बकरी ईद-चारोळ्या-5

Started by Atul Kaviraje, June 29, 2023, 04:12:09 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje


                                     "बकरी ईद"
                                    ------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-२९.०६.२०२३-गुरुवार आहे. आज "बकरी ईद" आहे. रमजानच्या पवित्र महिन्यानंतर 70 दिवसांनी बकरी ईदचा सण साजरा करण्यात येतो. या सणाला ईद-अल-अजहा किंवा ईद-उल-जुहा असंही म्हटलं जातं. आजच्या दिवशी नमाज पठण केल्यानंतर बकऱ्याची कुर्बानी दिली जाते. या दिवशी गरीब लोकांना जेवण दिलं जातं. मराठी कवितेच्या माझ्या सर्व बंधू-भगिनी कवी-कवियत्रींना बकरी ईदच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया काही चारोळ्या.

            मित्रांना आणि नातेवाईकांना मराठीतून द्या बकरी ईदच्या शुभेच्छा--

     संपूर्ण देशात बकरी ईदचा हा पवित्र सण मोठ्या उत्साहत साजरा केला जातो. या दिवशी कुर्बानीला विशेष महत्व आहे. त्यामुळे बकरी ईद ला बकर्‍याचा बळी दिला जातो. या कुर्बानीनेचे तीन भागांमध्ये वाटप केले जाते.

     यावर्षी बकरी ईद 29 जून रोजी गुरुवारी साजरी केली जात आहे. संपूर्ण देशात बकरी ईदचा हा पवित्र सण मोठ्या उत्साहत साजरा केला जातो. या दिवशी कुर्बानीला विशेष महत्व आहे. त्यामुळे बकरी ईद ला बकर्‍याचा बळी दिला जातो. या कुर्बानीनेचे तीन भागांमध्ये वाटप केले जाते. विविध प्रकारच्या रेसिपींचा या दिवशी आस्वाद घेतला जातो. गेल्या दोन वर्षापासून या सणावर कोरोनाचे सावट होते. परंतु या वर्षी मात्र या सणाच संपूर्ण देशात उत्साह आहे. यानिमित्ताने तुम्ही तुमच्या मित्रांना किंवा नातेवाईकांना मराठीतून शुभेच्छा (Bakri Eid shubhechha, sandesh,Wishes, Greetings, Messages in Marathi) देऊन त्यांच्या आनंदात सहभागी होऊ शकता.

            बकरी ईद निमित्त पाठवा हे मराठी शुभेच्छा संदेश -

=========================================
अल्लाह ताला पूर्ण करू तुमच्या इच्छा
तुमच्या घरात आनंद, सुख समृद्धी नांदो हीच आमची सदिच्छा!
बकरी ईदच्या खूप खूप शुभेच्छा


बंधुभाव वाढवूया, विश्वबंधुत्वाचा संदेश देऊया
ईदच्या निमित्ताने, मनोमिलनाचा आनंद साजरा करुया
ईदसाठी सर्व मुस्लिम बांधवांना हार्दिक शुभेच्छा.


वाटलं कुणाशी तरी बोलू
खास व्यक्तींशी दोन गप्पा मारू,
बकरी ईद मुबारक म्हणण्याचा घेतला निर्णय,
ह्रदय म्हणाले,आधी तुझ्यापासून सुरुवात करू
बकरी ईदच्या खूप खूप शुभेच्छा


तेरी ईद मैं मना लूँ, मेरी मना ले तू दिवाली...!
छोड़ दे सब फसादों को, देश में होने दे खुशहाली..
सर्व मुस्लिम बांधवांना, बकरी ईदच्या हार्दिक शुभेच्छा!


तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबासाठी ही बकरी ईद
सुख समृद्धी आणि भरभराटी घेऊन येवो हीच शुभेच्छा!
बकरी ईदच्या हार्दिक शुभेच्छा
=========================================

--By India.com News Desk
--Edited by Chandrakant Jagtap
------------------------------------

                          (साभार आणि सौजन्य-संदर्भ-इंडिया.कॉम)
                         -------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-29.06.2023-गुरुवार.
=========================================