०३-जून -दिनविशेष

Started by Atul Kaviraje, June 03, 2023, 05:19:53 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-०३.०६.२०२३-शनिवार.जाणून घेऊया,आजच्या दिवसाचे "दिन-विशेष"

                                  "०३-जून -दिनविशेष"
                                 --------------------

-: दिनविशेष :-
०३ जून
जागतिक सायकल दिन
World Bicycle Day
मुंबईत ज्याप्रमाणे सचिवालय आहे त्याचप्रमाणे पेशव्यांच्या काळात राजधानी पुण्यातही सचिवालय होते. ते 'फड' म्हणून ओळखले जाई. पुण्यातील फडात पंधराशे कारकुन काम करत. पेशवेकालीन मराठी साम्राज्यात सर्व फडांमधे काम करणार्‍या कारकुनांची एकूण संख्या होती वीस हजार!
=========================================
अ) महत्त्वाच्या घटना:
   ----------------
१९९८
जमिनीवरील व हवेतील लक्ष्यावर मारा करणार्‍या 'त्रिशूल' या क्षेपणास्त्राची 'द्रोणाचार्य' या युद्धनौकेवरुन कोचीजवळ यशस्वी चाचणी
१९८४
'ऑपरेशन ब्लू स्टार' – भारतीय सैन्याने सुवर्णमंदिरात लपुन बसलेल्या अतिरेक्यांना हुसकावून लावण्यासाठी सुवर्णमंदिरावर हल्ला चढवला.
१९५०
अन्‍नपूर्णा
मॉरिस हेर्झॉग आणि लुईस लॅचेनल यांनी 'अन्‍नपूर्णा' या ८,०९१ मीटर उंच असलेल्या शिखरावर प्रथमच यशस्वी चढाई केली.
१९४७
हिन्दूस्तानच्या फाळणीची 'मांउंटबॅटन योजना' जाहीर झाली.
१९४०
दुसरे महायुद्ध – जर्मन वायूदलाने पॅरिसवर बॉम्बवर्षाव केला.
१९१६
महर्षी कर्वे यांनी भारतातील पहिल्या महिला विद्यापीठाची स्थापना केली.
१८१८
मराठेशाहीचा अस्त – शेवटचा पेशवा बाजीराव हा मध्यप्रदेशातील असीरगढजवळ ढोलकोट येथे जनरल माल्कम याच्या स्वाधीन झाला आणि त्याने मराठी राज्याचे उदक इंग्रजांच्या हातावर सोडले. शनिवारवाड्यावर युनियन जॅक फडकला. [वैशाख व. ३०, शके १७४०]
=========================================
ब) जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  -----------------------------
१९६६
वासिम अक्रम – पाकिस्तानी क्रिकेट कप्तान व जलदगती गोलंदाज
१९६०
सारिका
सारिका ठाकूर तथा सारिका – चित्रपट अभिनेत्री, वेशभूषाकार, ध्वनी तंत्रज्ञ, सहाय्यक दिग्दर्शक.
१९२४
एम. करुणानिधी – तामिळनाडूचे १५ वे मुख्यमंत्री
(मृत्यू: ७ ऑगस्ट २०१८)
१८९५
सरदार कोवालम माधव तथा के. एम. पणीक्‍कर – भारताचे चीन, इजिप्त आणि फ्रान्समधील राजदूत, इतिहासपंडित
(मृत्यू: १० डिसेंबर १९६३)
१८९२
आनंदीबाई शिर्के
आनंदीबाई शिर्के – लेखिका, बालसाहित्यिका
(मृत्यू: ३१ आक्टोबर १९८६)
१८९०
बाबूराव पेंटर – चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, चित्रकार, शिल्पकार आणि 'कलामहर्षी'
(मृत्यू: १६ जानेवारी १९५४)
१८६५
जॉर्ज (पाचवा) – इंग्लंडचा राजा
(मृत्यू: २० जानेवारी १९३६)
=========================================

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-03.06.2023-शनिवार.
=========================================