बकरी ईद-चारोळ्या-2

Started by Atul Kaviraje, June 29, 2023, 04:07:27 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                      "बकरी ईद"
                                     ------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-२९.०६.२०२३-गुरुवार आहे. आज "बकरी ईद" आहे. रमजानच्या पवित्र महिन्यानंतर 70 दिवसांनी बकरी ईदचा सण साजरा करण्यात येतो. या सणाला ईद-अल-अजहा किंवा ईद-उल-जुहा असंही म्हटलं जातं. आजच्या दिवशी नमाज पठण केल्यानंतर बकऱ्याची कुर्बानी दिली जाते. या दिवशी गरीब लोकांना जेवण दिलं जातं. मराठी कवितेच्या माझ्या सर्व बंधू-भगिनी कवी-कवियत्रींना बकरी ईदच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया काही चारोळ्या.

=========================================
यंदाची रमजान ईद  तुम्हांला आणि तुमच्या परिवाराला

सुख, शांती, समृद्धी आणि आनंद  घेऊन येवो

हिच आमची सदिच्छा

बकरी ईद हार्दिक शुभेच्छा!


ईद घेऊन येई आनंद

जोडू मनाशी मनाचे नवे बंध

सणाचा हा दिवस खास

बकरी ईद मुबारक तुम्हा सर्वांस!


फुलांना बहर मुबारक
शेतकऱ्याला पीक मुबारक
पक्ष्यांना उडान मुबारक
चंद्राला तारे मुबारक
आणि तुम्हास बकरी ईद मुबारक


अल्लाह आपणास ईद च्या या शुभ दिवशी
सर्व प्रकारचे आनंद, सुख शांती आणि प्रेम देवो
आपल्या सर्व इच्छा पूर्ण होवोत..!
Happy बकरी Eid


चंद्राप्रमाणे चकाको रमजान तुमची
ईबादत ने भरलेला रोजा असो तुमचा
प्रत्येक रोजा आणि नमाज कबुल हो तुमची
हीच दुआ अल्लाह कडे आमची
बकरी ईद मुबारक असो


ईद चा सण आला आहे
आनंद आपल्या सोबत आणला आहे
अल्लाह ने जगात सुगंध पसरवला आहे
पहा पुन्हा ईद चा सण आला आहे.
सर्वांना मनापासून ईद मुबारक
=========================================

--by adminMV
----------------

                          (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठी वर्ग.इन)
                         ---------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-29.06.2023-गुरुवार.
=========================================