II वटपौर्णिमा II-शुभेच्छा-5

Started by Atul Kaviraje, June 03, 2023, 05:35:22 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                    II वटपौर्णिमा II
                                   ----------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-०३.०६.२०२३-शनिवार आहे. आज "वटपौर्णिमा" आहे. हिंदू पंचांगातील ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा हा दिवस "वटपौर्णिमा" म्हणून साजरा केला जातो. ह्या दिवशी स्त्रिया वटपौर्णिमा नावाचे व्रत करतात. या व्रतादरम्यान विवाहित स्त्रिया आपल्या पतीला उत्तम आरोग्य लाभावे, दीर्घायुष्य प्राप्त व्हावे म्हणून वडाच्या झाडाची पूजा करतात. मराठी कवितेच्या माझ्या सर्व भाऊ-बहीण, कवी-कवयित्रींना वट -पौर्णिमेच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया वटपौर्णिमेच्या शुभेच्छा.

     काही जणांना आजही मोबाईलवरून एसएमएस करून संदेश पाठवणे आवडते. अशाच काही व्यक्तींसाठी खास एमएमएस वटपौर्णिमा शुभेच्छा संदेश.

=========================================
1. वटसावित्रीच्या पूजेच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा!
2. सावित्री – सत्यवानासारखीच तुमची जोडी कायम राहावी हीच सदिच्छा! वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
3. सण आला वटपौर्णिमेचा, सण आला सौभाग्याचा. करा पूजा प्रार्थना आणि मागा पतीच्या आरोग्याची सुरक्षा
4. ज्येष्ठ पौर्णिमेच्या अर्थात वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
5. वटसावित्रीच्या अर्थात वटपौर्णिमेच्या पवित्र सणासाठी तुम्हाला सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा!
=========================================

--दीपाली नाफडे
---------------

                     (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठी .popxo.कॉम)
                    ---------------------------------------------

-----संकलक आणि अनुवादक 
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-03.06.2023-शनिवार.
=========================================