बकरी ईद-लेख-2

Started by Atul Kaviraje, June 29, 2023, 04:17:07 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje


                                     "बकरी ईद"
                                    ------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-२९.०६.२०२३-गुरुवार आहे. आज "बकरी ईद" आहे. रमजानच्या पवित्र महिन्यानंतर 70 दिवसांनी बकरी ईदचा सण साजरा करण्यात येतो. या सणाला ईद-अल-अजहा किंवा ईद-उल-जुहा असंही म्हटलं जातं. आजच्या दिवशी नमाज पठण केल्यानंतर बकऱ्याची कुर्बानी दिली जाते. या दिवशी गरीब लोकांना जेवण दिलं जातं. मराठी कवितेच्या माझ्या सर्व बंधू-भगिनी कवी-कवियत्रींना बकरी ईदच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया काही माहितीपूर्ण लेख.

     नमस्कार मित्रानो स्वागत आहे आपलं, आज आपण जाणून घेणार आहोत बकरी ईद बद्दल माहिती, बकरी ईद हा मुस्लिम बांधवांचा एक महत्त्वाचा सण आहे हा सण मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरा केला जातो. बकरी ईद हा उत्सव रमजानच्या नंतर जवळपास 70 दिवसांनी साजरा केला जातो.

     बकरी ईद या सणाला ईद उल जुहा असेही सुद्धा म्हणतात. हा उत्सव कुर्बानीशी संबंधित आहे. ईद-उल-जुहा हजरत इब्राहिमने केलेल्या त्यागाप्रित्यर्थ साजरा केला जातो. त्यामुळे या दिनाचे प्रतीक म्हणून बक-याची कुर्बानी दिली जाते. ज्या बकऱ्यांची कुर्बानी देणार त्याचे पालनपोषण करून त्याची पूर्ण काळजी घेतली जाते. त्यानंतरच तो कुर्बान करण्याची प्रथा आहे. सकाळच्या विशेष नमाज पठणानंतर ही कुर्बानी देण्यात येते, कुर्बान केलेल्या या बकऱ्याचे तीन प्रकारे विभाजन केले जाते एक हिस्सा आपल्या घरी व बाकीचे हिस्से गरीब किंवा गरजू ना देण्याची प्रथा आहे.

     तसेच बकरी ईद या उत्सव नंतर एक महिन्याने इस्लामिक नववर्ष मोहरम साजरा करण्यात येतो.

                  बकरी ईद का साजरा केली जाते--

     असे मानले जाते की बकरी ईदचा उत्सवाची सुरुवात हजरत इब्राहिमपासून सुरु झाली , चला बकरी ईदच्या सणाशी संबंधित कुर्बानीची कहाणी जाणून घेऊया.

     इस्लाम धर्मातील प्रमुख पैगंबरांपैकी हजरत इब्राहिम हे एक होते हि कुर्बानी देण्याची परंपरा च्यापासून सुरू झाली, अल्लाहने एकदा हजरत इब्राहिम यांच्या स्वप्नात येऊन त्यांना त्यांची सर्वांत प्रिय वस्तू कुर्बान करण्यास सांगितले, असे मानले जाते. इब्राहिम यांना त्यांचा मुलगा सर्वाधिक प्रिय होता.

     याच दिवशी अल्लाह च्या आदेशावरुन इब्राहिम आपल्या मुलाला घेऊन मैदानावर गेले व त्याची कुर्बानी करू लागले. पण त्या वेळी सुरी चालेना. त्याच वेळी खुदाकडून फर्मान आले : मी तुझ्या या भक्तीने स्तिमित व प्रसन्न झालो, व पुत्राच्या ठिकाणी बकऱ्याची कुर्बानी कर, त्या दिवसापासून बकरी ईद सण सुरू झाला असे म्हणतात.

     बकरी ईदचा सण आपल्याला त्याग आणि बलिदानाबद्दल शिकवते.

                   (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठी.abp लाईव्ह.कॉम)
                  ------------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-29.06.2023-गुरुवार.
=========================================