दिन-विशेष-लेख-जागतिक संग्रहालय दिन-A

Started by Atul Kaviraje, May 18, 2023, 11:27:05 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                   "दिन-विशेष-लेख"
                               "जागतिक संग्रहालय दिन"
                              -----------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-18.05.2023-गुरुवार आहे, 18 मे हा दिवस "जागतिक संग्रहालय दिन" म्हणूनही ओळखला जातो. वाचूया, तर या दिवसाचे महत्त्व, आजच्या या "दिन-विशेष-लेख" या शीर्षकI-अंतर्गत.

     आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिन दरवर्षी 18 मे रोजी साजरा केला जातो.

     आज 18 मे निमित्त जगभरात जागतिक संग्रहालय दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधून आज आम्ही तुम्हाला भारतातील अश्या आत संग्रहालयाबद्दल माहिती देणार आहोत जे तुम्ही कधीच पाहिले नसतील.
     
आज जागतिक संग्रहालय दिवस; भारतातील या संग्रहालयाविषयी तुम्हाला नक्कीच माहिती नसेल

     जगभरात 18 मे हा दिवस जागतिक संग्रहालय दिवस म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. 1977 सालापासून जगभरात हा दिवस साजरा केला जातो. दरवर्षी आंतरराष्ट्रीय संग्रहालय कौन्सिल यांच्यामार्फत जगभरात विविध कार्यक्रमाचे आयोजन जागतिक संग्रहालय दिवसाच्या निमित्ताने केले जाते. गेल्या अनेक वर्षांपासून जगभरातील देशांचा या कार्यक्रमात मोठ्या प्रमाणावर सहभाग दिसून येत असतो. या कार्यक्रमात अनेक ऐतिहासिक तसेच विचित्र गोष्टींचे सुद्धा प्रदर्शन पाहायला मिळत असते. भारतात सुद्धा अनेक संग्रहालय आहेत परंतु त्यातील काही संग्रहालयांची आपल्याला माहिती सुद्धा नसते. आज आम्ही भारतातील अश्याच आठ थोड्या विचित्र वाटणाऱ्या संग्रहालयाची तुम्हाला माहिती देणार आहोत.

                1. लेजेंड मोटरसायकल कॅफे संग्रहालय:--

     भारताची आयटी राजधानी असलेल्या बँगलोर शहरात लेजेंड मोटरसायकल कॅफे संग्रहालय आहे. या संग्रहालयात 20 पेक्षा अधिक विंटेज दुचाकी वाहने आजही चालू स्थितीत असलेले आपल्याला पाहायला मिळते. हे संग्रहालय दुचाकी वाहनाचे निस्सीम चाहते असणारे एस.प्रभू यांच्या आजपर्यंतच्या कलेक्शन मधून साकार झाले आहे. या संग्रहालयात 1924 सालची दुचाकी पासून ते 1942 च्या जेम्स एमएल व बीएसए एम20 सुद्धा बघायला मिळतात. जर तुम्ही दुचाकी वाहनांचे शौकीन असाल किंवा बँगलोरला येत-जात असाल तर तुम्ही या संग्रहालयाला आवश्य भेट दिली पाहिजे.

                    2. पतंग संग्रहालय:--

     होय तुम्ही बरोबर वाचलंय पतंग संग्रहालय. गुजरात राज्य संक्रातीतील पतंग महोत्सवासाठी संपूर्ण जगात ओळखले जाते. त्याच गुजरात मधील अहमदाबाद शहरात पतंग संग्रहालय सुद्धा आहे. या पतंग संग्रहालयात 125 पेक्षा अधिक अतिशय दुर्मिळ अश्या पतंग पाहायला मिळतात. या संग्रहालयाची स्थापना हि 1986 साली करण्यात आली. या संग्रहालयाला पतंग प्रेमी श्री. भानूभाई शाह यांनी त्यांच्या कलेक्शन मधील सर्व पतंगी दान म्हणून दिल्या आहेत. वयाच्या 21 व्या  वर्षांपासून त्यांनी या पतंगी जमा करण्यास सुरवात केली होती.

                      3. पुरखौती मुक्तांगण:--

     पुरखौती मुक्तांगण हे खरतर संपूर्ण छत्तीसगड राज्याच्या संस्कृतीचे संग्रहालय आहे. या संग्रहालयात आपल्याला छत्तीसगड राज्यातील संपूर्ण संस्कृतीचे दर्शन होते. 2006 साली छत्तीसगडमधील रायपूर या ठिकाणी या संग्रहालयाचे मा.राष्ट्रपती अब्दुल कलाम यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले होते.

--रफिक पठाण
--------------

                      (साभार आणि सौजन्य-संदर्भ-इ सकाळ.कॉम)
                      ---------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-18.05.2023-गुरुवार.
=========================================