II देवशयनी आषाढी एकादशी II-लेख-6-A

Started by Atul Kaviraje, June 29, 2023, 11:44:29 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                             II देवशयनी आषाढी एकादशी II
                            -----------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक 29.06.2023-गुरुवार आहे. आज "देवशयनी आषाढी एकादशी" आहे. आषाढी एकादशीच्या दिवशी लाखोंच्या संख्येने वारकरी, भक्त पंढरपूरमध्ये विठ्ठलाच्या दर्शनासाठी दाखल होतात. आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षात येणार एकादशीला देवशयनी आषाढी एकादशी असे म्हणतात. आध्यात्मिक व धार्मिक दृष्टिकोनातून या दिवसाला खूप महत्त्व आहे. या दिवशी देव निद्रिस्त होतात अशी समजूत आहे. मराठी कवितेच्या माझ्या सर्व भाऊ-बहीण कवी-कवयित्रींना  "देवशयनी आषाढी एकादशी"च्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया या-निमित्त माहितीपूर्ण लेख. 

                 देवशयनी आषाढ एकादशी--

     एकादशीचे व्रत कसे साजरे करावे यासाठी आपल्या शास्त्रात सांगितले आहे कि सकाळी आंघोळ झाल्यानंतर आपल्या कुलदेवते बरोबर विष्णूची पूजा करावी. पुजा करताना तुळशीची एक हजार किंवा एकशे आठ पाने वाहावीत, उपवास करावा. उपवास तुळशीपत्र घेऊन सोडावा. त्यादिवशी रात्री भजन-किर्तन करावे, हरी कथा श्रवण करावी. दुस-या दिवशी सूर्यादयानंतर पारणे सोडावे. ज्येष्ठ महिन्यात शुक्ल पक्षात येणा-या एकादशीला भाविक साधा पाण्याचा एक थेंब देखील घेत नाहीत. त्यामुळे या एकादशीला निर्जल एकादशी म्हणतात.

     महीना आषाढ महिन्यातील एकादशी ही फार पवित्र मानण्यात येते. याला महाएकादशी असे म्हणतात. पांडुरंगाच्या भेटीसाठी वारकरी मंडळी लांबचा प्रवास करुन पंढरपूरला येतात. आषाढी एकादशीस देहूहुन तुकाराम महाराजांची, आळंदीहून संत ज्ञानेश्वरांची, त्र्यंबकेश्वरहून संत निवृत्तीदनाथांची, पैठणहून एकनाथ महाराजांची, सासवडहून सोपानदेवांची, दहिठण्याहुन दहिठणकरांची तसेच उत्तार भारतातून संत कबीरांची पालखी निघते. या सर्व पालख्या व त्याबरोबर लाखोंच्या संख्येने येणारे वारकरी सर्व जण चंद्रभागेच्या तीरावर एकत्र जमतात. सर्व वारकरी टाळ-मृदुंगाच्या साथीने मुखी पांडुरंगाचे नाव घेत, लेकी-सुना, आया-बहिणी डोक्यावर तुळशी वृंदावन घेत, तर कधी रस्त्यात फुगडी घालत, आपल्या पोराबाळांसह पांडुरंगाच्या भेटीसाठी येतात. आषाढी एकादशीचा दिवस हा पवित्र दिन. या दिवसाची वाट पाहत विठ्ठल चरणी आपली सेवा अर्पण करण्यासाठी खुप लोक पंढरपुरला येऊन निस्वार्थ भावाने जनसेवा करतात. विठ्ठल भकतीरच्या ओढीने लोक एक प्रकारे पंढरपुरकडे खेचले जातात. या सर्व लोकांना बळ देणारी एक दैवी शक्ती अजूनही अस्तित्वात आहे याचा प्रत्यय आजही आषाढी एकादशीला पंढरपुरी आल्यावर येतो. अशी ही महापवित्र हिंदू संस्कृतीतील आषाढी एकादशी

१ चातुर्मास्य व्रते :--
आषाढ शु. एकादशी दिवसापासून चातुर्मास्याला प्रारंभ होतो.

२ लक्षप्रदक्षिणा व्रत :--
आषाढ शु. एकादशी, द्वादशी, किंवा पौर्णिमा या दिवशी या व्रताचा आरंभ करतात. अग्नी, गाय, ब्राह्मण, औदुंबर, गुरुचरित्र, अश्वरत्थ, तुळस किंवा मारूती यांना वेगवेगळ्या कारणासाठी लक्ष प्रदक्षिणा घालण्याची पद्धत आहे. व्रताचा संकल्प करून गुरूला व गणपतीला नमस्कार केल्यावर प्रथम अग्नीला प्रदक्षिणा घालाव्या. तो लक्ष पुरा झाल्यावर , गोलक्ष-प्रदक्षिणा पुर्यां कराव्या. तदनंतर ब्राह्मण व मग हनुमंत यांच्या प्रत्येकी लक्ष प्रदक्षिणा पुर्याल कराव्या. नंतर चारही प्रदक्षिणांचे उद्यापन एकदम करावे. उद्यापनाच्या वेळी चौघांच्याही सोन्याच्या प्रतिमा करून लिंगतोभद्रमंडलावर कलश ठेवून त्यावरील पूर्ण पात्रात त्यांची स्थापना करावी. नंतर पायसान्नाचे हवन करावे. प्रतिमा दान करुन यथाशक्ती ब्राह्मणभोजन घालून व्रताची समाप्ती करावी. पिंपळ वड, इ. वृक्षांनाही अशाच प्रकारे लक्ष प्रदक्षिणा करण्याची प्रथा आहे.
विष्णूलाही एक लक्ष प्रदक्षिंणा घालतात. या व्रताला आषाढ शु. एकादशीला प्रारंभ करुन कार्तिक शु. एकादशीला त्याची समाप्ती करतात. नित्य
'कृष्णाय वासुदेवाय हर्ये परमांत्मने '
किंवा
'केशवाय नमः'
या मंत्राचा उच्चार करीत प्रदक्षिणा घालायच्या असतात. ब्राह्मणभोजन घालून व्रताचे उद्यापन करतात. फल- पापनाश व सुखप्राप्ती.

--श्री.मंदार संत
-------------

                        (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मायबोली.कॉम)
                       ---------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-29.06.2023-गुरुवार.
=========================================