दिन-विशेष-लेख-जागतिक स्किझोफ्रेनिया जागरूकता दिन

Started by Atul Kaviraje, May 24, 2023, 10:34:43 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                  "दिन-विशेष-लेख"
                        "जागतिक स्किझोफ्रेनिया जागरूकता दिन"
                       --------------------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-24.05.2023-बुधवार आहे, 24 मे हा दिवस "जागतिक स्किझोफ्रेनिया जागरूकता दिन" म्हणूनही ओळखला जातो. वाचूया, तर या दिवसाचे महत्त्व, आजच्या या "दिन-विशेष-लेख" या शीर्षकI-अंतर्गत.

     24 मे रोजी साजरा होतो जागतिक स्किझोफ्रेनिया दिवस. रुग्णाकडे फक्त एकच व्यक्तिमत्व असते, ते गोंधळलेले असते, गोंधळलेले असते आणि ते त्यांच्या स्वतःच्या छोट्या जगात राहतात. म्हणूनच, या मानसिक विकृतीबद्दल जागरूकता वाढविण्यासाठी, दरवर्षी 24 मे रोजी जागतिक स्किझोफ्रेनिया दिवस साजरा केला जातो.

     'स्किझोफ्रेनिया' हा आजार नियंत्रणात राहणारा असला तरी तो पूर्णतः बरा होत नाही. अनुवांशिकतेमुळे हा आजार काही प्रमाणात होत असला तरी सध्याच्या बदलत्या जीवनशैलीतील वाढत्या तणावामुळे 'स्किझोफ्रेनिया'च्या आजारात भर पडत असल्याचे निरीक्षण मानसोपचार तज्ज्ञांनी नोंदविले.

     'स्किझोफ्रेनिया' हा आजार नियंत्रणात राहणारा असला तरी तो पूर्णतः बरा होत नाही. अनुवांशिकतेमुळे हा आजार काही प्रमाणात होत असला तरी सध्याच्या बदलत्या जीवनशैलीतील वाढत्या तणावामुळे 'स्किझोफ्रेनिया'च्या आजारात भर पडत असल्याचे निरीक्षण मानसोपचार तज्ज्ञांनी नोंदविले.

     जागतिक 'स्किझोफ्रेनिया' दिन आज, मंगळवारी (२४ मे) जगभर पाळण्यात येत आहे. त्यानिमित्ताने 'स्किझोफ्रेनिया'च्या आजारासंदर्भात मानसोपचार तज्ज्ञांनी काही निरीक्षणे नोंदविली. 'जगण्याची क्षमता कमी झालेली असते. त्यामुळे मनोरुग्ण चिडतो हे इतरांनी समजून घेतले पाहिजे. विचारांची मालिका शाबूत नसल्याने इतरांसारखे काम करता येत नाही हे इतरांनी लक्षात घ्यायला हवे. त्याच्या क्षमतेनुसार योग्य काम शोधले पाहिजे. स्किझोफ्रेनियाच्या पेशंटशी वागताना इतरांनी समजूतदारपणा दाखवायला हवा. ताणतणावामुळे स्किझोफ्रेनिया वाढतो असे नाही. मात्र, ज्या व्यक्ती मानसिकदृष्ट्या खचलेल्या आहेत त्यांना बदलत्या जीवनशैलीमुळे होणाऱ्या ताणतणावामुळे स्किझोफ्रेनिया होण्याची स्थिती निर्माण होते,' अशी माहिती ज्येष्ठ मानसोपचारतज्ज्ञ डॉ. उल्हास लुकतुके यांनी दिली.

     मेंदूचा हा विशिष्ट आजार आहे. मेंदूतील होणारे बदल हे प्राथमिक कारण आहे. 'स्किझोफ्रेनिया' होण्याचे अनुवंशिकता हे कारण समजले जाते. परंतु, ते संपूर्णपणे कारणीभूत ठरत नाही. ताणतणाव वाढत असला तरी पेशंटचे प्रमाण वाढते असे नाही. गेल्या अनेक वर्षांपासून निदान होत असल्याने 'स्किझोफ्रेनिया'बाबत जागृती वाढत आहे, याकडे डॉ. लुकतुके यांनी लक्ष वेधले.

     'स्किझोफ्रेनिया हा आयुष्यभर मानसिक आजार आहे. अनुवंशिकतेमुळेच हा आजार होत असून सध्याच्या बदलत्या जीवनशैलीमुळे ताणतणाव वाढत आहे. त्यामुळे 'स्किझोफ्रेनिया'चा आजारात वाढ होण्यात अधिक भर पडत आहे,' असे मत मानसोपचारतज्ज्ञ डॉ. सागर मुंदडा यांनी व्यक्त केले. 'प्रत्येकाविषयी संशयी वृत्ती, मित्र, पत्नी, बायको किंवा कुटुबांतील इतरांविषयी शंका घेणे. सर्वांशी वेगळे होणे तसेच आपल्याला आजार झाला आहे मुळात जाणीव नसते. त्यासाठी उपचार घ्यायला तयार होत नाहीत. त्यांच्याविरोधात बोलले तरी ती व्यक्ती त्यांच्या अंगावर जाते. लोकसंख्येच्या एक टक्के 'स्किझोफ्रेनिया'च्या पेशंटचे प्रमाण आहे. हा आजार बरा होऊ शकत नसला तरी त्याच्यावर नियंत्रण मिळविता येते. अनुवांशिकता जरी असले तरी पालकांकडून मुलाला आजार होण्याचे प्रमाण ५० टक्क्यांपर्यंत असू शकते तर पूर्वीच्या पिढीकडून हा आजार होण्याची १० टक्के शक्यता असते,' असे डॉ. मुंदडा यांनी सांगितले.

                'स्किझोफ्रेनिया'ची लक्षणे--

     पेशंट एकटा स्वतःशीच बडबडतो. हातवारे करतो. कुटुंबीयांशी वार्तालाप कमी करतो. अचानक राग येतो. पुरेशी झोप न होणे. आजूबाजूंशी मिसळत होत नाही. अचानक हिंसक होतो.

--जयदीप पाठकजी
-----------------

                    (साभार आणि सौजन्य-संदर्भ-महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
                   --------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-24.05.2023-बुधवार.
=========================================