II देवशयनी आषाढी एकादशी II-अभंग-1

Started by Atul Kaviraje, June 29, 2023, 12:09:41 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                               II देवशयनी आषाढी एकादशी II
                              ------------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक 29.06.2023-गुरुवार आहे. आज "देवशयनी आषाढी एकादशी" आहे. आषाढी एकादशीच्या दिवशी लाखोंच्या संख्येने वारकरी, भक्त पंढरपूरमध्ये विठ्ठलाच्या दर्शनासाठी दाखल होतात. आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षात येणार एकादशीला देवशयनी आषाढी एकादशी असे म्हणतात. आध्यात्मिक व धार्मिक दृष्टिकोनातून या दिवसाला खूप महत्त्व आहे. या दिवशी देव निद्रिस्त होतात अशी समजूत आहे. मराठी कवितेच्या माझ्या सर्व भाऊ-बहीण कवी-कवयित्रींना  "देवशयनी आषाढी एकादशी"च्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया या-निमित्त शुभेच्छा. 

                               आषाढी एकादशीच्या शुभेच्छा--

                  आषाढी एकादशीचे अभंग--

आषाढी एकादशीच्या शुभेच्छा सोबतच तुम्ही सोशल मीडियावर खास विठूमाऊलींचे अभंग ही शेअर करू शकता. पाहा खास आषाढी एकादशीचे अभंग.

=========================================
1. चला मंगळ वेढे पाहू ...
नाम विठ्ठल विठ्ठल घेऊ....|

वाड्याच्या पडक्या भिंती,
दामाची महती कथिती...
ती कथा मुखाने गाऊ...
नाम विठ्ठल विठ्ठल घेऊ....

भर रस्त्यावरती साधी,
ती चोखोबाची समाधी...
आदराने सुमने वाहू...
नाम विठ्ठल विठ्ठल घेऊ....

कान्होपात्रेच्या गुरूस्थानी,
आनंद मुनी महाज्ञानी...
ते ज्ञान या ह्रदयी ठेऊ...
नाम विठ्ठल विठ्ठल घेऊ...

2. विठ्ठलाच्या पायी वीट झाली भाग्यवंत
पहाताच होती दंग आज सर्व संत
विठ्ठलाच्या पायी वीट झाली भाग्यवंत

3. ह्रदय बंदी खाना केला
आत विट्ठल कोंडिला
शब्दी केलि जड़ा जोड़ी
विट्ठल पायी घातली वेडी
धरिला पंढरीचा चोर..

4. भाव तिथ देव ही संताची वाणी
आचारा वाचून पाहिला कोणी?
शब्दांच्या  बोलानं शांति नाही मनी ।
देव बाजारचा.

5. तुला साद आली तुझ्या लेकरांची
लंकापुरी आज भारावली
वसा वारीचा घेतला पावलांनी
आम्हा वाळवंटी तुझी सावली
गळाभेट घेण्या भिमेची निघाली
तुझ्या नामघोषात इंद्रायणी

विठ्ठल विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल
=========================================

--तृप्ती पराडकर
---------------

                    (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठी.popxo.कॉम)
                   ---------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-29.06.2023-गुरुवार.
=========================================