II देवशयनी आषाढी एकादशी II-लेख-2

Started by Atul Kaviraje, June 29, 2023, 11:37:32 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                              II देवशयनी आषाढी एकादशी II
                             ------------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक 29.06.2023-गुरुवार आहे. आज "देवशयनी आषाढी एकादशी" आहे. आषाढी एकादशीच्या दिवशी लाखोंच्या संख्येने वारकरी, भक्त पंढरपूरमध्ये विठ्ठलाच्या दर्शनासाठी दाखल होतात. आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षात येणार एकादशीला देवशयनी आषाढी एकादशी असे म्हणतात. आध्यात्मिक व धार्मिक दृष्टिकोनातून या दिवसाला खूप महत्त्व आहे. या दिवशी देव निद्रिस्त होतात अशी समजूत आहे. मराठी कवितेच्या माझ्या सर्व भाऊ-बहीण कवी-कवयित्रींना  "देवशयनी आषाढी एकादशी"च्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया या-निमित्त माहितीपूर्ण लेख. 

                 देवशयनी आषाढ एकादशी--

                          २. इतिहास--

     'पूर्वी देव आणि दानव यांच्यात युद्ध पेटले. कुंभ दैत्याचा पुत्र मृदुमान्य याने तप करून शंकराकडून अमरपद मिळवले. त्यामुळे तो ब्रह्मदेव, विष्णु, शिव अशा सर्व देवांना अजिंक्य झाला. त्याच्या भयाने देव त्रिकुट पर्वतावर धात्री (आवळी) वृक्षातळी एका गुहेत दडून बसले. त्यांना त्या आषाढी एकादशीला उपवास करावा लागला. पर्जन्याच्या धारेत स्नान घडले. अकस्मात त्यांच्या सर्वांच्या श्वासापासून एक शक्ती उत्पन्न झाली. त्या शक्तीने गुहेच्या दाराशी टपून बसलेल्या मृदुमान्य दैत्याला ठार मारले. ही जी शक्तीदेवी, तीच एकादशी देवता आहे.

                           ३. महत्त्व--

अ. आषाढी एकादशी व्रतात सर्व देवतांचे तेज एकवटलेले असते.
आ. कामिका एकादशी ही मनोकामना पूर्ण करणारी एकादशी आहे. ही पुत्रदायी एकादशी आहे.

                        ४. व्रत करण्याची पद्धत--

     आदल्या दिवशी दशमीला एकभुक्त राहायचे. एकादशीला प्रातःस्नान करायचे. तुलसी वाहून विष्णुपूजन करायचे. हा संपूर्ण दिवस उपोषण करायचे. रात्री हरिभजनात जागरण करायचे. आषाढ शुद्ध द्वादशीला वामनाची पूजा करायची आणि पारणे सोडायचे. या दोन्ही दिवशी 'श्रीधर' या नावाने श्रीविष्णूची पूजा करून अहोरात्र तुपाचा दिवा लावण्याचा विधी करतात.

                        ५. पंढरपूरची वारी--

     हे व्रत आषाढ शुद्ध एकादशीपासून करतात. वारकरी संप्रदाय हा वैष्णव संप्रदायातील एक प्रमुख संप्रदाय आहे. या संप्रदायात वार्षिक, सहामाह याप्रमाणे जशी दीक्षा घेतली असेल, तशी वारी करतात. ही वारी पायी केल्याने शारीरिक तप घडते, असे समजले जाते.

     चातुर्मासाची सुरुवात आषाढ शु। एकादशीने होते. एकादशी या तिथीला अन्य दिवसांच्या तुलनेमधे प्रत्येकामधील सात्त्विकता सर्वात अधिक असते. त्यामुळे या दिवशी साधनाकरण अधिक सोपे जाते आणि साधनेपासून होणारा लाभ हा सर्वाधिक असतो.

सर्व भाविकांना प्रिय असणारी ही आषाढी एकादशी. तिचं महात्म्य असं आहे..

ज्यास मान्य एकादशी। तो जिताची मुक्तवासी।

किंवा

एकादशी, एकादशी। जया छंद अहर्निशी

व्रत करी जो नेमाने। तथ वैकुंठाचे पणे

नामस्मरण जाग्रण। वाचे गाय नारायण

तोचि भक्त सत्य याचा। एका जनार्दन म्हणे वाचा।

     पद्मपुराणामध्ये एकादशी या व्रताचे महत्त्व असे सांगितले आहे--
। अश्वेमेधसहस्त्राणि राजसूयशतानि च । कादश्युपवासस्य कलां नार्हन्ति षोडशीम् ।।

अर्थ : अनेक सहस्र अश्वपमेध यज्ञ आणि शेकडो राजसूय यज्ञ यांना एकादशीच्या उपवासाच्या सोळाव्या कलेइतकेही म्हणजे ६ टक्के इतकेही महत्त्व नाही। आता आपल्या मनात प्रश्नव निर्माण होईल, एवढे जर एकादशीचे महत्त्व आहे, तर एकादशीपासून लाभतरी नेमका कोणता होतो ? पद्मपुराणामध्ये पुढे म्हटलेले आहे -

स्वर्गमोक्षप्रदा ह्येषा शरीरारोग्यदायिनी । सुकलत्रप्रदा ह्येषा जीवत्पुत्रप्रदायिनी । न गंगा न गया भूप न काशी न च पुष्करम् ।न चापि वैष्णवं क्षेत्रं तुल्यं हरिदिनेन च । - पद्मपुराण आदिखंड

अर्थ : एकादशी ही स्वर्ग, मोक्ष, आरोग्य, चांगली भार्या आणि चांगला पुत्र देणारी आहे। गंगा, गया, काशी, पुष्कर, वैष्णव क्षेत्र यांपैकी कोणालाही एकादशीची बरोबरी करता येणार नाही। एकादशी या व्रताचं आणखीन एक महात्म्य आहे. हे व्रत करतांना संकल्प करावा लागत नाही. इतर सर्व व्रते सुरू करतांना, व्रतारंभ करतांना संकल्प करून ती सुरू करावी लागतात. एकादशीचे व्रत करतांना संकल्प करावा लागत नाही, यावरून आपल्याला लक्षात आले असेल की, संकल्प न करतासुद्धा म्हणजे विधीवत् ईश्ववराला न सांगतासुद्धा हे व्रत केल्यामुळे मनुष्याला फलप्राप्ती होऊ शकते. एकादशीच्या दिवशी उपवास करतात. या दिवशी काही न खाता फक्तम पाणी व सुंठ-साखर घेतल्यास सर्वोत्तम होय. या दिवशी विष्णुपुजन करून अहोरात्र तुपाचा दिवा लावतात. दुसर्यां दिवशी महानैवेद्य दाखवून पारायणे करतात.

                      आषाढी एकादशी--

     वर्षभरातील चोवीस एकादशींमध्ये आषाढी एकादशीचे स्वत:च वेगळे स्थान आहे. आषाढी एकादशी म्हटले की डोळयासमोर येते ती पंढरपुरची वारी. गेले शतकानुशतक शेकडो किलोमीटर चालत भक्तीेभावाने लाखोंचा समुदाय आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपूरला जमा होतो। भारताच्या आध्यात्मिक इतिहासातील ही एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट आहे. बहुतेक वारकरी वारी पायी करतात. ही वारी पायी केल्याने शारीरिक तप घडते. आषाढी एकादशीला पंढरपूरला वारी जाते. गेल्या आठशे वर्षांपासून अधिक काळ ही वारी चालू आहे. एका दृष्टीने बघायला गेले तर साधना करणे म्हणजे एक प्रकारचे व्रतच असते. जी व्यक्तीग अजिबात साधना करत नाही अशा व्यक्तीतला ईश्वजरोपासनेकडे वळण्यासाठी व्रते खूप महत्त्वाची आहेत.

--मीरा जोशी
-----------

                          (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मायबोली.कॉम)
                         ----------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-29.06.2023-गुरुवार.
=========================================