अचानक

Started by शिवाजी सांगळे, June 17, 2023, 08:48:30 AM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

अचानक

असे दाटून आले मेघ अचानक
नुर सृष्टीचा पालटला अचानक

नशा मातीला, खुशी वल्लरींना
भिजलो नकळत दोघं अचानक

नभ सावळे पुरते झाले म्हणता
मनात भिनला कृष्ण अचानक

सुर सरींचा चंचल वाऱ्यावरला
शिळ घालतो कानात अचानक

लपंडाव अवखळ तो दामिनीचा
घाबरवून देतसे आम्हा अचानक

©शिवाजी सांगळे 🦋papillon
 संपर्क: +९१ ९५४५९७६५८९
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९