II देवशयनी आषाढी एकादशी II-लेख-3

Started by Atul Kaviraje, June 29, 2023, 11:39:06 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje


                               II देवशयनी आषाढी एकादशी II
                              -----------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक 29.06.2023-गुरुवार आहे. आज "देवशयनी आषाढी एकादशी" आहे. आषाढी एकादशीच्या दिवशी लाखोंच्या संख्येने वारकरी, भक्त पंढरपूरमध्ये विठ्ठलाच्या दर्शनासाठी दाखल होतात. आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षात येणार एकादशीला देवशयनी आषाढी एकादशी असे म्हणतात. आध्यात्मिक व धार्मिक दृष्टिकोनातून या दिवसाला खूप महत्त्व आहे. या दिवशी देव निद्रिस्त होतात अशी समजूत आहे. मराठी कवितेच्या माझ्या सर्व भाऊ-बहीण कवी-कवयित्रींना  "देवशयनी आषाढी एकादशी"च्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया या-निमित्त माहितीपूर्ण लेख. 

                देवशयनी आषाढ एकादशी--

                       इतिहास--

     पूर्वी देव आणि दानव यांच्यात युद्ध पेटले. कुंभदैत्याचा पुत्र मृदुमान्य याने तप करून शंकराकडून अमरपद मिळवले. त्यामुळे तो ब्रह्मदेव, श्रीविष्णु, शिव अशा सर्व देवांना अजिंक्य झाला. त्याच्या भयाने देव चित्रकुट पर्वतावर धात्री (आवळी) वृक्षातळी एका गुहेत दडून बसले. त्यांना त्या आषाढ एकादशीला उपवास करावा लागला. त्यांना पर्जन्याच्या धारेत स्नान घडले. अकस्मात त्यांच्या एकवटलेल्या श्वासापासून एक शक्ती उत्पन्न झाली. त्या शक्तीने गुहेच्या दाराशी टपून बसलेल्या मृदुमान्य दैत्याला मारले. ही जी शक्तीदेवी तीच एकादशी देवता आहे. एकादशी व्रतात सर्व देवतांचे तेज एकवटलेले असते. सगळेच शैव आणि वैष्णव उपासक एकादशीचे व्रत करतात.

     आषाढी एकादशीला `देवशयनी एकादशी' म्हणण्याचे कारण :-- मनुष्याचे एक वर्ष हे देवांचे एक अहोरात्र असते. दक्षिणायन ही देवांची रात्र असून उत्तरायण हा त्यांचा दिवस असतो. आषाढ महिन्यात येणार्या कर्क संक्रांतीला उत्तरायण पूर्ण होऊन दक्षिणायन सुरू होते, म्हणजेच देवांची रात्र सुरू होते; म्हणून आषाढी एकादशीला `देवशयनी' (देवांच्या निद्रेची) एकादशी', असे म्हणतात.

     आषाढी एकादशीचे महत्त्व :-- देवांच्या या निद्राकालात असुर प्रबळ होतात व मानवाला त्रास देऊ लागतात. त्या असुरांपासून (आसुरी शक्तीं पासून) स्वत:चे संरक्षण करण्यासाठी प्रत्येकाने काहीतरी व्रत (साधना) करणे आवश्यक असते. या आषाढी एकादशीचे महत्त्व खुप मोठे असून या एकादशी व्रताने सर्व पापांचा नाश होतो, अशी वारक-यांची भावना असल्याने एकादशीच्या दिवसाला वारक-यांचादृष्टीने अनन्यसाधारण महत्त्व आहे.

     पूजाविधी :-- या दिवशी श्रीविष्णूची `श्रीधर' या नावाने पूजा करून अहोरात्र तुपाचा दिवा लावण्याचा विधी करतात.

     पंढरपूरची वारी :-- वारकरी संप्रदायात पंढरपूरची वारी करण्याला विशेष महत्त्व आहे.

               श्री विठ्ठलाला तुळस आणि मंजिरींचा हार का वहातात ?--

                            तुळस--

     तुळशीमध्ये श्रीविष्णूची सूक्ष्म स्पंदने (तत्त्व) आकर्षित करण्याची क्षमता जास्त असते. श्री विठ्ठल हे श्रीविष्णूचेच रूप आहे. विठ्ठलाच्या मूर्तीला तुळस वाहिल्याने ती जागृत व्हायला साहाय्य होते. त्यामुळे मूर्तीतील चैतन्याचा लाभ उपासकाला मिळतो.

                        तुळशीची मंजिरी--

     मंजिरी ही आपल्या स्पर्शातून विष्णुतत्त्वाला जागृत करणारी आहे. तुळशीत श्रीकृष्णतत्त्व असल्याने तिच्या मंजिरीतून उधळल्या जाणार्या चैतन्याच्या प्रवाहामुळे श्री विठ्ठलाच्या मूर्तीतील श्रीकृष्णतत्त्व जागृत होते आणि भक्ताचा भाव वाढेल, तसे त्याचे विष्णुतत्त्वात रूपांतर होऊन भक्ताला निर्गुणस्वरूप चैतन्याची अनुभूती येते.

                     मंजिरींचा हार--

     श्री विठ्ठलाच्या छातीवर रुळणारा तुळशीच्या मंजिरींचा हार हा मूर्तीतील मध्यभागातील स्थितीविषयक श्रीविष्णुरूपी क्रिया-शक्तीला चालना देणारा असल्याने भाविकांच्या सर्व प्रकारच्या मनोकामना पूर्ण होतात.

                     पंढरपूरची काही वैशिष्ट्ये--

     'पंढरी हे भगवान शंकराचे सर्वोत्तम तीर्थक्षेत्र मानले आहे. आद्य शंकराचार्यांनी या क्षेत्राला 'महायोगपीठ' म्हटले आहे. (त्यांनी पांडुरंगाचे गुणगान करणारे 'पांडुरंगाष्टकम्' सुद्धा म्हटले आहे.) पंढरी हे क्षेत्र म्हणजे श्रीकृष्णाचे दक्षिणेकडील रासक्रीडेचे गोकुळच आहे. यासंदर्भात पुराणांत निरनिराळ्या कथा आहेत.

--मीरा जोशी
------------

                         (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मायबोली.कॉम)
                        ---------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-29.06.2023-गुरुवार.
=========================================