II देवशयनी आषाढी एकादशी II-अभंग-3

Started by Atul Kaviraje, June 29, 2023, 12:12:57 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                               II देवशयनी आषाढी एकादशी II
                              ------------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक 29.06.2023-गुरुवार आहे. आज "देवशयनी आषाढी एकादशी" आहे. आषाढी एकादशीच्या दिवशी लाखोंच्या संख्येने वारकरी, भक्त पंढरपूरमध्ये विठ्ठलाच्या दर्शनासाठी दाखल होतात. आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षात येणार एकादशीला देवशयनी आषाढी एकादशी असे म्हणतात. आध्यात्मिक व धार्मिक दृष्टिकोनातून या दिवसाला खूप महत्त्व आहे. या दिवशी देव निद्रिस्त होतात अशी समजूत आहे. मराठी कवितेच्या माझ्या सर्व भाऊ-बहीण कवी-कवयित्रींना  "देवशयनी आषाढी एकादशी"च्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया या-निमित्त शुभेच्छा. 

                        आषाढी एकादशीच्या शुभेच्छा--

                 आषाढी एकादशीचे अभंग--

=========================================
9. पूर्वजन्मीं सुकृतें थोर केलीं । तीं मज आजि फ़ळासि आलीं ॥१॥
परमानंदु आजि मानसीं । भेटी झाली या संतासी ॥२॥
मायबाप बंधु सखे सोयरे । यांतें भेटावया मन न धरे ॥ ३॥
एकएका तीर्थहूनी आगळें । तयामाजी परब्रह्म सांवळे ॥४॥
निर्धनासी धनलाभु झाला । जैसा अचेतनीं प्राण प्रगटला ॥५॥
वत्स बिघडलिया धेनु भेटली । जैसी कुरंगिणी पाडसा मिनली ॥६॥
हें पियुषा परतें गोड वाटत । पंढरीयाचे भक्त भेटत ॥७॥
बापरखुमादेविवरु विठ्ठले । संत भेटतां भव दु:ख फ़िटलें ॥८॥

10. उंच पताका झळकती । टाळ मृदंग वाजंती । आनंदे प्रेमें गर्जती । भद्र जाती विठ्ठलाचे ॥१॥
आले हरिचे विनट । वीर विठ्ठलाचे सुभट । भेणें जाहले दिप्पट । पळती थाट दोषांचे ॥२॥
तुळसीमाळा शोभती कंठीं । गोपीचंदनाच्या उटी । सहस्त्र विघ्नें लक्ष कोटी ।बारा वाटा पळताती ॥३॥
सतत कृष्णमूर्ति सांवळी । खेळे ह्रुदयकमळीं । शांति क्षमा तया जवळीं । जीवें भावें अनुसरल्या ॥४॥
सहस्त्र नामाचें हतियार । शंखचक्राचे शृंगार । अति बळ वैराग्याचें थोर । केला मार षडूवर्गा ॥५॥
ऎसे एकांग वीर । विठ्ठल रायाचे डिंगर । बापरखुमादेविवर । तिहीं निर्धारीं जोडीला ॥६॥
=========================================

--तृप्ती पराडकर
---------------

                        (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठी.popxo.कॉम)
                       ---------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-29.06.2023-गुरुवार.
=========================================