II देवशयनी आषाढी एकादशी II-लेख-6-B

Started by Atul Kaviraje, June 29, 2023, 11:46:07 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje


                              II देवशयनी आषाढी एकादशी II
                             ------------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक 29.06.2023-गुरुवार आहे. आज "देवशयनी आषाढी एकादशी" आहे. आषाढी एकादशीच्या दिवशी लाखोंच्या संख्येने वारकरी, भक्त पंढरपूरमध्ये विठ्ठलाच्या दर्शनासाठी दाखल होतात. आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षात येणार एकादशीला देवशयनी आषाढी एकादशी असे म्हणतात. आध्यात्मिक व धार्मिक दृष्टिकोनातून या दिवसाला खूप महत्त्व आहे. या दिवशी देव निद्रिस्त होतात अशी समजूत आहे. मराठी कवितेच्या माझ्या सर्व भाऊ-बहीण कवी-कवयित्रींना  "देवशयनी आषाढी एकादशी"च्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया या-निमित्त माहितीपूर्ण लेख. 

३ शुक्लैकादशी :--
या आषाढ शु. एकादशीचे नाव 'देवशयनी' या दिवशी उपवास करावा. सुवर्ण, चांदी, तांबे, पितळ यांच्या मूर्ती करून त्यांची यथाविधी पूजा करुन त्यास पीतांबर नेसवावा आणि शुभ्र वस्त्राने आच्छादित गादी आदींनी सुशोभित पलंगावर झोपवावे. त्या दिवसापासून चार महिनेपर्यंत आपल्या आवडीच्या पदार्थाचा त्याग करावा. उदा. मधुरस्वरासाठी 'गूळ' पुत्रपौत्रादी सुखासाठी 'तेल' शत्रुनाशासाठी 'कडू तेल' सौभाग्यवर्धनासाठी ' गोड तेल', वंशवृद्धीसाठी 'दूध' व सर्वपापाक्षयार्थ 'एकभुक्त, नक्त , अयाचित' व्रत किंवा उपवास करावा. जर या चार महिन्यांत दुसर्यां नी दिलेले पदार्थ भक्षण करण्याचा त्याग केला आणि वरीलपैकी एखादे जरी व्रत केले तरी महाफल मिळते. यास 'गोविंदशयन' व्रत असे म्हणतात.
याच एकादशीचे नाव 'पद्मा' असे आहे. व्रतविधी वरीलप्रमाणेच आहे.

४ स्वापमहोत्सव :--
आषाढ शु. एकादशी दिवशी हा महोत्सव करतात. या दिवशी भगवान महाविष्णू क्षीरसागरात शेषाच्या शय्येवर शयन करतात. तो उत्सव साजरा करण्यासाठी म्हणून सर्व क्षणांनी युक्त अशी देवाची सुवर्णमुर्ती करावी, अगर यथाशक्ती चांदी, तांबे, पितळ याची करावी. अगर कागदावर चित्र काढावे. गायन वादन आदी समांरभपूर्वक त्याची यथाविधी पूजा करुन रात्रीच्या वेळी
'सुप्ते त्वयि जगन्नाथे'-
अशी प्रार्थना करुन सुखयुक्त आसनावर त्याला झोपवावे. देवांची झोप रात्री, कूस बदलणे संध्याकाळी आणि जागृती दिवसा असते. याउलट असणे बरे नाही, म्हणून शयन हे अनुराधा नक्षत्राच्या आद्य तृतीयांशात, कूस बदलणे हे श्रवण नक्षत्राच्या मध्य तृतीयांशात व जागे राहणे ही रेवती नक्षत्राच्या अन्त्य तृतीयांशात होत असते. यासाठीच आषाढ, भाद्रपद व कार्तिक एकादशीचे पारणे आषाढात अनुराधा नक्षत्राच्या आद्य तृतीयांशात, भाद्रपदात श्रवण नक्षत्राच्या मध्य तृतीयांशात व कार्तिकात रेवतीच्या अंत्य तृतीयांशात करतात. (एक नक्षत्र सुमारे ६० घटिकांचे असते म्हणून त्याच्या २० घटिकांचा तृतीयांश करुन पहिला, दुसरा व तिसरा हे अंश धरतात.) चातुर्मास्य व्रतांत पलंगावर झोपणे, भार्यासंग, खोटे भाषण, मद्य, मांस, परान्न, तसेच मूग, वांगी इ. पदार्थांचे सेवन करु नये.
रामचंद्रिका ग्रंथात मूर्तीला रथातून वाजत-गाजत नेऊन जलाशयात झोपवण्याची प्रथा सांगितली आहे.

--श्री.मंदार संत
--------------

                          (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मायबोली.कॉम)
                         ---------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-29.06.2023-गुरुवार.
=========================================