II देवशयनी आषाढी एकादशी II-कविता

Started by Atul Kaviraje, June 29, 2023, 11:24:49 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje


                                II देवशयनी आषाढी एकादशी II
                               ------------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक 29.06.2023-गुरुवार आहे. आज "देवशयनी आषाढी एकादशी" आहे. आषाढी एकादशीच्या दिवशी लाखोंच्या संख्येने वारकरी, भक्त पंढरपूरमध्ये विठ्ठलाच्या दर्शनासाठी दाखल होतात. आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षात येणार एकादशीला देवशयनी आषाढी एकादशी असे म्हणतात. आध्यात्मिक व धार्मिक दृष्टिकोनातून या दिवसाला खूप महत्त्व आहे. या दिवशी देव निद्रिस्त होतात अशी समजूत आहे. मराठी कवितेच्या माझ्या सर्व भाऊ-बहीण कवी-कवयित्रींना  "देवशयनी आषाढी एकादशी"च्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया या-निमित्त कविता. 

             | देवशयनी आषाढी एकादशी निमित्त |
            ----------------------------------

विठू माऊली तू माऊली जगाची
सदैव काळजी तुला आमची

पाऊले चालती पंढरीची वारी
मनी ओढ तुझीच खरी

कुणी नाही तुज कडे मोठा छोटा
पायी रूतला नाही तुजकडे येता काटा

ऊन पावसांत तु नेहमीच दिला गारवा
विठू अमुचा तो ची सखा बरवा

संत नामदेव गोरा कुंभार
संत सखू संत चोखा मेळा

सर्वांना तारीलेस तु वेळोवेळा
आवली बोलते तुला काळा
तु बोलतोस तिचा भाव आहे भोळा

तुकोबांच्या मुखातून तु सदैव बोलविले अभंग
अवघी पंढरी विठूनामाच्या गजरात झाली दंग
🙏🙏🙏🙏🙏

--माधवी लोखंडे
--------------

                           (साभार आणि सौजन्य-संदर्भ-फेसबुक.कॉम)
                          ---------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-29.06.2023-गुरुवार.
=========================================