करण्याचा आदेश दिला.
=========================================
अ) महत्त्वाच्या घटना:
   ----------------
१९९८
पुण्याच्या सुरेन्द्र चव्हाणने जगातील सर्वोच्‍च एव्हरेस्ट शिखर सर केले.
१९९५
स्थानिक ठिकाणचे ५,००० रुपयांपर्यंतचे धनादेश खात्यात भरल्यानंतर तिसर्‍या दिवशी ती रक्‍कम ग्राहकास काढण्याची मुभा द्यावी, असा आदेश 'रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया'ने दिला.
१९९१
रशियाच्या सोयुझ अंतराळयानातून भ्रमण करणारी हेलन शेरमन ही महिला पहिली ब्रिटिश अंतराळयात्री बनली.
१९७४
भारताने पोखरण येथे आण्विक अस्त्राची पहिली यशस्वी चाचणी केली. यानंतर २४ वर्षांने म्हणजे १९९८ मध्ये भारताने दुसरी चाचणी केली.
१९७२
दापोली येथे कोकण कृषी विद्यापीठाची स्थापना झाली.
१९४०
संत ज्ञानेश्वर
'प्रभात'चा 'संत ज्ञानेश्वर' हा चित्रपट मुंबई व पुणे या ठिकाणी एकाच दिवशी प्रदर्शित झाला.
१९३८
गोपालकृष्ण
'प्रभात'चा गोपालकृष्ण हा चित्रपट मुंबईच्या सेंट्रल सिनेमात प्रदर्शित झाला.
१९१२
पूर्ण पणे भारतात बनवलेला मूकपट 'पुंडलिक' प्रदर्शित झाला.
१८०४
नेपोलिअन बोनापार्ट फ्रान्सचा सम्राट झाला.
१४९८
वास्को-द-गामा भारतातील कालिकत बंदरात दाखल झाला.
=========================================
ब) जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  -----------------------------
१९३३
एच. डी. देवेगौडा – भारताचे ११ वे पंतप्रधान
१९२०
पोप जॉन पॉल (दुसरा)
(मृत्यू: २ एप्रिल २००५)
१९१३
पुरुषोत्तम काकोडकर – गोवा मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्यसैनिक, काँग्रेसचे नेते, ५ व्या लोकसभेचे सदस्य
(मृत्यू: २ मे १९९८)
१८७२
बर्ट्रांड रसेल – ब्रिटिश गणितज्ञ, तत्त्वज्ञ आणि इतिहासकार
(मृत्यू: २ फेब्रुवारी १९७०)
१६८२
छत्रपती शाहू महाराज (मूळ नाव शिवाजी) – छत्रपती संभाजी व येसूबाई यांचे चिरंजीव [वैशाख व. ७, शके १६०७]
(मृत्यू: १५ डिसेंबर १७४९)
१०४८
ओमर खय्याम – पर्शियन तत्त्वज्ञ, गणितज्ञ, खगोलशास्त्रज्ञ आणि कवी
(मृत्यू: ४ डिसेंबर ११३१)
=========================================
क) मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
    -------------------------
२००९
वेल्लुपल्ली प्रभाकरन – एल. टी. टी. ई. चा संस्थापक
(जन्म: २६ नोव्हेंबर १९५४)
१९९९
रामचंद्र सप्रे – पहिले राष्ट्रीय बुद्धीबळ विजेते
(जन्म: ? ? ????)
१९९७
कमलाबाई गोखले
कमलाबाई कामत तथा कमलाबाई रघुनाथ गोखले – भारतीय चित्रपटसृष्टीतील पहिल्या स्त्री कलाकार. 'राजा हरिश्चंद्र' या पहिल्या मूकपटात त्यांनी भूमिका केली होती. त्यांचे चिरंजीव चंद्रकांत गोखले व नातू विक्रम गोखले अशा तीन पिढ्यांनी अभिनय क्षेत्र गाजवले.
(जन्म: ६ सप्टेंबर १९०१)
१९६६
पंचानन माहेश्वरी – सपुष्प वनस्पतींतील पुनरुत्पादन क्रियेसंबंधी संशोधन करणारे वनस्पतीशास्त्रज्ञ
(जन्म: ९ नोव्हेंबर १९०४)
१८४६
बाळशास्त्री जांभेकर – मराठी पत्रकारितेचे पितामह, १८३२ मधे 'दर्पण' हे वृत्तपत्र काढून त्यांनी वृत्तपत्र व्यवसायाचा पाया घातला. 'दिग्दर्शन' हे मराठीतील पहिले मासिकही त्यांनीच १८४० मधे सुरू केले.
(जन्म: ६ जानेवारी १८१२)
=========================================

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-18.05.2023-गुरुवार.
=========================================