१४-जून-दिनविशेष

Started by Atul Kaviraje, June 14, 2023, 01:58:21 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-१४.०६.२०२३-बुधवार. जाणून घेऊया,आजच्या दिवसाचे "दिन-विशेष"

                                  "१४-जून-दिनविशेष"
                                 -------------------

-: दिनविशेष :-
१४ जून
जागतिक रक्तदान दिन
=========================================
अ) महत्त्वाच्या घटना:
   ----------------
२००१
ए. सी. किंवा डी. सी. यापैकी कोणत्याही विद्युतप्रवाहावर चालणार्‍या उपनगरी गाडीचा (Electric Multiple Unit - EMU) शुभारंभ पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक वासुदेव गुप्ता यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात आला.
१९७२
डी. डी. टी. (dichloro-diphenyl-trichloroethane) या कीटकनाशकाच्या वापरावर अमेरिकेत बंदी घालण्यात आली.
१९६७
चीनने पहिल्या 'हायड्रोजन बॉम्ब' ची चाचणी केली.
१९४५
भारताला स्वायत्तता देण्यासंबंधीची वेव्हेल योजना जाहीर
१९४०
दुसरे महायुद्ध – जर्मनीने पॅरिस ताब्यात घेतल्यामुळे दोस्त राष्ट्रांनी तिथुन माघार घेतली.
१८९६
महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी 'अनाथ बालिकाश्रम' ही संस्था स्थापन केली. यातुनच पुढे कर्वे स्त्री शिक्षण संस्था, एस. एन. डी. टी. विद्यापीठ असे मोठमोठे उपक्रम सुरू झाले.
१७८९
मक्यापासुन पहिल्यांदाच 'व्हिस्की' तयार करण्यात आली. तिला 'बोर्बोन' असे नाव देण्यात आले कारण तयार करणारा रेव्हरंड क्रेग हा केंटुकी प्रांतातील 'बोर्बोन' येथील रहिवासी होता.
१७७७
अमेरिकेने 'स्टार्स अँड स्ट्राइप्स' या ध्वजाचा स्वीकार केला.
१७०४
मुघलांच्या कैदेत असलेल्या संभाजीराजे यांच्या मुलाचे औरंगजेबाने लग्न लावून दिले.
=========================================
ब) जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  -----------------------------
१९६९
स्टेफी ग्राफ – जर्मन लॉन टेनिस खेळाडू
१९२२
के. असिफ – हिन्दी चित्रपट निर्माते, दिग्दर्शक व पटकथालेखक
(मृत्यू: ९ मार्च १९७१)
१८६८
कार्ल लॅन्ड्स्टायनर – नोबेल पारितोषिक विजेते ऑस्ट्रियन जीवशास्त्रज्ञ
(मृत्यू: २६ जून १९४३)
१८६४
अलॉइस अल्झायमर – जर्मन मेंदुविकारतज्ञ
(मृत्यू: १९ डिसेंबर १९१५)
१७३६
चार्ल्स कुलोम – फ्रेन्च भौतिकशास्त्रज्ञ
(मृत्यू: २३ ऑगस्ट १८०६)
=========================================
क) मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
    -------------------------
२०१०
मनोहर माळगावकर – इंग्रजी लेखक
(जन्म: १२ जुलै १९१३)
२००७
कुर्त वाल्ढहाईम – संयुक्त राष्ट्रांचे चौथे सरचिटणीस
(जन्म: २१ डिसेंबर १९१८)
१९८९
सुहासिनी मुळगांवकर – अभिनेत्री व संस्कृत पंडित, मराठी रंगभूमीवरील एकपात्री नाट्यप्रयोगांची सुरुवात त्यांनी केली. ३१ जानेवारी १९६० रोजी 'सौभद्र' नाटकाचा पहिला एकपात्री प्रयोग त्यांनी केला. या नाटकाचे त्यांनी विक्रमी ५०० प्रयोग केले.
(जन्म: ????)
१९४६
जॉन लोगे बेअर्ड – स्कॉटिश अभियंता आणि दूरचित्रवाणी (Television) चे संशोधक
(जन्म: १३ ऑगस्ट १८८८)
१९२०
मॅक्स वेबर – जर्मन अर्थशास्त्रज्ञ आणि समाजशास्त्रज्ञ
(जन्म: २१ एप्रिल १८६४)
१९१६
गोविंद बल्लाळ देवल – आद्य मराठी नाटककार, स्वतंत्र मराठी लेखन आणि इंग्रजी, फ्रेन्च व संस्कृत नाटकांची भाषांतरे इ. अनेक प्रकार त्यांनी हाताळले होते.
(जन्म: १३ नोव्हेंबर १८५५)
१८२५
पिअर चार्ल्स एल्फांट – वॉशिंग्टन शहराचे वास्तुविशारद, फ्रेन्च अमेरिकन वास्तुरचनाकार आणि स्थापत्य अभियंता
(जन्म: ९ ऑगस्ट १७५४)
=========================================

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-14.06.2023-बुधवार.
=========================================