दिन-विशेष-लेख-जागतिक संग्रहालय दिन-B

Started by Atul Kaviraje, May 18, 2023, 11:28:37 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                   "दिन-विशेष-लेख"
                               "जागतिक संग्रहालय दिन"
                              -----------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-18.05.2023-गुरुवार आहे, 18 मे हा दिवस "जागतिक संग्रहालय दिन   " म्हणूनही ओळखला जातो. वाचूया, तर या दिवसाचे महत्त्व, आजच्या या "दिन-विशेष-लेख" या शीर्षकI-अंतर्गत.

     आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिन दरवर्षी 18 मे रोजी साजरा केला जातो.

                      4. मानवी मेंदूचे संग्रहालय:--

     बँगलोरमध्ये 2010 साली विज्ञानाच्या दृष्टीने अति महत्वाचे मानता येईल अश्या या मानवी मेंदूच्या संग्रहालयाची स्थापना करण्यात आली. या संग्रहालयात काचेच्या बरणीत जतन करून ठेवलेले 400 पेक्षा जास्त मेंदू आपल्याला पाहायला मिळतात. आजार, मार लागून  मेंदूवर परिणाम झालेले अनेक मेंदू या ठिकाणी अभ्यासाच्या हेतूने जतन करून ठेवण्यात आले आहेत.

                     5.  मायोंग मध्यवर्ती संग्रहालय:--

     आसामची राजधानी असलेल्या गुवाहाटी शहराच्या अगदी जवळ मायोंग नावाचे छोटेसे शहर आहे. तुम्हाला जाणून आश्चर्य होईल कारण ही जागा त्याच्या काळ्या जादूच्या विद्येसाठी कुप्रसिद्ध आहे. आणि त्याहून अधिक आश्चर्याची बाब अशी कि याठिकाणी जगातील एकमेव काळ्या जादूच्या विद्येचे संग्रहालय सुद्धा आहे. या संग्रहालयात अनेक वस्तू ठेवण्यात आल्या आहेत ज्याचा प्राचीन लोकांनी काली जादू करण्यासाठी उपयोग केला होता. याठिकाणी असलेल्या लोकांकडून त्याचे प्रात्यक्षिक सुद्धा करून दाखविण्यात येते.

                6. आंतरराष्ट्रीय सुलभ शौचालय संग्रहालय:--

     समाजसुधारक डॉ.बिंदेश्वर पाठक यांच्या संकल्पनेतून असे अनोखे आंतरराष्ट्रीय सुलभ शौचालय संग्रहालय स्थापन करण्यात आले आहे. या संग्रहालयात अति प्राचीन अश्या अनेक शौचालय, तसेच अति महागडे असे शौचालय यांच्याबद्दल माहिती आपल्याला मिळते. प्राचीन काळात कशाप्रकारे त्याची निर्मिती केली होती याचे पुरावे सुद्धा आपल्याला याठिकाणी पाहायला मिळतात. अकराव्या शतकात असलेल्या शौचालयाचा इतिहास याठिकाणी गेल्यानंतर आपल्याला पाहायला मिळतो. आजपर्यंत 1 लाखाहून अधिक लोकांनी या अनोख्या संग्रहालयाला भेट दिली आहे.

                  7. रिजर्व बँक ऑफ इंडिया संग्रहालय:--

     भारताचे आर्थिक चक्र फिरवणाऱ्या रिजर्व बँक ऑफ इंडियाचे स्वतःचे अशे संग्रहालय असून या संग्रहालयात मोठ्या प्रमाणात जतन केलेल्या नाणे, चलनी नोटा या आपल्याला पाहायला मिळतात. तसेच या संग्रहालयात हस्ताक्षराचे सुद्धा संग्रहालय असून त्यात अनेक दिग्ग्ज लोकांचे हस्ताक्षर आपल्याला पाहायला मिळतात.

                        8. सुधा कार संग्रहालय:--

     आपल्यातील अनेकांना वेगवेगळ्या कारची आवड असते. व त्या पाहायला चालवायला आपल्याला आवडते. सुधा कार संग्रहालय या संग्रहालयाची स्थापना 2010 साली के.सुधाकर यांनी केली. के सुधाकर यांच्या नावावर जगातील सर्वात मोठी तीन चाकी सायकल बनविण्याचा रेकॉर्ड असून त्याची नोंद गिनीज बुकमध्ये सुद्धा आहे. त्यांनी केवळ 20 दिवसात 55 फूट उंच व 20 फूट लांब इतकी मोठी तीन चाकी सायकल बनविली होती. के. सुधाकर यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या या संग्रहालयात विविध आकाराच्या कार आपल्याला पाहायला मिळतात. त्यामध्ये बूट, सॅन्डल, शिवलिंग, हेल्मेट, पर्स, शौचालय इत्यादी आकाराच्या कार आपल्याला पाहायला मिळतात.

--रफिक पठाण
--------------

                      (साभार आणि सौजन्य-संदर्भ-इ सकाळ.कॉम)
                     ----------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-18.05.2023-गुरुवार.
=========================================