बकरी ईद-लेख-1

Started by Atul Kaviraje, June 29, 2023, 04:15:44 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                       "बकरी ईद"
                                      ------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-२९.०६.२०२३-गुरुवार आहे. आज "बकरी ईद" आहे. रमजानच्या पवित्र महिन्यानंतर 70 दिवसांनी बकरी ईदचा सण साजरा करण्यात येतो. या सणाला ईद-अल-अजहा किंवा ईद-उल-जुहा असंही म्हटलं जातं. आजच्या दिवशी नमाज पठण केल्यानंतर बकऱ्याची कुर्बानी दिली जाते. या दिवशी गरीब लोकांना जेवण दिलं जातं. मराठी कवितेच्या माझ्या सर्व बंधू-भगिनी कवी-कवियत्रींना बकरी ईदच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया काही माहितीपूर्ण लेख.

     मुस्लिम बांधवांसाठी पवित्र असलेल्या ईद-अल-अजहा म्हणजेच बकरी ईदचा सण आज देशभरात उत्साहाने साजरा केला जात आहे.

     मुस्लिम बांधवांसाठी पवित्र असलेल्या ईद-अल-अजहा म्हणजेच बकरी ईदचा सण आज देशभरात उत्साहाने साजरा केला जात आहे. मुस्लिम समाजामध्ये कुर्बानीला मोठं महत्व असून त्यासाठीच आजचा दिवस साजरा केला जात आहे. यावर्षी रविवारी, 10 जुलै 2022 रोजी हा उत्सव साजरा केला जाणार आहे. बकरी ईद हा सण मुस्लिम धर्मातील लोक मिठी ईदच्या 70 दिवसांनी म्हणजेच ईद उल फित्र नंतर साजरा करतात. हा त्यागाचा सण आहे आणि तो अल्लाहच्या भक्तीचे उदाहरण आहे.

     हजरत इब्राहिम यांच्या बलिदानाच्या स्मरणार्थ ईद-उल-अजहा साजरी केली जाते. हजरत इब्राहिमने अल्लाहच्या आज्ञेवर निष्ठा दाखवण्यासाठी आपला मुलगा इस्माईलचा बळी देण्याचे मान्य केले होते. हजरत इब्राहिम जेव्हा आपल्या मुलाचे बलिदान देण्यासाठी पुढे निघाले तेव्हा देवाने त्यांची निष्ठा पाहून इस्माईलच्या बलिदानाचे दुंबेच्या बलिदानात रूपांतर केले. इस्लामच्या धार्मिक श्रद्धेनुसार हजरत इब्राहिम अल्लाहचे पैगंबर होते.

                  बकरी ईदचे महत्व--

     रमजानच्या पवित्र महिन्यानंतर 70 दिवसांनी बकरी ईदचा सण साजरा करण्यात येतो. या सणाला ईद-अल-अजहा किंवा ईद-उल-जुहा असंही म्हटलं जातं. आजच्या दिवशी नमाज पठण केल्यानंतर बकऱ्याची कुर्बानी दिली जाते. या दिवशी गरीब लोकांना जेवण दिलं जातं. या कुर्बानीची तीन हिस्स्यांमध्ये विभागणी केली जाते. एक हिस्सा गरीबांना, दुसरा हिस्सा मित्रांना, नातेवाईकांना आणि तिसरा हिस्सा हा स्वत:कडे ठेवला जातो.

     हजरत इब्राहिम हे अल्लाहाचे अनुयायी मानले जातात. त्यांची खूप कठीण परीक्षा घेण्यात आली होती. अल्लाहाने  इब्राहिम यांनी त्यांच्या मुलाची म्हणजे हजरत इस्माईलची कुर्बानी देण्यासाठी सांगितलं होतं. त्या आदेशाचा पालन करण्यासाठी इब्राहिम तयार झाले, पण स्वत:चा मुलगा असल्याने त्यांनी आपल्या डोळ्यावर पट्टी बांधली. कुर्बानी दिल्यानंतर डोळ्याची पट्टी उघडल्यानंतर त्यांना दिसलं की कुर्बानी एका बकऱ्याची देण्यात आली आहे, त्यांचा मुलगा सुरक्षित ठेऊन अल्लाहाने त्यांच्यावर कृपा केली आहे. त्या दिवसाचे स्मरण म्हणून मुस्लिम बांधवांत बकरी ईद साजरी केली जाते.

     ईद उल जुहा दरम्यान, मुस्लिम इदगाह किंवा मशिदीमध्ये जमतात आणि जमातसह 2 रकत नमाज अदा करतात. ही प्रार्थना सहसा सकाळी केली जाते. प्रेम, निस्वार्थीपणा आणि त्यागाच्या भावनेबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा आणि सर्वसमावेशक समाजात एकता आणि बंधुतेसाठी एकत्र काम करण्याचा हा सण असल्याचे म्हटले जाते.

--By: एबीपी माझा वेब टीम
--Edited By: प्रिया मोहिते
-------------------------

                     (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठी.abp लाईव्ह.कॉम)
                    ------------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-29.06.2023-गुरुवार.
=========================================