दिन-विशेष-लेख-दहशतवाद व हिंसाचारविरोधी दिन-A

Started by Atul Kaviraje, May 21, 2023, 11:15:24 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                  "दिन-विशेष-लेख"
                           "दहशतवाद व हिंसाचारविरोधी दिन"
                          --------------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-21.05.2023-रविवार आहे, 21 मे हा दिवस "दहशतवाद व हिंसाचारविरोधी दिन" म्हणूनही ओळखला जातो. वाचूया, तर या दिवसाचे महत्त्व, आजच्या या "दिन-विशेष-लेख" या शीर्षकI-अंतर्गत.

     २१ मे १९९१ रोजी लोकसभा निवडणूक प्रचारादरम्यान तामिळनाडू राज्यातील श्रीपेरंबुदुर येथे सभेला संबोधित करत असताना तामीळ दहशतवाद्यांनी काँग्रेसचे तत्कालीन अध्यक्ष राजीव गांधी यांची हत्या घडवून आणली. या दिवसांचे औचित्य साधून २१ मे हा दिवस दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिवस म्हणून पाळला जातो.

     आंतरराष्ट्रीय दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिवस विशेषद: हशतवाद निर्मिती केंद्रांना तिलांजली.

     दहशतवादाचा फटका जगातील अनेक देशांना बसत आहे. त्यामुळे हा प्रश्न कोणत्याही एका देशाचा नाही. दहशतवाद जगात सर्वत्र वेगाने पसरत आहे. त्यामुळे जागतिक शांततेला धोका निर्माण झाला आहे. मे १९९१मध्ये काँग्रेस पक्षाच्या प्रचारादरम्यान तामिळनाडू राज्यातील श्रीपेरंबुदुर येथे सभेला संबोधित करत असताना दहशतवाद्यांनी भारताचे दिवंगत माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची हत्या घडवून आणली. या घटनेचे औचित्य साधून २१ मे हा दिवस दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिवस म्हणून पाळला जातो. याच दिवशी त्यांची पुण्यतिथी असते. हाच दिवस दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिवस म्हणून संपूर्ण देशात व जगातही पाळला जातो.

     या देशाचे सर्वात तरुण पंतप्रधान म्हणून त्यांनी सन १९८४ ते सन १९८९पर्यंत काम पाहिले. संपूर्ण जगात शांतता प्रस्थापित व्हावी व अहिंसेचा संदेश सर्वत्र पोहोचावा तसेच देशासाठी दहशतवाद विरोधात लढणार्‍या हजारो सैनिकांच्या बलिदानाचा सन्मान करणे, भावी पिढीला मूलगामी प्रभावापासून वाचविणे, त्यांच्या मनामध्ये देशाच्या प्रगतीसाठी, संरक्षणासाठी जागरुकता निर्माण करणे, हे देखील या दिवसाचे उद्देश आहेत. या मानवनिर्मित उपद्रवी कृत्यांची जॉन क्रेटम यांनी अशी व्याख्या केली- आपल्या राजकीय मागण्या जबरदस्तीने मान्य करून घेण्यासाठी विशिष्ट समूहात आत्यंतिक भीती निर्माण करण्याच्या हेतूने एखादी व्यक्ती किंवा गट यांनी प्रस्थापित सत्तेच्या बाजूने किंवा विरोधात चालविलेला हिंसाचार किंवा निर्माण केलेला धाक म्हणजे दहशतवाद होय.

     आज सर्व जगच दहशतीच्या छायेखाली सापडलेले असून कोणत्या ठिकाणी कधी हल्ला होईल? याची सततची टांगती तलवार प्रत्येकाच्या डोक्यावर लटकत असते. कोणता मनुष्य आज सुरक्षित आहे, हे खात्रीपूर्वक सांगणे कठीण झालेले आहे. मुंबई, दिल्लीसारख्या मोठ्या शहरातील माणूस सकाळी घराबाहेर पडला, तर संध्याकाळी तो सुखरूप घरी परतेल का? याची खात्री देता येत नाही, ही वस्तुस्थिती आहे. भारतातील दहशतवादाचा विचार केला, तर अनेक वेळा दहशतवादी हल्ले झालेले आहेत. मग तो मुंबई लोकल ट्रेनमधील साखळी बॉम्ब हल्ला असेल, सीएसटी. रेल्वेस्टेशनवर तसेच हॉटेल ताज, हॉटेल ओबेरॉय येथील हल्ला असेल. या देशाचा मानबिंदू म्हणून ज्याकडे आदराने पाहिले जाते; त्या पवित्र संसदेवर देखील अतिरेक्यांनी हल्ला केला. तसेच उरी वा पुलवामा येथे सीआरपीएफ जवानांच्या गाड्यांच्या ताफ्यावर झालेला हल्ला असेल, असे वर्षानुवर्षे दहशतवादी प्रवृत्ती हल्ले करत आहे. जम्मू-काश्मीर येथे नियमित असे हल्ले होत आहेत. त्यामुळे हजारो निरपराध नागरिक, कर्तव्यावरील भारतीय सैनिक पोलीस दल यांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.

--मनोज कांबळे
--------------

                    (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मीडिया वार्ता न्यूज.कॉम)
                   -----------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-21.05.2023-रविवार.
=========================================