II देवशयनी आषाढी एकादशी II-शुभेच्छा-4

Started by Atul Kaviraje, June 29, 2023, 12:05:29 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                              II देवशयनी आषाढी एकादशी II
                             ------------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक 29.06.2023-गुरुवार आहे. आज "देवशयनी आषाढी एकादशी" आहे. आषाढी एकादशीच्या दिवशी लाखोंच्या संख्येने वारकरी, भक्त पंढरपूरमध्ये विठ्ठलाच्या दर्शनासाठी दाखल होतात. आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षात येणार एकादशीला देवशयनी आषाढी एकादशी असे म्हणतात. आध्यात्मिक व धार्मिक दृष्टिकोनातून या दिवसाला खूप महत्त्व आहे. या दिवशी देव निद्रिस्त होतात अशी समजूत आहे. मराठी कवितेच्या माझ्या सर्व भाऊ-बहीण कवी-कवयित्रींना  "देवशयनी आषाढी एकादशी"च्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया या-निमित्त शुभेच्छा. 

     कोरोनामुळे मागच्या वर्षीपासून पंढरपूरची वारी सगळेच मिस करत आहेत. यंदा जरी पंढरपूरात भक्तांची मांदियाळी जमा नाही झाली तरी इन्स्टाग्राम, फेसबूकवर आषाढी एकादशीला हे खास स्टेटस (Ashadi Ekadashi Status In Marathi) ठेवून तुम्ही आषाढी एकादशी साजरी करू शकता.

               आषाढी एकादशीच्या शुभेच्छा--

=========================================
विठ्ठल माझा ध्यास, विठ्ठल माझा श्वास, विठ्ठल माझा भास, विठ्ठल माझा आभास... आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा

मुख दर्शन व्हावे आता, तू सकळ जगाचा दाता, घे कुशीत या माऊली, तुझ्या चरणी ठेवतो माथा...आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा

चला पंढरीसी जाऊ, रखमादेवीवरा पाहू, डोळे निवतील कान, मना तेथेचि समाधान... आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा

अखंड जया तुझी प्रीती, मज दे  तयाची संगती...आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा

अमृताहूनी गोड नाम तुझे देवा, मन माझे केशवा का ना बा घे...आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा

आषाढी कार्तिकी भक्तजण येती, पंढरीच्या वाळवंटी संत गोळा होती....आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा

विठोबासी शरण जावे, निजनिष्ठे नाम गावे...आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा

आता कोठें धावे मन, तुझे चरण देखलिया, भाग गेला शीण गेला, अवघा झाला आनंद...आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा

घेई घेई माझे वाचे, गोड नाम विठोबाचे, तुम्ही घ्यारे डोळे सुख, पाहा विठोबाचे मुख...आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा

चाले हे शरीर कोणाचिये सत्ते, कोण बोलविते हरिवीण, देखवी ऐकवी एक नारायण, तयाचें भजन चुको नको..आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा

यई वो विठ्ठले भक्तजन वत्सले... करूणा कल्लोळे पाडुंरंगे...आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा

लक्ष्मी वल्लभा... दीनानाथा पद्मनाभा... सुख वसे तुझे पायीं, मज ठेवी तेचि पायी...आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा
=========================================

--तृप्ती पराडकर
---------------

                      (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठी.popxo.कॉम)
                     --------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-29.06.2023-गुरुवार.
=========================================