दिन-विशेष-लेख-जागितक पचनस्वास्थ्य दिन

Started by Atul Kaviraje, May 29, 2023, 08:03:40 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                   "दिन-विशेष-लेख"
                              "जागितक पचनस्वास्थ्य दिन"
                             -------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-29.05.2023-सोमवार आहे, 29 मे हा दिवस "जागितक पचनस्वास्थ्य दिन" म्हणूनही ओळखला जातो. वाचूया, तर या दिवसाचे महत्त्व, आजच्या या "दिन-विशेष-लेख" या शीर्षकI-अंतर्गत.

     जागतिक आरोग्य संघटनेच्या दृष्टीने आरोग्य म्हणजे केवळ रोगांचा अभाव नसून ती एक शारीरिक, मानसिक, सामाजिक आणि अध्यात्मिक समतोलाची अवस्था आहे. अन्नाचे पचन व्यवस्थित झाले तरच स्वास्थ्य व्यवस्थित राहते. शुक्रवारी (ता. २९) 'जागतिक पचन स्वास्थ्य दिन' आहे.

     आरोग्य किंवा तब्येत हा शब्द असा आहे की, त्याचा अर्थ काय हे आपल्याला सगळ्यांनाच माहित असतो. पण ते नक्की शब्दात सांगता येत नाही. आरोग्य म्हणजे जेव्हा शरीर आणि मन व्यवस्थित असते म्हणजेच कोणताही रोग, आजार किंवा वेदना नसतात. जागतिक आरोग्य संघटनेच्या दृष्टीने आरोग्य म्हणजे केवळ रोगांचा अभाव नसून ती एक शारीरिक, मानसिक, सामाजिक आणि अध्यात्मिक समतोलाची अवस्था आहे.

          जागतिक पचन स्वास्थ्य दिन : पचनक्रिया स्वास्थ्य तर आरोग्य स्वास्थ्य--

     आरोग्य किंवा तब्येत हा शब्द असा आहे की, त्याचा अर्थ काय हे आपल्याला सगळ्यांनाच माहित असतो. पण ते नक्की शब्दात सांगता येत नाही. आरोग्य म्हणजे जेव्हा शरीर आणि मन व्यवस्थित असते म्हणजेच कोणताही रोग, आजार किंवा वेदना नसतात. जागतिक आरोग्य संघटनेच्या दृष्टीने आरोग्य म्हणजे केवळ रोगांचा अभाव नसून ती एक शारीरिक, मानसिक, सामाजिक आणि अध्यात्मिक समतोलाची अवस्था आहे. अन्नाचे पचन व्यवस्थित झाले तरच स्वास्थ्य व्यवस्थित राहते. शुक्रवारी (ता. २९) 'जागतिक पचन स्वास्थ्य दिन' आहे. आपली पचन क्रिया स्वास्थ्य असेल तर आपले आरोग्य देखील स्वास्थ्य राहते. कारण ९० टक्के आजाराचे मूळ कारण पचन क्रियांशी संलग्न असते. मनुष्याचे शरीर स्वास्थ्य तेव्हाच राहते जेव्हा पचन व्यवस्थित असेल. जेव्हा शरीर आणि मन हे दोन्ही व्यवस्थित असतात तरच आपण आपली नेहमीची कामे नीट, व्यवस्थितपणे आपण करू शकतो.

     आरोग्यासाठी चांगले राहण्यासाठी शरीरही निरोगी हवे, मनाची उभारीही असावी आणि सामाजिक आरोग्याची स्थिती देखील चांगली असावी. चांगली तब्येत किंवा आरोग्य म्हणजे नुसता औषधोपचार नाही तर आनंदी आणि सुखी जीवन ही व्यवस्थित असणे महत्वाचे आहे, अशी शरीराची आणि मनाची अवस्था असते. भक्कम शरीर म्हणजे ज्यावेळी शरीर संपूर्णपणे काम करण्यास योग्य असते. आपल्या शरीराचा एखादा अवयव नीट काम करत नसेल तर म्हणजेच डोळ्यांना नीट दिसत नसेल, कमी ऐकू येत असेल, सांधे दुखत असतील तरी आपण कामे करतच राहतो, पण ज्याला हा कोणताच त्रास नसतो तो जास्त आणि चांगले कामे करू शकणार नाही का? आरोग्य हि संकल्पना अत्यंत व्यापक अर्थाने उपयोगात आणली जाते. आरोग्य म्हणजे स्थुल मनाने शारीरिक, मानसिक, सामाजिक संतुलनाची स्थिती. आरोग्यास असंतुलन निर्माण झाल्यास रोग जडतात. जी व्यक्ती आपली सामाजिक भूमिका सुव्यवस्थितपणे पार पाडण्यासाठी शारीरिक, मानसिक दृष्टया सक्षम असते. ती आरोग्यसंपन्न मानली जाते. म्हणून आरोग्य हि संकल्पना अत्यंत महत्त्वाची आहे. या विषयावर बोलताना डॉ. आशिष पानशेट्टी म्हणाले की, आपली पचन क्रिया स्वास्थ्य असेल तर आपले आरोग्य देखील स्वास्थ्य राहते. कारण ९० टक्के आजाराचे मूळ कारणे पचनक्रियांशी संलग्न असते. मनुष्याचे शरीर स्वास्थ्य तेव्हाच राहते जेव्हा पचन व्यवस्थित असेल. पचनक्रिया चांगली राहण्यासाठी निरोगी आहार व विहार जीवनशैली चांगले असणे आवश्यक आहे. व्यक्तीची पचनक्रिया व्यवस्थित काम करत नसेल तर त्याला पचनाचे आजार जडतात जसे की, आम्लपित्त, उलटी, जुलाब, जाडेपणा मधुमेह, त्यासाठी आहार हे पौष्टिक असणे आवश्यक आहे.

     निरोगी राहणे हे व्यक्तीच्या जीवनशैली आणि पौष्टिक आहारावर अवलंबून असते. पचनशक्ती चांगली राहण्यासाठी फळ, पालेभाज्या, फायबरयुक्त आहार घेणे गरजेचे आहे. रोजच्या जेवणात जास्त मेदयुक्त पदार्थ खाऊ नये. त्यामुळे पचनक्रिया मंदावते. शरीरासाठी पाणी हे अमृतासारखे  आहे. योग्य प्रमाणात पाणी पिल्याने पचनक्रिया सुधारते. त्यामुळे पोट साफ होण्यास मदत होते. जर शरीरामध्ये पाण्याचे प्रमाण कमी असेल तर पचनसंस्था व्यवस्थित कार्य करत नाही. त्यामुळे पित्ताचा त्रास होतो. खाण्यापिण्यासोबतच धूम्रपान- मध्यपान सेवन करू नये. कामातील ताणतणाव टाळावे. रोज तीन वेळा व्यवस्थित आणि वेळेवर जेवण करावे. प्रत्येकांनी व्यायाम नियमित करणे गरजेचे आहे.

--सकाळ वृत्तसेवा
---------------

                     (साभार आणि सौजन्य-संदर्भ-इ सकाळ.कॉम)
                    ----------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-29.05.2023-सोमवार.
=========================================