दिन-विशेष-लेख-जागतिक काविळ दिन

Started by Atul Kaviraje, May 19, 2023, 11:14:14 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                   "दिन-विशेष-लेख"
                                "जागतिक काविळ दिन"
                               ----------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-19.05.2023-शुक्रवार आहे, 19 मे हा दिवस "जागतिक काविळ दिन" म्हणूनही ओळखला जातो. वाचूया, तर या दिवसाचे महत्त्व, आजच्या या "दिन-विशेष-लेख" या शीर्षकI-अंतर्गत.

     गुरुवारी २८ जुलैला जागतिक कावीळ दिनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित जनजागरण संदर्भातील पत्रकार परिषदेत डॉ. ठाकरे यांनी माहिती दिली. डॉ. ठाकरे यांनी सांगितले की, देशात दरवर्षी हिपॅटायटिसमुळे २५ लाख रुग्ण मरण पावतात.

     'देशात कावीळ या आजाराने ग्रस्त असलेल्यांची संख्या मोठी आहे. कावीळ या रोगावर योग्य उपचार न झाल्यास रुग्ण दगावण्याची शक्यता अधिक असते. म्हणून प्रत्येकाने कावीळ समजून घेणे आवश्यक आहे. यासंदर्भात समाजात जणजागरण महत्त्वाचे अाहे,' असे मत येथील पोट आणि लिव्हर विकार तज्ज्ञ डॉ. शिवाजी ठाकरे यांनी व्यक्त केले.गुरुवारी २८ जुलैला जागतिक कावीळ दिनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित जनजागरण संदर्भातील पत्रकार परिषदेत डॉ. ठाकरे यांनी माहिती दिली.

     डॉ. ठाकरे यांनी सांगितले की, देशात दरवर्षी हिपॅटायटिसमुळे २५ लाख रुग्ण मरण पावतात. कावीळ म्हणजे यकृतावर होणारी सूज होय. या सुजेला कारणीभूत असलेले आतापर्यंत पाच प्रकारचे व्हायरस जसे ए, बी, सी, डी आणि ई हे ओळखण्यात आले आहेत.

     या सर्वामध्ये हिपॅटायटिस-बी आणि हिपॅटायटिस-सी हा वायरस जास्त महत्वपूर्ण असून, या व्हायरसची लागण झालेले रुग्ण सर्वत्र मोठ्या प्रमाणात आढळून येतात. यापैकी हिपॅटायटिस बी यावर औषधे उपलब्ध असले तरी निरंतर लसीकरण उपचार हाच योग्य उपाय आहे. तसेच टक्केवारी नुसार हिपॅटायटिस बी-२-५ व हिपॅटायटिस सी-१-२% अाहे, असे मत डॉ शिवाजी ठाकरे यांनी या वेळी व्यक्त केले. हिपॅटायटिस बी व सी हे जास्त घातक असून, यात डॉक्टरांचा सल्ला व उपचार घेणे गरजेचे आहे. कावीळ रोगाची लक्षणे प्रथम रुग्णांना समजत नाहीत.

     त्यामुळे रुग्ण या आजाराने बाधित आहे की नाही हे कळत नाही. हळूहळू मात्र या विषाणूच्या प्रभावाने यकृतावर सूज निर्माण होऊन त्यातील पेशी नष्ट होऊन यकृत कडक होते. रुग्णाच्या लक्षात येईपर्यंत त्यातील अर्ध्याहून अधिक विकृत पेशी नष्ट होऊन त्याची कार्यक्षमता कमी होते. हिपॅटायटिस-बीसाठी लसीकरणाची बचावासाठी अधिक गरज असल्याचे त्यांनी या वेळी स्पष्ट केले. हिपॅटायटिस अर्थात कावीळ या विषाणूची लागण झाली की नाही हे रक्त व लघवी, लिव्हर फंक्शन टेस्ट, लिव्हर बायोप्सी, लिव्हर एक्सरे परीक्षण आणि अल्ट्रासाउंड या तपासणीद्वारे रुग्णाला कळू शकते.

                  कावीळ आजाराची लक्षणे अशी--

     हिपॅटायटिसची लक्षणं सांगताना डॉ. ठाकरे म्हणाले, भूक न लागणे, अशक्तपणा, पिवळेपणा, लघवी पिवळी होणे, डोळे पिवळे होणे, त्वचा पिवळी होणे, मळमळ व उलटी, शरीराला खाज, उजव्या कुशीत दुखणे ही या काविळीची प्राथमिक लक्षणे आहेत. या रोगाची अंतिम पातळी म्हणजे यकृताचा कर्करोग आहे. जो लाखांपैकी एकाद्या रुग्णाला शक्य असतो.

                    प्रतिबंधक उपाय--

     प्रतिबंधक उपाय म्हणून दुसऱ्याच्या साधनाचा वापर करू नये, अनैतिक, असुरक्षित लैंगिक संबंध टाळावेत, मद्यपान टाळावे, रक्त घेताना रक्त हे हिपॅटायटीस बाधित नसल्याची खात्री करावी, वापरलेल्या सलाईनचा, सुयांचा इंजेक्शनचा वापर करू नये. अशा पद्धतीने आपण हेपेटाइटीस बी आणि सी ला रोखू शकतो.

                 (साभार आणि सौजन्य-संदर्भ-दिव्या मराठी.भास्कर.कॉम)
                -------------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-19.05.2023-शुक्रवार.
=========================================