दिन-विशेष-लेख-आंतरराष्ट्रीय जैवविवीधता दिन-B

Started by Atul Kaviraje, May 22, 2023, 10:26:38 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                   "दिन-विशेष-लेख"
                             "आंतरराष्ट्रीय जैवविवीधता दिन"
                            ----------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-22.05.2023-सोमवार आहे, 22 मे हा दिवस "आंतरराष्ट्रीय जैवविवीधता दिन" म्हणूनही ओळखला जातो. वाचूया, तर या दिवसाचे महत्त्व, आजच्या या "दिन-विशेष-लेख" या शीर्षकI-अंतर्गत.

                        |जैविक विविधतेचे प्रकार कोणते ?--

             |जैवविविधता प्रामुख्याने तीन प्रकार दिसून येतात.

जनुकीय विविधता (अनुवांशिक विविधता )
जाती विविधता (प्रजाती  विविधता)
परिसंस्था विविधता

                  |जनुकीय विविधता(अनुवांशिक विविधता )--

      जनुकीय विविधतेचे मध्ये एखाद्या जातीच्या सजीवांमधील जनुकांमध्ये असणारे विविधता याचा अभ्यास केला जातो. गुणसूत्रांमधील विविधता यामध्ये अभ्यासली जाते.उदाहरण : एकाच घरातील माणसे सारखी नसतात .

                  |जाती विविधता (प्रजाती विविधता)--

      एखाद्या विशिष्ट भौगोलिक प्रदेशांमध्ये आढळून येणाऱ्या किंवा सजीवांच्या विशिष्ट गटांमध्ये जी जैवविविधता आढळून येते .तिचा अभ्यास जाती  विविधतेमध्ये केला जातो. ध्रुवीय म्हणजेच थंड  प्रदेशांमध्ये आढळणाऱ्या सजीवांच्या जातीमध्ये उष्ण प्रदेशातील सजीवांच्या मानाने कमी विविधता आढळून येते.

                      |परिसंस्था विविधता--

         विशिष्ट सजीव ज्या विशिष्ट परिस्थितीमध्ये राहतात तिला परिसंस्था असे म्हटले जाते. पृथ्वीवर अनेक प्रकारच्या परिसंस्था आहेत यामध्ये प्राणी व वनस्पती या दोघांचा आपल्याला समावेश करता येईल. ज्या परिसंस्थेमध्ये प्राणी किंवा वनस्पती राहत असतात त्या सर्व प्राणी आणि वनस्पतींना आवश्यक घटकांचा परिसंस्थेमध्ये समावेश केलेला असतो. प्रत्येक परिसंस्थेमध्ये अनेक प्रकारच्या या जातींचे मिश्रण असते आणि हे मिश्रण इतर परिसंस्थेत पेक्षा वेगळे असते. याचे उदाहरण द्यायचे झाले तर महाराष्ट्राचा समान अक्षर वृत्तीय विस्तार आहे तरीदेखील पश्चिम घाटात जैवविविधता जास्त आढळून येते तर पूर्व भागामध्ये ती कमी आहे.

               |आपला परिसर कोणकोणत्या घटकांनी बनलेला आहे ?--

      आपला परिसर प्राणी, पक्षी ,वनस्पती यामुळे सजलेला आहे त्याबरोबरच आपल्या आजूबाजूला आपल्याला जे नदी, नाले, डोंगर, ओढे, ओहोळ दिसतात या सर्वांचा समावेश परिसरामध्ये होतो. सूक्ष्मजीव तसेच एकपेशीय  प्राणी, वनस्पतीं पासून तर देवमासा, हत्ती अशा महाकाय प्राण्यांपर्यंत सर्वांचा आपल्या परिसरामध्ये समावेश होतो.

                  (साभार आणि सौजन्य-संदर्भ-उपकार मराठी.कॉम)
                 ---------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-22.05.2023-सोमवार.
=========================================