दिन-विशेष-लेख-आंतरराष्ट्रीय जैवविवीधता दिन-A

Started by Atul Kaviraje, May 22, 2023, 10:25:00 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                    "दिन-विशेष-लेख"
                              "आंतरराष्ट्रीय जैवविवीधता दिन"
                             ----------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-22.05.2023-सोमवार आहे, 22 मे हा दिवस "आंतरराष्ट्रीय जैवविवीधता दिन" म्हणूनही ओळखला जातो. वाचूया, तर या दिवसाचे महत्त्व, आजच्या या "दिन-विशेष-लेख" या शीर्षकI-अंतर्गत.

     आपल्या पृथ्वीवर जर फक्त मनुष्यप्राणी राहिला असता व इतर कोणत्याही प्रकारचे सजीव जर राहिले नसते तर माणसाचे जीवन आजच्यासारखे आनंदी, सुखी व विविधतापूर्ण राहिले असते का ? किंवा जंगलामध्ये फक्त वाघाच राहिले असते तर ही सजीव सृष्टी टिकली असती का? असे जर तुम्हाला विचारले तर याचे उत्तर तुम्ही निश्चितच नाही असे द्याल. पृथ्वीवर अस्तित्वात असलेल्या सर्व सजीव-निर्जीव वस्तू व प्राणी-पक्ष्यांची एकमेकांशी असणारे संबंध याविषयी छान माहिती देणारा जैवविविधता म्हणजे काय हा लेख आपण बघूया.

=========================================
| जैवविविधता म्हणजे काय ?
    | जैवविविधता कोणकोणत्या बाबतीत आढळून येते.
       |जैविक विविधतेचे प्रकार कोणते ?
|जनुकीय विविधता(अनुवांशिक विविधता )
|जाती विविधता (प्रजाती  विविधता)
|परिसंस्था विविधता
|आपला परिसर कोणकोणत्या घटकांनी बनलेला आहे ?
|जैवविविधतेचा ऱ्हास|जैवविविधतेच्या ऱ्हासाची कारणे
| दुर्मिळ जातीच्या सजीवांच्या संरक्षणाचे उपाय, जैवविविधता टिकवण्याचे उपाय
Faq's
|परिसंस्था शब्द प्रथम कोणी वापरला ?
   |जागतिक जैवविविधता दिन
|जैवविविधतेचे समृद्ध प्रदेश ही संकल्पना प्रथम कोणी मांडली ?
|भारतामध्ये किती जैवविविधता क्षेत्र आहे ?
| जैवविविधता म्हणजे काय ?
=========================================

     दैनंदिन जीवन जगत असताना आपल्याला अनेक प्रकारचे प्राणी, पक्षी, वनस्पती बघायला मिळतात. हे सर्व पक्षी एकच प्रकारचे आहेत का ? किंवा प्राणी हे एक सारखेच दिसतात का? असा प्रश्न जर तुम्हाला कोणी विचारला तर त्याचे उत्तर अर्थातच नाही असे तुम्ही देणार.

     पृथ्वीवर अस्तित्वात असणाऱ्या सर्व सजीवांमधील असणारी विविधता म्हणजेच जैवविविधता होय. यालाच जैविक विविधता असेदेखील म्हणतात.

     आपल्या पृथ्वीवर जे जे सजीव अस्तित्वात आहेत त्यामध्ये वनस्पती आणि प्राणी या दोघांचाही समावेश होतो. या सर्वांमध्ये हजारो प्रकारच्या प्रजाती अस्तित्वात आहेत. सर्व प्राणी आणि वनस्पती यांचा आकार त्यांच्या कृती या सर्वांचे अवयव या सर्व बाबतीमध्ये वेगळेपणा आढळतो.

      एकंदरीत विचार केला तर पृथ्वीवर असणाऱ्या सजीवांमध्ये रंग ,आकार ,आकृती इत्यादी सर्व विविधता आढळून येते .त्यालाच जैविक विविधता किंवा जैवविविधता असे म्हणतात.

                     जैवविविधता म्हणजे काय ?--

    | जैवविविधता कोणकोणत्या बाबतीत आढळून येते.

शरीर रचना
आकार
अवयव
प्रजनन
आहार
गुणसूत्र
अधिवास. इत्यादी ...

                  (साभार आणि सौजन्य-संदर्भ-उपकार मराठी.कॉम)
                 --------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-22.05.2023-सोमवार.
=========================================