II देवशयनी आषाढी एकादशी II-शुभेच्छा-1

Started by Atul Kaviraje, June 29, 2023, 11:59:43 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje


                               II देवशयनी आषाढी एकादशी II
                              -----------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक 29.06.2023-गुरुवार आहे. आज "देवशयनी आषाढी एकादशी" आहे. आषाढी एकादशीच्या दिवशी लाखोंच्या संख्येने वारकरी, भक्त पंढरपूरमध्ये विठ्ठलाच्या दर्शनासाठी दाखल होतात. आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षात येणार एकादशीला देवशयनी आषाढी एकादशी असे म्हणतात. आध्यात्मिक व धार्मिक दृष्टिकोनातून या दिवसाला खूप महत्त्व आहे. या दिवशी देव निद्रिस्त होतात अशी समजूत आहे. मराठी कवितेच्या माझ्या सर्व भाऊ-बहीण कवी-कवयित्रींना  "देवशयनी आषाढी एकादशी"च्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया या-निमित्त शुभेच्छा. 

     आषाढी एकादशीला महाराष्ट्रात धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व आहे. ज्यामुळे महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून लाखो भक्त या दिवशी पंढरपूरच्या दिंडीत सहभागी होतात. आषाढी एकादशीची माहिती सर्वांना असतेच. आषाढी एकादशीनिमित्त सर्व भक्तगणांना द्या या आषाढी एकादशीच्या शुभेच्छा (Ashadi Ekadashi Wishes In Marathi).

                    आषाढी एकादशीच्या शुभेच्छा--

=========================================
देव दिसे ठाई ठाई, भक्ततीन भक्तापाई ,सुखालाही आला या हो, आनंदाचा पूर, चालला नामाचा गजर, अवघे गरजे पंढरपूर..आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा

जय जय विठ्ठल, जय हरि विठ्ठल... आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा

तुका म्हणे माझे हेचि सर्व सुख, पाहिन श्रीमुख आवडीने... आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा

विठू माऊलीची कृपा आपणा सर्वांवर कायम अशी राहो... आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा

हेची दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा, गुण गाईन आवडी, हेचि माझी सर्व जोडी... आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा

चंद्रभागेच्या तीरी, उभा मंदिरी, तो पहा विटेवरी...आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा

विठू माऊली तू माऊली जगाची, माऊलीत मूर्ती विठ्ठलाची... आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा

जातां पंढरीसी सुख वाटे जीवा, आनंदे केशवा भेटतांचि, या सुखा उपमा नाही त्रिभुवनी, पाहिली शोधोनी अवघी तीर्थे... आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा

विठ्ठल विठ्ठल नाम तुझे ओठी, पाऊले चालतील वाट हरिची.. आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा

देव माझा विठू सावळा... सर्वांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा

तुमचिये दासीचा दास करूनि ठेवा, आर्शिवाद द्यावा हाचि मज...आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा

ह्रदय बंदिखाना केला, आंत विठ्ठल कोंडीला...आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा

सदा माझे डोळे जडो तुझे मुर्ती, रखमाईच्या पती सोयरिया...आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा

विठ्ठल विठ्ठल
नाम तुझे ओठी
पाऊले चालती
वाट हरीची...
नाद पंढरीचा
साऱ्या जगा मधी...
चला जाऊ पंढरी
आज आषाढी एकादशी...
आषाढी एकादशीच्या शुभेच्छा!

हेची दान देगा देवा
तुझा विसर न व्हावा
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा

तुझा रे आधार मला। तूच रे पाठीराखा।।
तूच रे माझ्या पांडुरंगा।। चूका माझ्या देवा।
घे रे तुझ्या पोटी।। तुझे नाम ओठी सदा राहो।।
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा

सोहळा जमला आषाढी वारीचा
सण आला पंढरीचा,
मेळा जमला भक्तगणांचा,
ध्यास विठुमाऊलीच्या दर्शनाचा
आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा

पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा
=========================================

--तृप्ती पराडकर
---------------

                        (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठी.popxo.कॉम)
                       --------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-29.06.2023-गुरुवार.
=========================================